घो(स)ळ
च्यायला या नान्याने सगळ्यांनांच झपाटलय....
हातात हात
घेवुन आम्ही झपाटायचो
ती एकाच्या मानगुटीवर बसायची अन्
मी दुस-याच्या अंगात यायचो
झाडावर लटकत
लोंबत असतांना बोलत असतांना
असंच सगळ्यांना झपाटायच
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
पुनर्जन्माच्या फेर्यातून
कधीतरी तिचा आत्मा मुक्त झाला
मी मात्र मारत आहे त्याच गावातून
झपाटण्यासाठी चकरा.... बॉडी टु बॉडी.
---कंदिलकुमार
सहजरावांच्या सल्ल्या नुसार जळ्ळा तो ळ शिर्षकात आणलेला आहे.
मिसळपाव
स्टेफनी मेयर ह्या लेखीकेच्या ट्वायलाईट सागा वर आधारीत पहिल्या चित्रपटाची