Skip to main content

निवडणुक निकाल आंतरजालावर कुठे दिसेल?

लेखक गणा मास्तर यांनी शनिवार, 16/05/2009 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभा निवडाणूकीचा निकाल आंतरजालावर कुठे दिसेल? चांगले खात्रीशीर संस्थळ माहित असेल तर सुचवा. धन्यवाद, गणा मास्तर सरपंच भोकरवाडी ग्रुप ग्रामपंचायत.

बेपर्वाई : निवडणूकीची ड्युटी

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 16/05/2009 02:16 या दिवशी प्रकाशित केले.
"http://www.loksatta.com/daily/20090516/chchou.htm "बेपर्वाईचे ठसे" आजच्या लोकसत्तेत आलेला हा लेख. निवडणुकीकरता ड्यूटीवर पाठवून लोकांचे विशेषतः स्त्रियांचे कसे हाल केले जातात ते वाचा. इतके अफाट पैसे खर्च होतात पण बूथवर काम करणार्‍या लोकांसाठी बजेटात काही सोय नसते हे संतापजनक आहे. स्त्रियांना असले काम कशाला देतात? परक्या जागेत मूलभूत सुविधा नाहीत, अनोळखी लोक, कसे वागतील काही सांगता येत नाही अशा जागी स्त्रियांना का पाठवतात देव जाणे. त्यांच्या समस्यांचा विचारही केला जात नाही.

नयन मोहणारे नैनीताल - भाग ३

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 15/05/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ तिसऱ्या दिवशी मी उठलो, ते जरा उशीराच. तरी मुम्बईत उठतो त्या मानाने तर मी पहाटे उठलो, असंच म्हणायला हवं. आदल्या दिवशी स्लाईड शो जेव्हा दाखवला गेला, तेव्हा 'रोप कोर्स" ह्या प्रकाराबद्दल आम्हाला थोडीशी माहिती देण्यात आली होती. त्याच्या प्रात्यक्षिकांची छायाचित्रे बघून जांभया देणारे आम्ही सूर्यवंशी खडबडून खूर्चीत सरळ होऊन बसलो. छायाचित्रांत बोल्डरिंग, रॅपलिंग, रिवर क्रॉसिंग (सस्पेन्शन ट्रॅव्हर्स), पॅरलल रोप, इ. ची प्रात्यक्षिके बघून आमची गाळण उडाली.

माझी मद्रास ची सफर- भाग ३

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 15/05/2009 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
... भाग १ ... भाग २ मद्रासची सफर तिथल्या रिक्षावाल्यांबद्दल बोलल्याशिवाय पूर्ण कशी होईल?? मुंबईत जिथे किमान रिक्षाभाडे ९ रू. मध्ये जाता येते, अशा ठिकाणीही हे लोक ४०रू आकारतात.. मी ४०रू पेक्षा खाली येणारा रिक्षावाला एकदाही नाही पाहिला.. आय आय टीच्या मुख्य प्रवेश्द्वारापासून गिंडी स्थानक १० मिनिटांच्या अंतरावर आहे.. पण त्यासाठीही ५०रू. मोजलेयत.. आमचे सहाध्यायी एक तमिळ हिंदी वाद सोडला तर खूपच चांगले होते..

संसदेच्या शाळेत...

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 15/05/2009 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
संसदेच्या शाळेत... मतदारसंघानी 'भूगोल' बदलला नेत्यांनी 'इतिहासा'ला वापरले नको ती 'भाषा' सर्वानी वापरली कुणी कुणी' भाषे'ला वापरले तीन पायांची शर्यत, जोडाफेक कोलांट्यांसारखे 'खेळ' झाले निवडणूकीच्या तमाशामध्ये 'नागरीकशास्त्रा'चे हसे झाले संसदेच्या शाळेत कुणालाच 'नीतीशिक्षणा'ची नाही ओढ यानंतर फक्त गणिताचा वर्ग बेरजा, वजाबाक्या, आकडेमोड... -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras

झाला तो सत्वर, मॅनेजर!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/05/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर दुपारच्या जेवणानंतर लगेच असलेली मीटिंग मला अजिबात आवडत नाही! त्यात भर दुपारच्या मीटिंग दरम्यान आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करुन झोप टाळायची आणि समोर सुखेनैव सुस्तावलेले काही डोलकर प्राणी बघितले की आपण जाणीवपूर्वक डोळे उघडे ठेऊन का बसलो आहोत ह्याचा सात्विक संताप येतो! X( पूर्वी जात्यावर जशा बायकांना ओव्या स्फुरायच्या ना तव्दतच अशाच एका मीटिंगच्या दळणादरम्यान स्फुरलेल्या ओव्या! ;) (ओव्यांच्याच चालीवर म्हणून बघा!
Taxonomy upgrade extras

सुवर्ण

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 15/05/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोठ्या मुष्किलीने 'सुवर्ण सहकारी' चालू होणार होती तर पहिल्यांदा, निवडणुकीच्या आचारसंहितेने ती तारीख पुढे ढकलावी लागली. आता असे कानावर आले आहे की ,काही मूठभर असंतुष्ट कर्मचार्‍यांनी एका स्थानिक पक्षाकडे धांव घेतली असून त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापनाला धमकावणे सुरु केले आहे. परिणामी ,त्या बँकेने माघार घेतल्यास दोन लाख ठेवीदारांच्या आशेवर बोळा फिरवला जाणार आहे. एकूण आपल्या महाराष्ट्रात 'विघ्नकर्ते' फारच सक्रीय आहेत हे सिध्द होते. जय महाराष्ट्र!!!

काव्य

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 15/05/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीतीच्या ओसंडलेल्या पेल्यातुन थोडी प्रीत खाली सांडते मी तरी काय करु ? त्यालाच जग काव्य म्हणते.

एक खट्याळ त्रिवेणी

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 15/05/2009 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणीचा प्रयत्न करत आहे.. कशी वाटली जरूर सांगा :)
साबणसुखाच्या गुदगुल्यांनी खळखळले हास्य अन् रोमांचत्वचेवर फुलला प्रणय, खळबळ टबात. छ्या ! मॅटिनीचे चित्रपट म्हणजे कॉलेजकुमारांना नुसता त्रास !
-- लिखाळ.
Taxonomy upgrade extras

एक होती वैदेही.. (कथा)

लेखक नीधप यांनी शुक्रवार, 15/05/2009 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
"कसं वळलात गाण्याकडे? तुमच्या घरी गाण्याची पार्श्वभूमी आहे का?" "नाही हो घरात कोणीच गाणारं नाही. बाबांना गाण्याची आवड होती त्यामुळे त्यांनी क्लासला घातलं. मी आपलं जमेल ते शिकत होते. पण माझ्या गुरूंनी माझ्यातली गायिका ओळखली आणि मला जवळजवळ दत्तकच मागून घेतलं बाबांच्याकडून. तेव्हापासून रियाझ कधी थांबला नाही." घरी आलेल्या मुलाखतकाराला वैदेही म्हणजे सुप्रसिद्ध गायिका वैदेही सरनाईक उत्तरं देत होती. मधूनच फोन घेत होती. अभिनंदनासाठी येणार्‍यांचं चहापाणी बघितलं जातंय ना यावरही देखरेख करत होती. पुरस्कार, अभिनंदनाचा वर्षाव, लोकांचं प्रेम या सगळ्यांनी भारावली होती वैदेही. एकुणात आज उत्सवाचा दिवस होता.