पाउस (देवद्वार छंद)
वीज भारलेला
गंध दाटलेला
आसमंत ओला
आसावला |
तेज सौदामिनी
चमकते नभी
जळ कृष्णमेघी
साचलेले |
बेभान हा वारा
रानात भरारा
घुसळतो सारा
चराचरा |
टपोरे टपोरे
थेंब पावसाचे
झेलीत हा नाचे
मोर रानी |
अंग अंग ओले
धरतीचे झाले
नभ ते झुकले
भेटीसाठी |
विशेष
मिसळपाव
