तिरंगा मलई बोटी कबाब
तिरंगा मलई बोटी कबाब, मंडळी नावातच सार काही आल. एक एक बोटी जीभेवर वितळते. मला बर्यापैकी जमणार्या पाककृतीं पैकी एक.
आणि याची पावती मला तेव्हा मिळाली जेव्हा आईने मला याची कॄती एकदा फोन वर विचारली. मागे एकदा भारतभेटी वर असताना आई बाबांना करुन खिलवल होतं.
बाबांना भयंकर आवडल होतं आणि त्यांच्यासाठीच आईने फोन केला होता. स्वतःची कॉलर टैट केली, ज्या माऊलीने मला इतक काही शिकवल ती आज मला काही विचारत होती, उर अभिमानाने भरुन आला.
पण खर सांगु...
मिसळपाव
आजपर्यंत गुगलने असे विशेष