Skip to main content

तुझ्या मनात

लेखक जागु यांनी सोमवार, 06/04/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
आले होते सहजच तुझ्या मनात फेरफटका उगाच मारायला किती खोल आहे तुझ मन ते आत डोकावायला गांगरून गेले आत मी कुठल्यातरी कोड्यात फसले मी कोड्यात होती खुप घरं प्रत्येक घराला वेगवेगळे रंग प्रत्येक घराला वेगवेगळे रस्ते मध्येच कुठे कुठे बांधही घातलेले घर होत प्रतिष्ठेचं, कर्माचं खुप उंच आणि पसार्‍याचं घर होत आत्पेष्टांचं, मैत्रीचं जिव्हाळा आणि कर्तव्याने भरलेलं एक होत तुझ्या छंदाच, स्वप्नांचं सुबक पण कुंपण घातलेलं एक होत सामाजीक बांधिलकीचं गोर गरीबांच्या आश्रिवादाचं त्यातच एक घर माझही होतं सुंदर, प्रितीने सजवलेलं प्रेमाच्या बगिच्याने फुलवलेलं कोड्याचा रस्ता सुटणारं.
Taxonomy upgrade extras

अहिराणी हिरा.

लेखक जिवाणू यांनी सोमवार, 06/04/2009 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मी ऐकलेल्या, वाचलेल्या आणि पाहीलेल्या (नव साहित्यिकांनी केलेले) अहीराणी साहित्यात मला फ़ार रस वाटत नव्हता. मी तसे फ़ारसे नविन साहित्य वाचलेलं नाही किंवा वेळ मिळाला नाही ही दोघेही कारणं १०० % खरी आहेत. पण २००७ च्या दिवाळीत मला अहिराणी भाषेतली जादू कळली. मी दिवाळीत पिंगळवाड्याला (अमळनेर जि. जळगाव.) गेलो होतो. तिथे मी जत्रा , तमाशा ह्या गोष्टी फ़ार जवळून पाहील्या, तसा जत्रेशी माझा परीचय लहानपणापासुनच आहे. पण काही गोष्टी मला तेव्हा वर्ज्य होत्या त्या म्हणजे तमाशा इ. पिंगळवाडे गाव तसे लहान पण दिवाळीत तेच गाव पाच पटीनी वाढलेलं वाटायचे, याचं कारण म्हणजे भवानी देवीची जत्रा.

ऐका 'मिटींग देवी', तुमची कहाणी

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 05/04/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका ’मिटींग देवी’, तुमची कहाणी कलियुगात भूतला वर भारतवर्षात एक आटपाट नगरी होती. तिचे नाव मायानगरी. नगरी मोठी नामी. टोलेजंग इमारती, चकचकीत कचेऱ्या, सुसाट धावणाऱ्या गाड्या, भिरभिरणारी विमाने, सर्पटणाऱ्या आगगाड्या, कोलाहल आणि गर्दीचे राज्य होते. या मायानगरीत एक बुद्धीचाकर राहत होता. त्याचे नाव दिनु. दिनु मोठा कष्टाळु. शिक्षण झाले, दिनु नोकरीला लागला. दिनु होता प्रामाणिक आणि मेहेनती. तो आपले काम चोख बजावित करीत असे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे असा दिनु. नित्याप्रमाणे एप्रिल मास उगवला. दिनु ने नोकरी देवीची मनोभावे प्रार्थना केली, ’हे नोकरी देवी, यंदा तरी प्रसन्न हो!

१५०० अब्ज डॉलर !

लेखक दशानन यांनी रविवार, 05/04/2009 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंदीने अमेरिकेचा गळा काय आवळला, अमेरिका एकदम जमीनीवर आली, आपल्या पैशाला लागलेली गळती थांबवण्यासाठी ओबामा ने अनेक पाऊले उचलायला सुरवात केली व त्याच बरोबर भारतात सार्वजनिक निवडणूकीचे वारे वाहू लागले होते, व ओबामाला एक महत्वाचा मुद्दा कळाला जो मुद्दा भारतात राजीव गांधीच्या बोफोर्स लफड्यापासून शेबंड्या पो-याला ही माहीत आहे तो म्हणजे स्वीस बॅंकेतील काळा पैसा ! मंदीवरील एक उपाय म्हणून ओबामाने स्विस बैंकेमध्ये असलेल्या अमेरिकन खात्यांची माहीती मागवण्याची चाल खेळली, थोडासा दबाव टाकून स्विजरलैंड ला मजबूर केले की लिस्ट जाहीर करण्यासाठी.

स्टफ मेथी पराठे

लेखक chikusi यांनी रविवार, 05/04/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : 1 मेथीची जुडी, डाळीच पीठ, फोडणीचे साहित्य, कणीक, मीठ, तिखट, 7-8 लसूण पाकळ्य कृती : मेथीची जुडी धुवून व बारीक चिरून घ्या. तेल तापवत ठेऊन त्यात मोहरी ठेचलेला लसूण, हिंग, हळद, मेथी, मीठ, तिखट घाला. भाजी परतून कोरडी झाल्यावर त्यात डाळीचे पीठ घाला. भाजी थोडी शिजवा, थंड करा. 10-12 मध्यम आकारच्या पोळ्यांसठी लागणारी कणीक, मीठ व मोहन घालून घट्ट भिजवा. नंतर दोन पुर्‍या लाटून एका पुरीवर मेथीची भाजी घालून त्यावर दुसरी पुरी ठेऊन घट्ट दाबून घ्या. हलक्या हाताने पीठ लाऊन प्रते लाटा. दही, चटणी, तूप, लोणी बरोबर पराठे खाण्यास द्या.

रॅगिंग !!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 05/04/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
शासनाने कडक नियम करूनसुद्धा रॅगिंगने नुकतेच पुन्हा काही बळी मिळवले आहेत. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून माझ्याही रॅगिंगविषयी काही आठवणी जाग्या झाल्या. अर्थातच आता सगळेच हास्यास्पद वाटते, वाटतं की तेंव्हा उगीचंच आपण इतके घाबरलो, पण फर्स्ट इयरला 'सिनियर' म्हटले की पोटात गोळा उभा राह्यचा. त्यातून फायनलमधल्या एका किडकिडीत सरदारजीचा दरारा खूपच होता. सगळे हॉस्टेलाइट्स चळचळ कापत असत. तो मध्यरात्री सगळ्यांना फक्त बनियन-चड्डीवर भर पुणे-बंगळूर हायवेवर नेत असे व एखादी बस जवळून पास झाली की सगळ्यांना कोरसमध्ये 'हम सब चूत्ये हैं ! अशी गर्जना करायला लावीत असे.

खजुराचे सरबत

लेखक chikusi यांनी रविवार, 05/04/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
विभाग : पेय किती जणांसाठी : १ एकुण लागणारा वेळ : खज़ुर भिजायला ३ तास, नंतर ५ मीनीटे. साहित्य : ७/८ बीया खज़ुर, ८/१० मनुका. कृती : खज़ुर व मनुका स्वच्छ धुवुन घ्या. स्वच्छ पाण्य़ात भीजत घाला. ३ तास भीजल्यानंतर हाताने सोलून घ्या किंवा मीक्सरमधून फीरवून घ्या. गाळून प्यायला द्या. टिप : हे एक स्फुर्ती पेय आहे दक्षता : मीक्सरमधून फीरवतना प्रथम खज़ुरातील व मनुकांमधील बीया काढून टाका.