(ठसे)
सुखावलं की लाडात यायचं..
मनोमन हुंदडायचं!
दुखावलं की भुंकायचं..
आतल्या आत गुरगुरायचं!
रस्त्या-रस्त्याच्या किनारी,
ठसे उमटवत जायचं..
एक ठसा ओला!
एक ठसा कोरडा!
एक ठसा मातीतून उठून,
एका मनावर गेला उमटून..
एका ठशात पाणी साठून,
एक डोळ्यात आला भरुन..
'मागे' वळून पाहताना मग..
तळीच डोळ्यात येतात जमून!!
डोळ्यांकाठच्या ओल्या किनारी
'बोरिस'च्या आठवणी रहाती भरुन!
(स्वाती ताईंचे सुंदर काव्य 'ठसे' वाचून एका क्षणात ठशांची गर्दी मनात झाली आणि निरपेक्ष प्रेमात चिंब भिजवणारा माझा लाडका 'बोरिस' जाऊन १० वर्षे झाली त्याच्या आठवणी
Taxonomy upgrade extras
मिसळपाव