Skip to main content

फिक्शन - मी त्याला चावलं

लेखक टारझन यांनी रविवार, 26/04/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
सन ३१०२ : मेचा कडक थंडीचा हिवाळा ,सगळी कडे बापे लोक .. आप्पाराव सोपानराव वाघमारे हॉस्पिटलचा परिसर, णर्सोबांची (मेल णर्स) धावपळ !! मॅटर्निटी वॉर्डचा परिसर .... मजला नंबर ४१०, रूम १२: -------------------------------------------------------------------------------------------------------- ऍकिलोप्टस आपल्या पाचव्या डिलेव्हरीसाठी आला होता , अजुन एका डिलेव्हरी नंतर त्याची ओव्हर संपणार होती . ३ वर्षांपुर्वीच ऍकिलोप्टस आणि काळूराम ह्यांचा विवाह झाला होता... आनंदात दिवस जात होते आणि ऍकिलोप्टसची एकेक डिलेव्हरी होत होती .. सगळी सरळसोट गोरी पोरं ?

तात्या अभ्यंकर्...व्यक्ति? वल्ली? विशेष? इतर प्रश्न

लेखक येडा खवीस यांनी रविवार, 26/04/2009 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, इथे मी नवा आहे. आपल्या मिपाचे मालक श्री तात्याजी अभ्यंकर या व्यक्तिविषयी माझ्या मनात गेले अनेक दिवस गुढ स्वरुपाची वलये निर्माण होतायत. हा माणुस नेमका आहे तरी कसा पार शास्त्रिय संगीतापासुन आध्यात्मापर्यंत आणि बाईबाटली( क्षमस्व!!) पासुन खवय्येगीरीपर्यंत सगळ्या विषयांना भोज्जा करुन आलेला हा अवलिया नेमका कसा आहे? तो मला प्रश्न पडलाय कधीपासुन... तात्यांचे लग्न झालय का? ( आणि नसल्यास ते अजुन का थांबलेत? आमच्यासारख्या विवाहितांच्या मत्सराचे पाश आवळले जातील बरं का) तात्यांचा स्वभाव नेमका कसा आहे?

गौडगावचा जाग्रुत मारुती

लेखक सनविवि यांनी रविवार, 26/04/2009 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आई-बाबा दर शनिवारी मारुतीला जातात. मी Agnostic Theist या categoryत मोडत असल्यामुळे मला कधी आग्रह करत नाहीत ते! पण आज म्हटलं, जाऊया आपणपण, तेवढंच सकाळी लवकर उठणं होईल! हे मंदिर अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव (बु.) या गावात आहे. सोलापूरपासून बसने पाऊण तासावर. दर शनिवारी-रविवारी सकाळी ६:२० पासून दर अर्ध्या तासाने बसेस असतात. बरोबर ७ ला पोचलो आम्ही गावात. ४:३० लाच उठावे लागले होते! माझ्या मानाने फ़ार म्हणजे फारच लवकर! पण सकाळच्या ताज्या हवेत बाहेर पडल्यावर सगळा कंटाळा पळून गेला.

आरती पालीच्या बल्लाळेश्वराची

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 25/04/2009 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
आरती बल्लाळाची (चालीसहीत) जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो देवा पालीश्वरा आरती ओवाळीतो मी तुज देवा बल्लाळा जयदेव जयदेव || ध्रु || देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडी आत असे मुर्ती शेंदरी उघडी समोर मोठी घंटा अन खांब लाकडी वर्णावया रुप तुझे बुद्धी माझी तोकडी || १ || जयदेव जयदेव || ध्रु || देवा तुझा वास असे पाली गावी तव दर्शने माझी द्रुष्टी सुखावी मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी भक्तांवर क्रुपा नियमीत असो द्यावी || २ || जयदेव जयदेव || ध्रु || पौराणीक आणि ऐतीहासीक तव ग्राम असे मंदिर स
Taxonomy upgrade extras

मी तिला वाचवलं!

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 25/04/2009 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
दवाखान्यातल्या दाई, इतर रुग्ण आणि त्यांचे नातलग या सा-यांना नवल वाटत होतं, की या कारणासाठी सुद्धा कुणाला इतका आनंद होऊ शकतो! तिच्या सासर-माहेरची सगळी मंडळी मात्र अगदी आनंदात होती. कारणही तसंच होतं, तिला पहिलंवहिलं कन्यारत्न झालं होतं. तिच्या सासरी माहेरी दोन्हीकडे मुलांच प्रमाण जास्त होतं, मुलगी ही एकटीच! त्यामुळेच अवघ्या दोन दिवसांचं ते इवलंसं गोंडस पिलू खूप कौतुकाचं होतं. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको अशी चढाओढ सुरू होती सगळ्यांची! तिलाही अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला होता. दिवसभर सासूबाई आणि रात्री आई दोघी चिमुरडीची काळजी घेत, त्यामुळे तिला निवांत आराम मिळत असे.

चर्चाप्रस्ताव- वाहतुक प्रणाली.

लेखक अभिज्ञ यांनी शनिवार, 25/04/2009 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बरेचजण कामानिमित्त वा शिक्षणानिमित्त परदेशात गेले असतील वा तिथे रहात असतील. भारतातून प्रथमच परदेशात गेल्यानंतर असंख्य वेगळ्या गोष्टी दिसतात.वेगळे प्रकार अनुभवायास येतात. सर्वात मोठा बदल दृष्टीस पडतो तो म्हणजे "वाहतुक प्रणाली" बहुसंख्य देशांमधे वाहतुक हि रस्त्याच्या उजव्या बाजुने चालत असते.ह्यात स्टिअरिंग व्हील हे गाडीत डाव्या बाजुला असते. तर भारतात व काहि तुरळक देशांमधे वाहतुक ही रस्त्याच्या डाव्या बाजुने चालत असते व आपल्याकडे स्टिअरिंग व्हील हे गाडिच्या उजव्या बाजुला असते. भारतातून परदेशात प्रथमच जाणा-याला वाहतुकीमधला हा बदल पुर्णपणे डोक्यात साठवायला किमान ३ आठवडे तरी जातात. जगात

विडंबन पुर्ण करा

लेखक निशिगंध यांनी शनिवार, 25/04/2009 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
गारवा माहीतच असेल ना...... पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. कुणाचे कीती प्रतीसाद काटायचे..

एकमत

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 25/04/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
जिंका हारा पाडा झोडा एकमताने सत्ता येता लोणी चापू एकमताने टांगायाची बाकी आहे वेशीवरती अब्रु लुटूया जत्रेनंतर एकमताने देश आमचा तरुणाईचा पहा झोपला म्हातारे पोलाद म्हणवती एकमताने सत्तेसाठी सोडले पहा कमरेचेही नागवा म्हणती समोरच्याला एकमताने सत्तेच्या सर्कशीत नाहि मजा राहिली विदुषकांनी केला गोंधळ एकमताने सारे लढती खुर्चीसाठी प्राणपणाने वार्‍यावरती देश सोडला एकमताने तरीही वेड्या आशेने मत देतो आहे राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

फिक्शन...

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/04/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
वेगाने होणारे शहरीकरण , तन्त्रज्ञानातील बेसुमार प्रगती याचा परिणाम ५० वर्षांनी (कदाचित) असा झालेला असेल.. त्यावेळच्या बाप- लेकाचे संवाद या कवितेत व्यक्त करण्याचा प्रयत्न....