बाई मी पळाली (एक वैताग कविता)

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
8 Apr 2009 - 12:05 pm

(शहरातल्या स्त्रीची व्यथा मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न )

बाई मी गेली मॉलला
कार्ड घेऊन खरेदीला
मॉलच्या बाजुला ऑफर दिसली
भुंगा डसल्यासारखी पळत सुटली….

बाई मी गेली ड्रायव्हींग्गला
घेऊन पीयुसी हातात
कमीन्या गाडीची काचच फुटली
सोडली गाडी नी पळत सुटली….

बाई मी गेली डीस्कोला
पास नाय मिळाला पबचा
रस्त्यात श्रीरामसेनेची गर्दी दिसली
डीस्कोला न जाता पळत सुटली…..

बाई मी गेली मल्टीप्लेक्स्ला
तिकिट काढून थिएटरला
रामूच्या सिनेमानी नजर विटली
सोडला सिनेमा नी पळत सुटली…..

बाई मी गेली पार्टीला
सोबत घेऊन नवर्‍याला
वाटेत त्याला खबर भेटली
इन्कम टॅक्स ची रेड पडली……
डोकं धरलं नी पळत सुटली……

चू भू द्या घ्या

जीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

सँडी's picture

8 Apr 2009 - 12:08 pm | सँडी

मस्त मस्त!
अयशस्वी प्रयत्न चांगला झाला...:)
लिहित रहा.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

नरेश_'s picture

8 Apr 2009 - 12:15 pm | नरेश_

सहमत !!!!!!!
अवांतर : शहरी नवर्‍यांना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते ;)

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

जागु's picture

8 Apr 2009 - 12:16 pm | जागु

बाई मी गेली पार्टीला
सोबत घेऊन नवर्‍याला

बाई तुम्हाला घेऊन गेली होती का ?

मराठी_माणूस's picture

8 Apr 2009 - 12:34 pm | मराठी_माणूस

बाई मी गेली का बाई मी गेले

नरेश_'s picture

8 Apr 2009 - 12:50 pm | नरेश_

गे-ली. ;)

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

मूखदूर्बळ's picture

8 Apr 2009 - 1:00 pm | मूखदूर्बळ

'गेली' काय 'गेले' काय 'योग्य' ठीकाणी पोहोचले की झाले :SS

प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद :)

पक्या's picture

8 Apr 2009 - 1:37 pm | पक्या

आपण माबो वरील केदार (kedar123) आहात काय?
ही कविता मी इथे पण वाचली होती - http://maayboli.com/node/6914
आपल्या कवितेची जी प्रेरणा आहे त्याचा उल्लेख करायला हवा होता.

मूखदूर्बळ's picture

8 Apr 2009 - 2:35 pm | मूखदूर्बळ

मक्या नमस्कार :)

तो मीच आहे :)

मूळ कवितेचा उल्लेख अशासाठी केला नाही कारण त्याकरता तसे करण्यापूर्वी त्या कवीची परवानगी घेणे आवश्यक होते. त्याकरताच मूळ कवीतेशी संबंध न जोडता ही 'वैताग कविता' मी स्वतंत्र रचना म्हणून टाकली :)

चु भू द्या घ्या

क्रान्ति's picture

8 Apr 2009 - 9:21 pm | क्रान्ति

:)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com