Skip to main content

उन्मनी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 08/04/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या आठवात मन चैत्रपालवी धुंद मोग-याचा गंध लपेटून प्रीत जागवी तुझ्या विरहात मन वैशाखवणवा जळे तनमन, आसुसला प्राण शोधतो गारवा तुझ्या चिंतनात मन आषाढमाया शामरंगी घन आभाळी रेखिती काजळछाया तुझ्या संगतीत मन श्रावणहिंदोळे भिजल्या मातीत हिरवा अंकुर उघडतो डोळे तुझ्या सावलीत मन शरदचांदणे सावळ्या रात्रीच्या अंगांगी फुलली लक्ष गोंदणे तुझ्या प्रणयात मन रंग फाल्गुनी घननीळा, तुझ्या रूपात विरली राधा उन्मनी

कामवाली!

लेखक उमेश कोठीकर यांनी बुधवार, 08/04/2009 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
होती गरीब कष्टमूर्ती ती साधी निरागस कामवाली पती मुले आयुष्यच सर्व कष्टांचा ती डोंगर झेली! नाही दिवाळी! नाही दसरा हौस मौज ना ईच्छा काही पती दारूडा! नरकयातना! वीजवेदना! चमकून जाई होती शहाणी! म्हणे हळूच ती मुले माझी शिकतील ताई मोठ्ठे होतील तुमच्यासारखे! नको देवा! दुसरे काही! मोठ्ठे मोठ्ठे डोळे करून ती कौतुक सांगे काय बाई! वळ माराचे लपवून पदरी! काम करी! सांगे ना काही! स्वप्न्!नशीब!आयुष्यही फुटले! लपवे ती अश्रूंचे पाट! असीम कष्टा फळ मिळे ते दारूचाच घमघमाट! झोपड्पट्टीत गलका झाला! खिडकीत वाकून! काय झाले? कळले आता दारूड्याने कामवालीला ठार मारीले! काळीज चर्र!
Taxonomy upgrade extras

भूकंपप्रवण क्षेत्रात घेण्याची काळजी

लेखक चित्रा यांनी बुधवार, 08/04/2009 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच झालेला इटालीमधला भूकंप हा तेथील २००-२५० लोकांचे बळी घेऊन गेल्याचे बहुतेकांनी वाचले असेल. याआधी अनेकांना आठवतील ते भूज आणि लातूरचे भूकंप तर हजारोंचे बळी घेऊन गेले. लातूर येथील भूकंपात जवळजवळ आठ-दहा हजार लोक मृत्यू पावले, ३० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आणि भूज येथील भूकंपात सुमारे २०,००० लोक मृत्युमुखी पडले, ३ लाख इमारतींची हानी तसेच वित्तहानीही प्रचंड झाली असे सांगितले जाते. याखेरीज येथील पशुधनाचा (गाई/शेळ्या/मेंढ्या/कोंबड्या) मोठ्या प्रमाणावर नाश झाला आणि त्यामुळे या प्राण्यांवर ज्या लोकांचे पोटपाण्याचे उद्योग अवलंबून असतात अशा लोकांचेही अतीव नुकसान झाले असे ऐकले आहे.

<बाई मी पळाली (एक वैताग विडंबन)>

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 08/04/2009 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: मुखदुर्बळ यांची ही कविता कृ. ह. घ्या. बाई मी गेले मिसळपाववर लेखणी घेऊन लिहायला काव्यविभागात कविता सुचली भुंगा डसल्यासारखी लिहित सुटली…. बाई मी गेली पाकृ विभागात घेऊन लाटणे हातात कमीन्या साखरेची बरणीच फुटली सोडली साखर नी पळत सुटली…. बाई मी गेली काथ्याकुटात पास नाय मिळाला प्रतिसादाचा रस्त्यात कंपुबाजांची गर्दी दिसली कुटला काथ्या अन पळत सुटली….. बाई मी गेली साहित्य विभागात पदर खोचुन टीका करायला पाचकळ लेखांनी नजर विटली सोडलं साहित्य नी पळत सुटली…..
Taxonomy upgrade extras

योग्य-अयोग्य

लेखक yogeshwar patil यांनी बुधवार, 08/04/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्व:ताला सेक्युलर म्हणत फिरानार्य कांग्रेस पक्षाला काल जोड्याचाच आहेर भेटला. पण यावर निरनिळ्या शंका आता लोक घेऊ लगले अहेत. पण मला पड्लेले प्रश्न हे कि हे सर्व_______ १)हा चुकीचा पायंडा आहे या पुढे लोक हाच मार्ग अवलंबण्याची भीती आहे का ? २)की टायररला सीबीआई कडून clean cheat घेउन कांग्रेस केलेल पाप होय?

लक्ष्मीकमळ (फोटो अद्ययावत)

लेखक मि.इंडिया यांनी बुधवार, 08/04/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
(फोटो अद्ययावत केले आहेत. पिकासा वरून अडचण येत होती त्यामुळे फ्लिकरला टाकले आहेत. तसदीबद्दल क्षमस्व.) सर्वसाधारणपणे आपल्याकडे water lilly ला कमळ म्हटले जाते. पण Lotus म्हणजे कमळ हा प्रकार वेगळा असतो. याची पाने पाण्यालगत न वाढता हवेत जवळजवळ ३ ते ४ फूट उंच वाढतात. जवळजवळ दीड वर्षांनी माझ्याकडे कमळास फुले आली आहेत. प्रदीप

वसंतपालवी

लेखक जयवी यांनी बुधवार, 08/04/2009 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं आयुष्य दोन समांतर रेषा कधीही न भेटणार्‍या तरीही भेटलोच की... एका सुरेख वळणाने नकळत बदललेल्या वाटेने... अचानक दिसलीस आणि अभावितपणे मी चालू लागलो तू तुडवलेली तीच उष्टी वाट. तू मात्र मग्न होतीस स्वतःच्याच विश्वात खरे भाग्यवान ते होतीस ज्यांच्या सहवासात. तुझा तो बहरही मी अनुभवायचो तुझी तृप्ती दुरुनच बघायचो तुझा सभोवतालचा बघून वावर लाघवी माझ्या वसंतालाही फुटायची थोडीशी पालवी कधीतरी बघशील या पाऊलखुणा मान वळवून तुझ्या मागे मागे डोळे बंद करुन चाललेल्या... कधी घेशील मागोवा माझ्या अस्तित्वाचा... लागेल कधी सुगावा माझ्या झुरण्याचा.. कधी जाणवतील तुला ही स्पंदनं.. तुझ्या फक्त नजरेनीही उठले
Taxonomy upgrade extras

द शॉशँक रिडेम्शन

लेखक सुमीत भातखंडे यांनी बुधवार, 08/04/2009 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
१९९४ साली रिलीज झालेला, आणि आज एक क्लासिक म्हणून मानला गेलेला एक अप्रतिम चित्रपट. टिम रॉबिन्स आणि मॉर्गन फ्रीमन यांच्या अप्रतिम अभिनयानी नटलेला असा हा एक सर्वांगसुंदर चित्रपट आहे. कथानायक अँडी डूफ्रेन (टिम रॉबिन्स) याने शॉशँक स्टेट प्रिझन मधे घालवलेला जवळ्-जवळ २० वर्षाचा काळ, आणि तिथे त्याला करावा लागलेला अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना, आणि "Fear Can Hold You Prisoner, Hope Can Set You Free" ही टॅगलाईन सार्थ ठरवणारा सुरेख शेवट, हे या चित्रपटाचं मुख्य कथासुत्र. कथेचा थोडक्यात सारांश असा: साल १९४७.

गणपतीपुळे आणि मार्लेश्वर

लेखक दिपक यांनी बुधवार, 08/04/2009 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या विकांताला मार्लेश्वर आणि गणपतीपुळ्याला मित्रमंडळीबरोबर गेलो होतो.