Skip to main content

पाउस (देवद्वार छंद)

लेखक मनीषा यांनी रविवार, 09/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वीज भारलेला गंध दाटलेला आसमंत ओला आसावला | तेज सौदामिनी चमकते नभी जळ कृष्णमेघी साचलेले | बेभान हा वारा रानात भरारा घुसळतो सारा चराचरा | टपोरे टपोरे थेंब पावसाचे झेलीत हा नाचे मोर रानी | अंग अंग ओले धरतीचे झाले नभ ते झुकले भेटीसाठी |

वाचने 3661
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

ख ल्ला स ! (पण छंद सुटलाय बर्‍याच ठिकाणी. दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळींचे यमक होत नाही...मास्तर कान धरणार आता तुमचा!!!)

मजा आली वाचायला.

वा वा, कविता आवडली. छान लिहिली आहे. आपला, (आनंदित) धोंडोपंत अवांतर - वर्गात असे हुशार विद्यार्थी असतील तर शिक्षकांना किती समाधान मिळत असेल. आमच्या एकाही मास्तराला आम्ही हा आनंद आयुष्यात मिळू दिला नाही. आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

In reply to by धोंडोपंत

---श्रेय उत्तम शिक्षकालाच ..

सुन्दर कविता !

अतिशय सुरेख निसर्ग कविता...! :) तात्या.

काव्य हे वाचून एका नजरेत झालो मी चकित, मंत्रमुग्ध|

टपोरा टपोरा एकेक हा शब्द करी मज लुब्ध देवद्वार -('मिसळ'लेला) ऋषिकेश