मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विरह

सचिन · · जे न देखे रवी...
मनावर दगड ठेवून म्हणालो तिला तुझा माझा सम्बन्ध आता सम्पला म्हणाली , हेच ऐकवण्यासाठी जवळ केले होतेस का मला ? आताशा एकटेपणा अक्षरशः खायला उठतो जिवाला पण पुन्हा तिला जवळ केले तर घरे पडतील काळजाला तिच्या नाही, तरी माझ्या घरचे विरोध नक्कीच करणार आणि त्यान्च्यापर्यन्त आमची कुणकुण तर गेलीच असणार आमचा समेट घडवायला मित्र सारे आतुर झालेत म्हणूनच रूमवरचे सारे ASH TRAY मी केव्हाच फेकून दिलेत (कवितेचे नाव "मोठी गोल्ड फ्लेक" ठेवणार होतो, पण मग सस्पेन्स राहिला नसता !)

वाचने 7658 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सर्किट Tue, 03/11/2008 - 00:07
मस्त कविता. पण पुन्हा तिला जवळ केले तर घरे पडतील काळजाला हे तर मस्तच !! - सर्किट

इनोबा म्हणे Tue, 03/11/2008 - 00:24
तुमच्या आमच्या सारख्या भावी साहित्यिकांना हा धूर किती गरजेचा आहे याचा अजूनही कुणालाच अंदाज आलेला दिसत नाही.समाजाने याचा गंभीरपणे विचार करायला हवा.(तुम्ही गंभीर होऊ नका म्हणजे झालं) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु Tue, 03/11/2008 - 00:35
अप्रतिम कविता... एकदमच आवडली.. गुगली आहे खरी... - (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट Tue, 03/11/2008 - 01:41
adhun madhun samarthyadata gGaDev is undefined ashi error deto ani devanagri typing band padatay. mhanoon english madhe pratisad. आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

सचिन Tue, 03/11/2008 - 01:45
माझ्यासारख्या नवोदिताच्या (आतापर्यन्तच्या) दोनही कवितन्ना मि.पा. वाचकान्नी उत्साहवर्धक प्रतिसाद दिलाय ! जर्रानवाजीका तेहेदिलसे शुक्रिया !!!