अभुतपूर्व संकट!
भारत नावाचं एक राज्य होतं...तिथं इटलीराणी राज्य करीत होती...तिच्या राज्यात एक महाराष्ट्र नावाचा प्रांत होता. त्या प्रांतातले सगळे सरदार इमानदार होते. एकही जण राणीच्या शब्दाबाहेर नव्हता. राजधानीतून बोलावणं आलं कि सगळे सरदार चळ्चळ कापायचे. राणीचा दराराच असा होता! ते सरदार इतके इमानदार होते कि राजपुत्राचे जोडेसुद्धा ते डोक्यावर घ्यायचे! भारत राज्यात सगळं कसं आलबेल चाललं होतं.
महाराष्ट्र प्रांतात एक खान रहायचा. या खानाचं काम म्हणजे भारत राज्याच्या नागरिकांना "जीवनावश्यक" चित्रपटरस पुरवायचा. एकही आठवडा असा गेला नाही कि भारताच्या नागरिकांनी चित्रपटरस पिला नाही.
मिसळपाव
२) गोरेगावमधली कुठलीशी मैफल..