मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<बाई मी पळाली (एक वैताग विडंबन)>

मराठमोळा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रेरणा: मुखदुर्बळ यांची ही कविता कृ. ह. घ्या. बाई मी गेले मिसळपाववर लेखणी घेऊन लिहायला काव्यविभागात कविता सुचली भुंगा डसल्यासारखी लिहित सुटली…. बाई मी गेली पाकृ विभागात घेऊन लाटणे हातात कमीन्या साखरेची बरणीच फुटली सोडली साखर नी पळत सुटली…. बाई मी गेली काथ्याकुटात पास नाय मिळाला प्रतिसादाचा रस्त्यात कंपुबाजांची गर्दी दिसली कुटला काथ्या अन पळत सुटली….. बाई मी गेली साहित्य विभागात पदर खोचुन टीका करायला पाचकळ लेखांनी नजर विटली सोडलं साहित्य नी पळत सुटली….. बाई मी गेली कौल विभागात सोबत घेऊन पावट्याला वाटेत त्याला खबर भेटली तिकडं कवितेची विडंबनं पडली…… संस्थळ सोडलं नी पळत सुटली…… चू भू द्या घ्या ;) ;) आपला, मराठमोळा

वाचने 3460 वाचनखूण प्रतिक्रिया 14

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 08/04/2009 - 18:48
मेलो,वारलो,ग॑गेत मिळालो... हा हा हा हा .. सुहास सुहास

प्राजु 08/04/2009 - 19:00
धन्य आहात.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by नरेश_

मराठमोळा 09/04/2009 - 17:29
>>पावट्या ही उपाधी मला तर नाही नरेशभौ, पळालेली बाई आणी पावटा कवितेतील दोन्ही पात्र काल्पनिक आहेत त्यामुळे काळजी नसावी. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

क्रान्ति 08/04/2009 - 21:24
हा ऑनलाईन हास्य क्लब तर नाही? =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

निशिगंध 08/04/2009 - 22:34
लय भारी............. =)) =)) =)) =)) =)) =)) _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

सँडी 09/04/2009 - 06:13
हाहाहाहा... जबरी! -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

केदार_जपान 09/04/2009 - 06:30
टांगा पल्टी--घोड फरार... :) पाचकळ लेखांनी नजर विटली सोडलं साहित्य नी पळत सुटली….. हा हा हा हा.... गडाबडा लोळलो ;) -केदार

राघव 09/04/2009 - 07:34
मस्त रे.. =D> चालूच आहे का अजून तुझं विडंबनाक्रमण?? ;) म्हणे ट्रेनिंग ला गेलाय.. च्यायला.. लोकं ट्रेनिंगमधे काय काय करतात... =P~ राघव