Skip to main content

वा!!!

लेखक पोष्ट मन यांनी शुक्रवार, 10/10/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
वा वा! फारच सुरेख चाललय स्थळ. मधे जरा बघता आलं नाही म्हणुन चुकल्या चुकल्या सारखच होतय. पण पुर्वीची मजा नाय राहिली बॉ. "खरवस घ्यायला जाणे","पाठिला साबण चोळणे " वगैरे कमी झालय कि काय? हेच करायच होतं तर सवता सुभा कशाला मांदला देव जाणे. आणखी काय मग? ग्रामीण भाषेचा आव आणुन ग्राम्य बोलणं कसं सुरु आहे? वर्षभर तगलात म्हणजे मोठिच गोष्ट म्हणायची. बाकी, दसर्‍याच्या पुनश्च शुभेच्छा. हाल हवाल कळवत रहा. स्वतः टपरीवरचे असलात तरी तुमचं आमच्यात स्वागतच आहे. सभ्य माणसात आलात(किंवा नुसतच माणसात आलात) तर जरा बरं होइल.

कृतार्थ जोडी

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 10/10/2008 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
कृतार्थ जोडी ==================== त्या तिकडच्या ग्रहमालेत एक सूर्य विझायला आलाय जळून जळून फुललेला निखारा अंमळ जरा पसरलाय. आतापर्यंत जळतच राहिलो आतापर्यंत जाळतच राहिलो मनातल्या मनात उजळणी करतोय गरगर फिरणारी पृथ्वी कौतुकाने पहातोय. त्याच्याच वयाची म्हातारी ती चाल तिची ही मंदावलीये खूप फिरले म्हणत तीही जरा टेकलीये तुझ्या भोवती फिरणारी मी ही भिंगरीच होते एक फेरा घेता घेता शेकडो वेळा गरगरले म्हणत कबुली देतीये. पिल्ल पाखरं उडून गेली त्यांनी त्यांची दिशा धरली कृतार्थ जोडी बोलतीये उरले सुरेल क्षण संगतीने जगतीये त्या तिकडच्या सूर्यमालेतली रात्र केव्हाच मागे पडलीये. ===================== स्वाती फड

आई

लेखक शर्मीला यांनी शुक्रवार, 10/10/2008 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
आई जगात सगळीकडे जिचा निवास देवापुढे जिला आद्य स्थान प्रसिद्ध आहे जी जगाची राणी ती म्हणजे तुमची -माझी आई कधी डोळयातील अश्र होऊन भिजुन जाईल. कधी तलवारीची धार बनून चमकून जाईल. कधी ढगातून वीज होऊन गरजेल. तर कधी चंदन होऊन झिजेल. पण आपल्या पिल्ल्याच्या सुखासाठी झटेल अशी तुमची-माझी आई.......... तिची माया व्यापणार नाही सागरातील पाणी . तिची सर नाही अंधारातुन प्रकाशाकडे नेण्यार्‍या ज्योतीला तिच्या हदयाची उपमा नाही झाडावर उमललेल्या फुलाला ती जवळी नसते तेव्हा मोल वाटत तिच्या नसण्याचं सागरतील अमर्याद लाटांची गणना होईल पण आईचे ऋण ना फेडता येईल. अशी धन्य धन्य ती त

काव्य

लेखक शर्मीला यांनी शुक्रवार, 10/10/2008 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रेम केलय तुझ्यावर फक्त तुझ्यावर फक्त तुझ्यावर या वेड्या आशेने की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर संपुर्ण तन-मन-धन लावून तुला लिहिल मनातल्या विचाराना व्यासपीठ दिधल फक्त एका वेड्या आशेने की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर लिहिन ही तुला वाचीन ही तुला आठवणीत साठवीन ही तुला तु फक्त एकदा हसून दाखव मला मी प्रेम केलय तुझ्यावर फक्त तुझ्यावर फक्त तुझ्यावर या वेड्या आशेने की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर सुरुवात ही तूच जीवन ही तूच शेवट ही तूच अशीच
Taxonomy upgrade extras

हाडंबिंड-दातबीत अनुभव

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 10/10/2008 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मिसळपाववरील सन्माननीय आणि उच्चविद्याविभुषित मंडळींपैकी कोणाचा "हाडंबिंड-दातबीत तुटणे/मोडणे " अशा गोष्टींवर खरोखर विश्वास आहे का? मी स्वत: एक व्यावसायिक "डेंडल अँड बोन इंशुरेंस एजंट"(दंत व अस्थी विमा एजंट) असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर.... तुम्हाला कधी अशा हाडं तोडणार्‍या आणि दात पाडणार्‍या शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का?

एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 10/10/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस : रामाच्या रुपाने विश्वातल्या चांगल्या शक्तींनी रावणाच्या रुपातल्या वाईट, अमंगल शक्तींवर विजय मिळवुन आपल्या विजयी सेनेसह भारत भुमध्ये प्रवेश केला तो ... विजयादशमीचा ... स्थळ : आर्यांचा देश .... जर्मनी ! अजुन विस्तारात सांगायचे म्हटले तर माझ्या आस्थापनाचे कार्यालय ... वेळ : दुपारी १ वाजल्यानंतर संध्याकाळी ६ पर्यंत .... आज सकाळपासुनच खुप उत्साहात आहे, आजचा दिवस दसर्‍याचा, सण हा "आनंदाचा, मांगल्याचा, आप्तजनांना शुभेच्छा व आपट्याची पानेरुपी सोने" देण्याचा. अतिशय उत्साहात सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्या व रुटीन कामाला सुरवात झाली.

ससा आणि कासव..???

लेखक येडा खवीस यांनी शुक्रवार, 10/10/2008 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
्नमस्कार मित्रांनो, लहानपणी ऐकलेली "ससा आणि कासवा"ची गोष्ट तुम्हाला माहिती असेलच!! आयुष्यात आपण बरेचदा दोन्ही रोल करत असतो.

जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना भावपुर्ण श्रध्दांजली

लेखक मिंटी यांनी शुक्रवार, 10/10/2008 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना श्रध्दांजली........ जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे (वय ८३) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे साडे तीन वाजता निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या मागे मुलगा कॅप्टन सनत कुमार, सुन शमा असा परिवार आहे. दुपारी दीड वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रोहिणीताईंनी नेत्रदान केले होते. पंडिता रोहिणी यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली.

पुन्हा कोसळला सेन्सेक्स ?

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 10/10/2008 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा कोसळला सेन्सेक्स ? अर्थव्यवहार गुंतवणूक अर्थकारण राम राम मंडळी आज सकाळी शेअर बाजार उघडल्यावर सेन्सेक्स १००० अंशानी कोसळला आता मार्केट कसे आणि कोठे जाईल याचा काय परिणाम होईल.

गाणी अंगणातली, गाणी माजघरातली, गाणी तीन सांजेची... (१)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 10/10/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला हे गाणं जसं दिसलं, जसं भावलं, जसं कळलं तसं मी लिहिलं आहे. ते चूक की बरोबर हे मला माहीत नाही! एकतर आपल्याला काव्यातलं फारसं काही कळत नाही मग उगाच खोटं कशाला बोला! :) हां, त्याला एकदा सुरांचा साज चढला की माझी थोडीफार मैत्री होते काव्याशी! तीसुद्धा अगदी माझ्यापुरतीच..! :) नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे.. हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं! डौलाने हाक जरा आज नांव रे..! मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी!