मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाउबंदकी

बेसनलाडू · · जे न देखे रवी...
कट्ट्यावरचे वासू तर्कट वाचा विष्ठा, मनही मळकट! मांड्यांची चव कोणा कळली? म्हटले सगळे - "तळकट, तुपकट!" माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! काका कुठला?पुतणे कुठले? भाउबंदकी होवो बळकट

वाचने 9465 वाचनखूण प्रतिक्रिया 18

सचिन Tue, 03/11/2008 - 02:07
बेसनलाडूजी, "स्वतःचा स्वानुभव" की काय ? असो, पण कविता आवडली ! BALANCE चाङ्गला आहे.

प्राजु Tue, 03/11/2008 - 02:24
"स्वतःचा स्वानुभव" की काय ? अहो.. मुलिंची कन्याशाळा नका हो करू... कविता छान आहे. भाऊबंदकीचे चांगले वर्णन केले आहे. नव्या वातावरणात अगदी फिट्ट बसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Tue, 03/11/2008 - 02:11
अखेर नॉर्थ कॅरोलिनावरून सूत्र हलली म्हणायची! :)) पण कविता बाकी झकास... चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! अगदी खरं! वशिंड भरलेल्या आणि शिंग दणकट असलेल्या पुतण्यांच्या संस्थाळवर काका हल्ली वाचनमात्रच असतात! झणझणीत तिखट मिसळ काकांना पचली नाही म्हणायची! :) माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट हम्म! खरं आहे! नकली आयडी घेऊन दुसर्‍याच्या कविता तिसर्‍याच संस्थळावर टाकण्याचा दिवटेपणा माऊलीच्याच लेकरांनी करावा या सारखं माऊलीचं दुसरं दर्दैव ते काय! :) असो, छान कविता... आपला, (निदान माऊलीचं नांव घेऊन किंवा तिची झूल पांघरून संस्थळांवर पालथे धंदे न करणारा!) तात्या.

इनोबा म्हणे Tue, 03/11/2008 - 02:47
काका कुठला?पुतणे कुठले? भाउबंदकी होवो बळकट आपण वकील आहात काय? च्यायला भाऊबंदकीच्या नावाखाली गळे काढणारे स्वत: त्याच पाण्यात उभे राहून दूसयांना कोरडे रहायला सांगत आहेत. बे.ला. आपण एक चांगले कवि आहात यात दूमत नाही,पण त्याचा वापर कसा करत आहात यावर सगळं अवलंबून आहे.उगाच वाद वाढवत बसू नये ही विनंती. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

बेसनलाडू Tue, 03/11/2008 - 03:24
आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते? (शालजोडीतला)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

इनोबा म्हणे Tue, 03/11/2008 - 10:59
आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते? हा उपदेश नसून विनंती आहे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by व्यंकट

बेसनलाडू Tue, 03/11/2008 - 04:09
अहो मुळातच तशा शरसंधानास व्यासरचित महाभारताची परवानगीच आहे :) (शब्दशिखंडीआडचा)बेसनलाडू

सुधीर कांदळकर Tue, 03/11/2008 - 19:59
संदर्भ माहीत असते तर दु:खच झाले असते. असो. कविता छानच आहे. माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! वर्णन जोरदार आहे.