Skip to main content

तात्या अभ्यंकर्...व्यक्ति? वल्ली? विशेष? इतर प्रश्न

लेखक येडा खवीस यांनी रविवार, 26/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, इथे मी नवा आहे. आपल्या मिपाचे मालक श्री तात्याजी अभ्यंकर या व्यक्तिविषयी माझ्या मनात गेले अनेक दिवस गुढ स्वरुपाची वलये निर्माण होतायत. हा माणुस नेमका आहे तरी कसा पार शास्त्रिय संगीतापासुन आध्यात्मापर्यंत आणि बाईबाटली( क्षमस्व!!) पासुन खवय्येगीरीपर्यंत सगळ्या विषयांना भोज्जा करुन आलेला हा अवलिया नेमका कसा आहे? तो मला प्रश्न पडलाय कधीपासुन... तात्यांचे लग्न झालय का? ( आणि नसल्यास ते अजुन का थांबलेत? आमच्यासारख्या विवाहितांच्या मत्सराचे पाश आवळले जातील बरं का) तात्यांचा स्वभाव नेमका कसा आहे? ( विनोदाच्या अतिरेकापासुन एखाद्या गैरशिस्त सदस्याला झोडपण्यापर्यंत उध्दट स्वभाव कसा असु शकतो बरं एखद्याचा?) तात्या काय करतात? ( म्हणजे पोटापाण्याचा उद्योग नाही....त्यांचे लिखाण वगैरे कुठे प्रसिध्द आहे का? ते कुठे भेटतात?) त्यांच्याबद्दल तुमचे मत काय आहे? ( एकंदरीत) .............हा असा विषय मांडुन मी मिपाच्या मर्यादा ओलांडत असेन तर आधिच क्षमा मागतो. विषय डिलिटला तरी चालेल पण माझे कुतुहल शमावे ही खरी अपेक्षा आहे धन्यवाद!!!

वाचने 11895
प्रतिक्रिया 62

प्रतिक्रिया

तात्यान्च गाणे ऐकायचा योग मला मात्र आलाय ;;) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

तात्या पोटासाठी एक आणि पाण्यासाठी एक असे दोन वेगवेगळे व्यवसाय करतात. आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

In reply to by पर्नल नेने मराठे

तात्या पोटासाठी एक आणि पाण्यासाठी एक असे दोन वेगवेगळे व्यवसाय करतात. आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

तात्या हा माणूस कसा आहे, खरंच सांगतो-- कळणं अवघड आहे. पाण्यातली मासोळी हाताने पकडायला वाटते सोपी, पण प्रत्यक्षात हातात गावणे फार अवघड. असेच काहीसे. फक्त मासोळीऐवजी मासोळा असे वाचावे. ;) अवांतर : ५०+ प्रतिक्रियांबद्दल आधीच अभिनंदन ;) हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

In reply to by अनंता

=D> =D> =D> =D> =D> आपला अंदाज खरा ठरला त्याबद्दल आपले अभिनंदन _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

तुम्हि दिलेली वैशिष्ट्ये ही "विसोबा खेचर" नावाच्या जालीय सदस्याची आहेत. त्याचा "तात्या" ह्या व्यक्तीच्या स्वभावाशी पूर्ण साधर्म्य असेलच असे नाहि. तेव्हा तात्या कसे आहेत हे फक्त तात्याच (काणि कदाचित अनुष्का वैनी ;) ) जाणोत (जालीय) ऋषिकेश

९८२०४९४७२० नंबरवर फोन करा. एकदा अवश्य भेटू. एका सर्वसामान्य माणसाला भेटण्याचा आपल्याला अनुभव येईल.. :) आणि एक, आमचे काही हितचिंतक, हा धागा म्हणजे खुद्द तात्यानेच स्वत:च्या प्रसिद्धीकरता केलेला काहितरी प्रसिद्धी स्टंट आहे असे म्हणून मोकळे होतील! तरी खवीसराव, आपल्याला एक विनंती. कृपया खर्‍या नावा-नंबरानिशी या धाग्यावर प्रकट व्हा म्हणजे आमच्यावर होणारा प्रसिद्धीस्टंटचा संभाव्य आरोप तरी टळेल. मराठी आंतरजालावर आम्ही पुरेसे प्रसिद्ध आहोत, लोकप्रिय आहोत, त्याचप्रमाणे आमचं नाव वाचल्यावर अनेकांच्या मस्तकाची शीर तणतणते इतपत अप्रियही आहोत! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

>>आमचे काही हितचिंतक, हा धागा म्हणजे खुद्द तात्यानेच स्वत:च्या प्रसिद्धीकरता केलेला काहितरी प्रसिद्धी स्टंट आहे असे म्हणून मोकळे होतील! , हा हा हा असे कोण-कोण म्हणू शकते, त्यांची नावे आमच्या डोळ्यासमोर आहेत. :) >>पाण्यातली मासोळी हाताने पकडायला वाटते सोपी, पण प्रत्यक्षात हातात गावणे फार अवघड. असेच काहीसे. :) सहमत आहे -दिलीप बिरुटे

In reply to by विसोबा खेचर

धन्यवाद तात्या,,,, मी मि.पा.ची सभासद आहे. पर्देशी अस्ते,,,, मि.पा. म्हन्जे आम्च्यसथि पर्वनी आहे हो,,,, पुन्हा एक्दा धन्यवाद !!!!!!!!!

तात्याने बर्‍याच प्रश्नांना बगल दिली की !! तात्या कुठे भेटतात ? ह्या प्रश्नाला कोणत्या मेडिकल स्टोअर्स मधे मिळते ही वस्तू (वल्ली) अशा अर्थाने लिवल्यागत वाटतं =)) असो !! बाकी चालू द्या

शार्दुलशी सहमत. मी परदेशी नसते, पण मिपा देशी-परदेशी सगळ्याच मराठी जनांसाठी पर्वणी आहे, हे मात्र १००% खरे! तात्यांचे शास्त्रीय संगीतावरचे काही लेख वाचायचा योग आला, आणि ते खूप आवडले. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

तात्या ):) ह्यट्स ओफ्फ ...... चुचु

हा माणुस नेमका आहे तरी कसा पार शास्त्रिय संगीतापासुन आध्यात्मापर्यंत आणि बाईबाटली( क्षमस्व!!) पासुन खवय्येगीरीपर्यंत सगळ्या विषयांना भोज्जा करुन आलेला हा अवलिया नेमका कसा आहे? तात्या इतिहासातही रमतात.

कुठल्याही व्यक्तीबद्दल - आणि तेही त्याच्या खासगी जीवनाबद्दल - चर्चा करणारा धागा काढणे मला बरोबर वाटत नाही. हजारो विषय आहेत , लेखनप्रकार आहेत , त्याबद्दल लिहीण्याची मुभा आहे. असे असताना एका व्यक्तीला अनुलक्षून नवा धागा उघडणे कशाकरता ? त्याव्यक्तीचा वाढदिवस किंवा त्याच्या आयुष्यातली एखादी महत्त्त्वाची घटना असती तर एक वेळ समजून घेण्यासारखे होते. प्रतिसाद पूर्ण. याविषयावर याहून जास्त मी बोलू इच्छित नाही.

In reply to by काळा डॉन

=)) आयला मे मुक्त ला बोल्ले रे चुचु

In reply to by मुक्तसुनीत

हेच म्हणतो. तात्याला काय प्रॉब्लेम नाही. मग मुक्त च्या शेपटावर का बरं पाय पडला? आणि मला येड्या खवीसा माहित आहे. तो काही तात्याचा डुप्लिकेट आयडी नाही. त्याला वाटलं तात्याबद्दल कुतुहल म्हणून केली त्याते चौकशी. एवढं साधं सोपं आहे. इथे मला झुंबर नावाची एक कथा आठवते. लेखक खांडेकर किंवा आनंद यादव असावेत. ही कथा ७-८ भागात लिहिली गेली आहे. हे सगळे भाग तुम्ही कोणत्याही क्रमाने वाचा, तुम्हाला प्रत्येक वेळी एक नवीन कथा सापडेल. झुंबर जसे सर्व बाजूंनी चमकते तशीच ही कथा. तात्या ही असाच आहे. त्याने आपल्या आयुष्यात इतके अनुभव घेतले आहेत की ते कसे ही मांडा.. तुम्हाला एक नवीन तात्या दिसायला लागेल. एक नवीन धाग्याचं काय घेउन बसला मुक्तभो? काही संस्थळं, काही ब्लॉग्स, तात्या ह्या विषयाला वाहिलेले आहेत.

एक नवीन धाग्याचं काय घेउन बसला मुक्तभो? काही संस्थळं, काही ब्लॉग्स, तात्या ह्या विषयाला वाहिलेले आहेत. हे बाकी खरं आहे. :) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

हे खविस म्हणजे भुतं, हड्ळींचे उद्योगपतीच ना? कधी कसली भुतं काढ्तील काय सांगता येणार नाही!

मी येडा खवीस उर्फ सचिन परांजपे रहाणार पालघर्...तात्याचा ड्युप्लिकेट नाही हे कळावे म्हणुन लिहित आहे एकाच व्यक्तिविषयी लिहावे की लिहु नये हा मलाही प्रश्न होताच्....पण तात्या ह्या व्यक्तिमत्वाविषयीच्या अपार कुतुहलापोटी कोणत्याही सणासुदीचा विचार न करता विषय सुरु केला...त्यात प्रसिध्दिचा फार्स कसला रे बाबांनो? तात्याला (आणखी) प्रसिध्दी हवी असती तर मिपावर कायमस्वरुपी एक फोटु नसता का लावता आला. एक अतिविद्वान, व्यासंगी, सर्वस्पर्शी, पारदर्शक व्यक्तिमत्व असा पडद्याआड राहु नये म्हणुन हा खटाटोप केलाय मी... पण अजुनही कोणी काहीच बोलत नाही... तात्या तुम्ही तरी निदान तुमच्या ईष्टायलीत स्वतःबद्दल बोला पण....ते अगदी अनऔपचारिक बोला, प्रोफाईल बनवल्यासारखं नको -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

In reply to by येडा खवीस

प्रसिध्दी हवी असती तर मिपावर कायमस्वरुपी एक फोटु नसता का लावता आला. अहो तात्या जिवंत आहे अजून :D

In reply to by येडा खवीस

एक अतिविद्वान, व्यासंगी, सर्वस्पर्शी, पारदर्शक व्यक्तिमत्व असा पडद्याआड राहु नये म्हणुन हा खटाटोप केलाय मी पडद्याआड.. !!!! =)) =)) _____________________________ कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

In reply to by भडकमकर मास्तर

अगदी ,अगदी!! बुरखाधारी तात्या डोळ्यांसमोर आले! ;) (मुत्तव्वा) चतुरंग

In reply to by येडा खवीस

एक अतिविद्वान, व्यासंगी, सर्वस्पर्शी, पारदर्शक याला मात्र तात्या ऑब्जेक्षन घेतील. =)) खराटा (रंग माझा वेगळा)

कसलेपण धागे काढतात. त्यापेक्षा माझे कौल बरे ! ;) ;) ;) ;) (ह. घ्या.) :B :B :B बाकरवडी :B :B :B

मिपा आवडत. तात्यान ते काढल म्हणुन तात्त्या पन आवडतात. मिपाव आल की चावडीवर गप्पा हानायला आलोत अस वाटट. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

त्यात्या , आपल्याला अनेक रूपात भेटलेला ,एक अनवट राग असावा. तो पुरता समजणेही कठीण आणि गळ्यात उतरवणेही कठीण. माझ्या सारख्या कानसेनाने तो राग, त्यातल्या बंदिशी यांचा उहापोह न करता तो कानात साठवीत जावे इतके पुरे आहे.

तात्याचं वर्णन करायचं म्हणजे एकच सांगतो की पु.ल. ना जर ही व्यक्ती भेटली असती तर त्यांच्या " व्यक्ती आणि वल्ली " या पुस्तकात अजून एक भर नक्की पडली असती. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

तात्यांच्या वर्णनासाठी.. या ओळी ( सुरेश भटांच्या ) रंगुनी रंगात सा-या रंग यांचा वेगळा , गुंतुनी गुंत्यात सा-या पाय यांचा मोकळा..

मी पण बरेच महिने मिप ची सदस्या आहे . नक्कि तात्या कसे आहेत या बाबतीतले कुतुहल मला ही आहे ..पण तात्या म्हट्लं की पांढरा शुभ्र सदर आणी धोतर नेसलेली ...चेहेर्यावर प्रेमळ पणा आणि कर्तबगारी असे मिश्र भाव असलेली घरातील वडीलधारी व्यक्ती डोळ्यासमोर येते ...

In reply to by अश्विनि३३७९

पण तात्या म्हट्लं की पांढरा शुभ्र सदर आणी धोतर नेसलेली ...चेहेर्यावर प्रेमळ पणा आणि कर्तबगारी असे मिश्र भाव असलेली घरातील वडीलधारी व्यक्ती डोळ्यासमोर येते ... वडिलधारी?? बोंबला..! :) आपला, (वयस्कर वडिलधारी) तात्या. -- "जवानी सर्फ उन्ही के लिये है, जो जवान है!" (चित्रपट : शौकिन!) आपला, (उत्पल दत्त, अशोक कुमार आणि ए के हंगल प्रेमी) तात्या अग्निहोत्री! :)

In reply to by विसोबा खेचर

जवानी सर्फ उन्ही के लिये है, जो जवान है!
ओह!.. तरीच सर्फ वापरताना इतक्या जोरात कपडे धुताना दाखवतात.. वयस्कर (धोतरधारी) ;) लोक जोर न लाऊ शकल्याने सर्फ फक्त जवानांसाठीच आहे ;) ह.घ्या. हे.वे.सां.न. (जवान धोबी)ऋषिकेश

In reply to by अश्विनि३३७९

मी पण बरेच महिने मिप ची सदस्या आहे . नक्कि तात्या कसे आहेत या बाबतीतले कुतुहल मला ही आहे ..पण तात्या म्हट्लं की पांढरा शुभ्र सदर आणी धोतर नेसलेली .>> लय भारी!!!

पण तात्या म्हट्लं की पांढरा शुभ्र सदर आणी धोतर नेसलेली ...चेहेर्यावर प्रेमळ पणा आणि कर्तबगारी असे मिश्र भाव असलेली घरातील वडीलधारी व्यक्ती डोळ्यासमोर येते ... ठ्ठो !! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) निशब्द ! (अमिताभचा न्हवे) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

मी ईतकं का वाईट वर्णन केलं तात्या तुमचं ..

In reply to by अश्विनि३३७९

हे नाव वाचून काय वाटेल तुला? तेच तात्याचे खरे रुप आहे. तात्या हे टोपणनाव बहुदा पाळण्यातच चिकटले असावे. ह्याला आमच्या भाषेत म्हणतात "काल जन्माला आला आणि आज म्हातारा झाला." हा चंद्रशेखर उर्फ तात्या जन्मत:च म्हातारा झालाय. ;) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

In reply to by प्रमोद देव

ह्याला आमच्या भाषेत म्हणतात "काल जन्माला आला आणि आज म्हातारा झाला." क्यूरियस केस ऑफ बेंजामिन बटन -- मिसळभोक्ता

In reply to by प्रमोद देव

अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, चंद्रशेखरअन्ना है? (कोनाचि तरी मिपावरलि साईन थोडी बदलुन) */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

आम्हाल तात्या म्हण्जे "रावसाहेब" वाटतात. आत एक बाहेर एक भानगड नाही. जे *टावर तेच ओठावर. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

* चा अर्थ बरोब्बर 'लागला'. =))

In reply to by सालोमालो

आमाला पटावर म्हनायच व्हतं. पन नंतर उगाच शाब्दिक चोप नको. म्हनुन ष्टार मार्ला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हीहीही..बघा बुवा पकासेठ..नंतर कुणाला असं वाटायला नको ..कसलाही कुठेही संबंध जोडायचा आणि काहीतरी घाणेरड्या गोष्टींवर हसायला न येण्याइतपतच विनोद करायचा... :D

:? चुचु

भले शाबास. तात्या, हि घ्या प्रतिक्रिया क्रमांक ५०. ;) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

तात्या....~! मला आजवर भेटलेल्या आणि आयुष्यभर संपर्कामधे राहाव्यात अशा व्यक्तींपैकी एक व्यक्तीमत्व... अनेक पैलू असलेला हा इसम आहे मात्र झकास.... आणि एखाद्यास भेटू तशी ती व्यक्ती जास्त कळत जाते....व्यक्ती ही चॉकशीमधुन नव्हे तर अनुभवून जाणून घ्यायची असते असे मा़झे वैय्यक्तीक मत आहे..... एच.बी.(हर्षद बर्वे)

In reply to by उनाड

या आशेवर उत्तम स्कॉच च्या दोन बाटल्या आणी जुन्या हिन्दी गाण्यान्च्या दोन तीन सीडी मी जपून ठेवल्या आहेत. संपलो रे! लौकरच येतो अमेरीकेत! :)

तात्याची सर्वात उत्तम ओळख म्हणजे तात्याने संकेतस्थळाच्या मराठीला सामान्य लोकांसाठी मुक्त केले. शुद्धलेखनाचा कोणताही बाऊ नाही, सामान्यांना जे काही आवडते ते त्याला देण्याचा मनापासून करणारा, पाककृती, कलाकृती, कला यांना त्याने मुक्त वाव दिला. त्याचबरोबर मराठी मराठी अशी बाष्फळ बडबड न करता मराठीतील एक आदर्श आणि उत्तम असे स्थळ निर्माण केले. एक सामान्य मराठीजन म्हणून मला तात्याबद्दल विशेष स्नेह आणि अगत्य वाटत आहे हेही नमूद करावेसे वाट्ते.

बाकी तात्या कसेही असोत, माझ्यापुरता तरी "मिसळपाव" नावाचा खजिना खुला करणारा अलिबाबा आहे.. ;-) च्यायला, इतलं कवतिक तर आपल्याला त्या फेसबुकवाल्याचंबी न्हाई..