Skip to main content

"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये?? भाग २

लेखक वरदा यांनी शुक्रवार, 11/07/2008 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या धाग्यावर खूप जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवीन धागा सुरु करतेय. आधीची चर्चा इथे वाचता येईलः तर आत्ताच्या चर्चेनुसार नक्की येणारे: वरदा प्राजु शितल मुक्तसुनीत खादाड बोका मानस पुण्याचे पेशवे विकास अनामिक वात्रट चतुरंग कदाचित धनंजय संदिप चित्रे चित्रा लंबूटांग ठिकाणाचे ऑप्शन: वरदाचे घर (जरा अस्तव्यस्त असेल पण समजून घ्यालच ;) न्यूजर्सीचा कुठलाही बीच (तसा माझ्या कम्युनिटीचा प्रायव्हेट बीच आहे पण मी अजून पास घेतला नाहीये आज उद्या विचारते मिलाला पास तर नथिं लाईक ईट) न्युयॉर्क : काय एवढे जवळ येता आणि माझ्याकडे येत नाही :( (मला वाट्टं कँसलच करावी ही आयडीया) किंवा जरा वेळ बीच वर भेटू बार्बेक्यु करु मग माझ्या घरी येऊ असलं काहीतरी...पण फार घोळ होईल एक ठीकाण ठरवणं सोप्पं असतं मेनू: मिसळ मिसळ मिसळ.... बाकीचा मेनू: जरा आयडिया द्या ना..... वि. सू. सगळ्यांचे इमेल मला व्यनि ने कळवा प्लीज मग मी ठीकाण ठरल्यावर डायरेक्शन्स टाकेन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10614
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

प्रत्येकाच्या घरुन येणारे किती आहेत म्हणजे एकून मेंबरांच्या संखेचा अंदाज येईल आणि मेनू ठरवता येईल. माझे ५ मेंबर्स आहेत. मेनू सुचवणी - मिपा वर दिलेली पेठकर काकांची पावभाजी करता येईल. मी करुन आणण्याची जबाबदारी घेतो. चतुरंग

In reply to by चतुरंग

माझे ५ मेंबर्स आहेत. तुम्ही दोघं अन् तीन मुलं की काय? रंगा आता पुरे हो! कुटुंबनियोजन कर आता.. :) आपला, (कुठलंही औरस-अनौरस अपत्य नसलेला) तात्या.

आम्ही अडीज माणसे यश ३ व. त्यामुळे तो लि॑बु टि॑बु पण ४ जणा॑ना पुरेल एवढा. मी आणि प्राजु मिसळ काय ग प्राजु मिसळ बनवु या ना झणझणीत कोल्हापुरी.

In reply to by शितल

आता मी एकदम वाट पहातेय्...तुला फोन करेन आज्...वरची तयारी मी करेन तुमची लिंबू, कोथिंबीर, कांदा वगैरे... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by शितल

मात्र मिसळीचा तो तर्रीदार कट.. वरदाच्या घरीच करावा लागे. त्याचा मसाला नेऊ वाटून पण तिथे तयार करू? चालेल ना वरदा?? आम्ही पण अडीच .. म्हणजे मी, नवरा आणि अथर्व (वर वर्षे ४) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सह्ही मज्जा येईल.... हो खरय जरा बेरीज करुयात किती जणं आहे त्याची...मग मलाही पार्टी सिटीत जायला बरं :) मी घरी आइस्क्रिम किंवा कुल्फी करेन, कशी आहे आयडीया? (पेठकर काका रेसिपी द्याल ना मला पण?) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

अग मीच करते तुला फोन कारण उद्या कदाचित आमचे बोस्टन आहे आणि तु कुल्फी /आईस्क्रीम करणार आहेस ना पहिलीच वेळ असेल तर नको :) काय ग बळीचा बकरा बनवते काय ;) (ह.घे.)

In reply to by शितल

मी कुल्फी बनवली होती आधी पण घरातच कारण ८ कुल्फ्यांचा साचा आहे..म्हणून म्हटलं त्याचं डब्यात आईस्क्रीम करु शकेन कदाचित्... नाहीतर आहेच इंडीयन शॉप्स्..सरळ घेऊन येईन ;) तुझ्याकडे मेनू ची आणखी काही आयडीया आहे का? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्रॉब्लेम मुळे माझ्या घरी जमू आणि संध्याकाळी मला पासेस मिळाले तर कम्युनिटी बीच वर जाऊ....ठरलं तर..ओके? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

हे चालेल वरदा... पावभाजी आणि मिसळ आणि मग आइस्क्रिम... छे कधी तो २६ जुलै उजाडणार?? 8> - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by यशोधरा

यशोधरा ताई, हा घरचाच कार्यक्रम आहे. येऊ काय विचारता... तुम्ही किती लोक आहात ते फक्त सांगा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अग ती बेगलोर ला आहे. ती माझ्यावर जरा नाराज झाली आहे तीला सोडुन कट्टआ करतो य ना :) काय ग यशोधरे. बरोबर ना

प्राजु त्याआधी आपण भेटु एकदा नाही तर मिसळ फक्त तु, मी आणि वरदा तीघीच स॑पवायतो. काय म्हणतेस ;)

In reply to by शितल

या रविवारी जर काही तुझा आणि माझा दुसरा प्रोग्रॅम नसेल तर आपण भेटू... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजू, मला ताई म्हणालीस तर मी तुला आज्जी म्हणेन.... :> मी मजा केली गं, मी बंगळुरुला असते, आता तिकीट, व्हिसा वगैरेची व्यवस्था केलीस तर येते बापडी, तुझा आग्रहच असेल तर!! ;;)

:) हो गं, जरुर.

खरच तु आलीस की करु पुन्हा कट्टा मज्जा येईल... सगळेजण प्लीज व्यनि मधे किती माणसं आणि एमेल आयडी टाका ना...मी ग्रुप एमेल टाकते म्हणजे... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मेल आय्-डी आणि आपल्या बरोबर येणार्‍या लोकांची संख्या पटापटा कळवा रे वरदाला. अरेंजमेंट्स करणं सोपं जातं. एवढी लोकं जमणार म्हणल्यावर कट्टा नीट व्हायला हवा ना? चतुरंग

In reply to by चतुरंग

कुणीच कळवत नाहीये.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

२६ ला जरा घाई होईल पण ठीक आहे. :) मिसळीसाठी काहीही करायला तयार आहे.. :) पुण्याचे पेशवे

मिपाच्या इस्ट कोस्ट कट्ट्याला माझ्या मनापासुन शुभेच्छा! मिसळ चापा! पावभाजी खा! मजा करा! (शुभेच्छुक) टिंग्या अवांतर - दि. २१-२२ जुलैला युकेमध्ये मिसळपावचा एक मायक्रो मिनी कट्टा आयोजित केलेला आहे! इच्छुकांनी त्वरित नावनोंदणी करणे. आपला, टिंग्या अध्यक्ष/संयोजक, मिसळपाव मायक्रो मिनी कट्टा क्र. २ युनायटेड किंगडम अतिअवांतर - मज्जाए नै, एकाच आठवड्यात दोंदोन कट्टे :)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

कट्ट्याचा स्वतंत्र धागा सुरू करून चर्चा करावी. इस्ट कोस्ट्च्या चर्चेमध्ये लिहू नये अशी त्या मायक्रोमिनी कट्ट्याच्या अध्यक्षांना विनंती.. (ह्.घ्या.) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजु झ्याक गं आपल्याला अस्संच हाकलवलं होतं गेल्यावेळी सगळ्यांनी.....:)))) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु आणि शितल : कोल्हापुरी मिसळ चतुरंगः पेठकर काकांची चीझ पावभाजी अनामिकः आम्रखंड अजून आयडीया टाका "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

बहुतेक हा कट्टा हुकेल. पण आलो तर मी एकटाच येईन. तसा मी खायला फार नाही... (व्यायामाचा कंटाळा करतो तेव्हा भुईला भार होतो खरा.) व्यनि ने माहिती मागवून घेतो. कट्ट्यापूर्वी एक आठवडा आधी तरी नक्की हो-नाही कळवतो.

कट्ट्याला खूप खूप शुभेच्छा! फोटो आणि वृतांत नंतर द्या रे कोणीतरी म्हणजे तेवढीच दुधाची तहान ताकावर.. स्वाती

मिसळपाव इस्ट कोस्ट कट्ट्याला माझ्या मनापासून शुभेच्छा! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

नक्की टाकू व्रुत्तांत.... स्वाती तू केलेयस मिसळ? मस्तच दिसतेय... मनस्वी ती फुलं खूपच आवडली...:) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

मिसळ आणि फुलं दोन्ही मनस्वीचीच आहेत ग..:)चाफा आहे ना मनस्वी ?छान दिसतो आहे गुच्छ! आणि मिसळीने तर खवळलं की तोंड..

वरदा मॅम, इस्ट कोस्टच्या कट्ट्याला सर्व बीग-बी जमताहेत, तेव्हा कट्ट्याला आमच्या सही दिलसे शुभेच्छा !!! कुछ हटके कट्टा करो यार !!! शेरोशायरी, कविता, साहित्य, माणसं या बद्दल भरभरुन बोला :) वृत्तांत डिटेल द्या, जसे, पहिल्यांदा कोण आलं, किती वाजता, सुरुवातीला काय बोलणं झालं, चवीला विषय कोणते होते. खाणं काय झालं, (पीणं नक्कोच ) आणि प्लीज हसरे फोटो टाकायला विसरु नका :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काम कुणाकडे देऊ सांगा बरं? सगळेच छान लिहितात्....(अर्थात मी सोडून) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

इस्ट कोस्टच्या मिपाकरांना माझ्या शुभेच्छा !!!!! सर्वांचे फोटो पाहण्यास उत्सुक.. :) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

येस्स फोटो टाकू लगेच.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मी तमाम मिपाकरांना अशी खात्री देते की, हा इस्ट कोस्ट स्पेश्शल कट्टा.. एकदम हटके असेल.. न भूतो न भविष्यती.. खाणेही भरपूर पिणे फक्त कोकसारकेह सोफ्टड्रींक्स.. ताक इ. आणि भरपूर् खेळ, गाणी, साहित्यावर गप्पा गोष्टी... आय बेट यू ऑल.. हो ना वरदा?? :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

नक्की...ते फक्त साहित्यावर गप्पा गोष्टी मधे माझी जरा बोंब असेल स्वगतः बघ वरदा आई लहान पणापासून सांगत होती जरा वाचन कर पण नाही आता बस... आणि मला ' वरदा मॅम' अहो का वाट लावता माझी? :( प्लीज वरदा म्हणा फक्त.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by प्राजु

खाणेही भरपूर पिणे फक्त कोकसारकेह सोफ्टड्रींक्स.. कोकसारखे सॉफ्टड्रिंक्स? धत तेरीकी, मग काय उपेग?...! :)

In reply to by विसोबा खेचर

आम्ही 'सात्विक' कट्टा किती छान असू शकतो ते करुन दाखवणारे..पहा तुम्हाला आवडेल नक्की.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by झकासराव

आता कट्टा अजुनच 'झकास' होईल "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मिपाच्या इस्ट -कोस्टच्या कट्टयाला शुभेच्छा! कट्टा जवळच, म्हणजे न्यूजर्सीला असूनही मी येऊ नाही शकणार, याचे वाईट वाटते आहे. मजा करा (करालच म्हणा, ते सांगायला नकोच!) आणि लवकर भेट होईल अशी आशा आहे.