Skip to main content

तिरंगा मलई बोटी कबाब

तिरंगा मलई बोटी कबाब

लेखक गणपा
Published on शुक्रवार, 02/10/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
तिरंगा मलई बोटी कबाब, मंडळी नावातच सार काही आल. एक एक बोटी जीभेवर वितळते. मला बर्‍यापैकी जमणार्‍या पाककृतीं पैकी एक. आणि याची पावती मला तेव्हा मिळाली जेव्हा आईने मला याची कॄती एकदा फोन वर विचारली. मागे एकदा भारतभेटी वर असताना आई बाबांना करुन खिलवल होतं. बाबांना भयंकर आवडल होतं आणि त्यांच्यासाठीच आईने फोन केला होता. स्वतःची कॉलर टैट केली, ज्या माऊलीने मला इतक काही शिकवल ती आज मला काही विचारत होती, उर अभिमानाने भरुन आला. पण खर सांगु... तेव्हा वाटल तस्सच सगळ टाकुन घरी धाव घ्यावी नी आई बाबांची इतकीशी इच्छा पुर्ण करावी :( तर मंडळी अशीही मलई बोटी कबाब आपल्या सेवेसी , उत्कृष्ट चवीसाठी या मलई कबाबची पुर्वतयारी आदल्या दिवशीच करुन ठेवावी. पुढील (मार्ग)दर्शन सचित्र ...... लागणार साहित्य: १/२ किलो बोनलेस चिकन. ताज दही १.५ वाटी. २ मोठे चमचे आल-लसणाची पेस्ट. हिरवी चटणी (पुदिना + मिरची +कोथिंबीर ) २ मोठे चमचे डाळयाच पीठ. (आयत्या वेळी डाळे मिळाले नाही तरी वरी नॉट L) . तव्यावर २ चमचे बेसन चांगल भाजुन घ्या. मी तेच केल B) ) चीज (मी २ स्लाइस वापरल्या). २ लहान चमचे शहाजीर/शाहीजीर. २ लहान चमचे लाल तिखट. १ चमचा मसाला. बारीक चिरलेली कोथिंबीर चिमूटभर भगवा रंग (ऑपशनल) मीठ. १ चमचा बटर. १) चिकन धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. टिप कागदावर थोडावेळ ठेवुन सार पाणी शोशुन घ्या. मग त्याला आल लसणाची पेस्ट आणि मीठ लावुन १०-१५ मिनिट फ्रिज मध्ये ठेवा. २) एका भांड्यात दही, शहाजीर, चीज, मीठ, डाळ्याच पिठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन फेटुन घ्या. ३) तिन बाउलमध्ये वरील मिश्रण विभागुन घ्या. एकात लाल तिखट + मसाला + रंग, दुसर्‍यात हिरवी चटणी टाकुन परत फेटुन घ्या. तिसर तसच ठेवा. ४) चिकनचे ३ भाग करुन वरील ३ बाउलमध्ये टाका. चांगल मिक्स करुन झाकुन फ्रिजमध्ये रात्र भर ठेवुन द्या. (फ्रिजर मध्ये नाही.) ५) दुसर्‍या दिवशी, बांबुच्या सळया घेउन प्रत्येक सळी मध्ये ५-६ तुकडे खोचा. ६) तव्यावर मंद आचे वर बटर टाकुन ह्या शीगा तळुन घ्या. (जर ओव्हन मध्ये करणार आसाल तर बांबु ऐवजी स्टीलच्या सळया वापरा. वेळ आणि तापमान या बाबत जाणकार भगीनी मंडळाने मार्गदर्शन कारावे.) ७) तंदुर इफेक्टसाठी, प्रत्येक शीग मोठ्या आचेवर ३० से़कंद भाजुन काढावी. विसु : लोकांच्या चेतना चाळवायचा मुळीच हेतु नाही. (आज मार खातय बहुतेक)

याद्या 18950
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

आवरा रे कोणीतरी या गणपाला ! आज गांधीजयंतीची सुटी गणपाच्या पाकृत्या पाहण्यात, वाचण्यात गेली. -दिलीप बिरुटे

अरे व्वा...एकदम सुपर फास्ट आहात की तुम्ही...धन्यवाद पाकृ लगेच टाकल्याबद्दल...मी या रविवारीच करते... (अवांतरः ऑफीसमध्यल्या रिकाम्यावेळात टंकुन ठेवता की काय...घरी वेळ मिळत नसेल नाही...:) ) दिपाली :)

भावा जरा दमानं !! स्वयंपाकघराचा ताबा घेण्यासाठी तर नाही वहिनींना गावाला पाठवले ?? ;-)

ब्बास..... आता सहन होत नाही... गणपाचे हात बांधा रे कोणीतरी.. :-)

अरे खरंच आवरा रे ! एक रेसिपी वाचून / बघून तोंडाला सुटलेलं पाणी थांबता ना थांबतं तेवढ्यात हा बाबा नवीन त्रास पेश करतो !!!

तुमच्या घरी जेवायला यायला ऑफिसातून सुटी मिळत नाही :-)

आरे बाबा गणपा शेठ उद्या शनिवार माझा उपवास असतो रे....जरा दम तरी खाऊ दे आम्हाला. वेताळ

In reply to by गणपा

=)) =)) =)) तुमच्या रेशिप्या बघून त्यानाही मनुक्षा सारखं वागायची हुक्की आली.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

याला कोणीतरी एका खोली मध्ये कोंडून ठेवा रे! स्वयंपाक घरात पाऊल टाकू देऊ नये याला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वा गणपा .. .लेका येऊन दे एक से बढकर एक !! फक्त एक अशोकचक्र मिसिंग आहे भावा !! -(तिरंगा बोटीकबाब प्रेमी ) टार्‍या

गणपा भाउ...काय चालवलंय काय तुम्ही? गणपा यांना आठवड्यात फक्त एक पाककृती टाकण्याची परवानगी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आदरणीय संपादक मंडळाला करण्यात येत आहे!

तुम्हाला साष्टांग नमस्कार असो...!! उद्या खुप पाहुणे येणार आहेत ..काय मस्त कराव हा प्रश्न तुम्ही सोडवलात तोही अग्दि सुग्रासपणे.. ../मुक्ता

कृपया आई-वडलांचा पत्ता कळवा, भारतभेटीत त्यांना एक दंडवत घालून येईन. कोणास ठावूक त्यांच्या आशीर्वादाने कदाचित दोन चार डीश अश्याच बनवता यायला लागतील.

In reply to by सहज

असेच म्हणतो. व मला तर द्याच दिवाळीला तिकडेच आहे मी मुंबई..पुणा.. कोल्हापुर एरियामध्ये पडिक. * गणपा .. मला एक सांग तुझा कधी स्वयंपाक घरात पोपट झाला आहे :? नाही माझा प्रत्येकवेळीच होतो म्हणून विचारत आहे =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

व मला तर द्याच दिवाळीला तिकडेच आहे मी मुंबई..पुणा.. कोल्हापुर एरियामध्ये पडिक.
चला चला ... पळा पळा ... राजे येतो ... मी बहुदा पुण्यात नसेल .. मी व्हाया इचल केरंजी .. लाडू पेढे खात खात ... शिमल्याला पळेल बहुदा :) -( उचापती ) टारझन

वाह !!!!! क्या बात है. ज्या माऊलीने मला इतक काही शिकवल ती आज मला काही विचारत होती, उर अभिमानाने भरुन आला. हे तर अजुन भारी. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

गणपा शेट, लईचं भारी.............. येव्हडे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद......... जय महारास्ट्र........

फोटो क्लासच आलेत, अगदी मन लावून केलेली पाककृती दिसते आहे.
विसु : लोकांच्या चेतना चाळवायचा मुळीच हेतु नाही.
-- घ्या, हे आणखीन वर :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


सहज आणि सोपी तरीही जिव्हाकर्षक पाककृती. सुचना: हिरव्या रंगासाठी थोडी पालक पेस्ट वापरावी. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

"तेव्हा वाटल तस्सच सगळ टाकुन घरी धाव घ्यावी नी आई बाबांची इतकीशी इच्छा पुर्ण करावी " ने मजसि ने परत ...........सागरा प्राण तळमळ्ला. मला वाटतं म्यारीनेशन करताना दह्या मधे कसुरी मेथि + धने पावडर + जिरे पावडर अजुन लज्जत वाढवतील. वाढताना वरुन चाट मसाला टाकावा.

आता काहितरी गोड येवु द्या! :) तुमच्या पाककलेला मोकळे मैदान मिळालेय बायकु माहेरी गेल्यापासून.. ;)

अहो चीज कुठले वापरायचे लिहिले नाहीत ते? आई बाबांना खिलवून घालण्यात आंनद खुप असतो.. खरेय.

लई भारी... काटा कीर्र ..... जाग्यावर पल्टीच कीओ... बन्ड्या (कोल्हापुरी)

निव्वळ अप्रतिम!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

वा! मानलं गणपा तुम्हाला!!

झ्याक दिसतया बगा....कबाब.... :D तोनडाला पानी सुटल ..... =P~ गणुशेठ तुमी तर ग्रेट आहात बुआ.... =D>

भन्नाट फोटो.. भारी पाकृ/.. ते तव्यावर इतक्या कमी तेलात कसे तळता बुवा ?... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी