Skip to main content

मध्यपूर्वेतून थेट मराठीत

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 04/09/2010 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी आणि हिंदीत अनेक शब्द आहेत जे मूळचे फारसी वा अरबी आहेत. जसे गरीब, मेहनत, बिचारा, तारीख, हिशेब. असे शब्द बहुतेक वेळा हिंदी आणि मराठीत जवळपास सारखेच दिसतात आणि त्याच अर्थाने वापरले जातात. वरील उदाहरणे त्याच गटातील आहेत. पण असेही काही शब्द आहेत जे फार्सी वा अरबीतून मराठीत आलेले आहेत जे हिंदीत नाहीत वा अगदी तुरळक वापरले जातात. काही उदाहरणे जाहिरात (हिंदीत विज्ञापन वा इश्तेहार वापरतात) जबाबदार(री) (हिंदीत जिम्मेदार(री) वापरतात) राजीनामा (हिंदीत इस्तेफा, त्यागपत्र). मोहीम (हिंदीत अभियान ) लष्कर (हिंदीत फौज) रतीब (?) अजून अशी काही उदाहरणे देऊ शकाल का?

"ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी शुक्रवार, 03/09/2010 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
GPSachin1 आज (शुक्रवार) सायं.५.०० वाजता नवी दिल्ली येथे भारतीय विमान दलाने आयोजित केलेल्या एका खास, अनोख्या आणि समस्त भारतीयांना आनंद वाटावी असा एक कार्यक्रम संपन्न झाला, तो म्हणजे आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा "एअर फोर्सचे ऑनररी ग्रुप कॅप्टन" या मानाच्या पदाने गौरविण्यात आले. ते प्रसंग फोटोरुपाने येथे देत आहे. GPSachin2 या प्रसंगी सचिन म्हणाला, "मी अगदी लहान असल्यापासून फायटर प्लेनबद्दल फार आकर्षण बाळगून होतो.

मेंदूतला माणूस - पुस्तकपरिचय

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 03/09/2010 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच 'मेंदूतला माणूस' हे पुस्तक वाचले. मला ते फारच आवडले. लेखकांनी म्हटल्याप्रमाणे मेंदूचे कार्य कसे चालते हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले नाही. पण माणसाचा विचार करण्याची पध्दत, वर्तणुकीमागचा कार्यकारणभाव समजावून घेण्यासाठी ते लिहिले आहे. लेखन विज्ञानानिष्ठ असले तरी लेखकांनी रोजच्या व्यवहारातली हलकी फुलकी उदाहरणे देऊन विषय अतिशय सोपा व आकर्षक केला आहे.

भयकथा

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 03/09/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
मला भयकथा वाचायला खूप आवडतात... मिसळ पाव वर यापूर्वी हे लिखाण झाले असल्यास.. लिंक द्यावी ...... हि विनंती .......

तिरामिसु

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 03/09/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ अंडी ५० ग्राम साखर (साधारण २ टेबलस्पून) २५० ग्राम मस्कार्पोन चीज १५ ते १६ लॉफेल बिस्किटे /तिरामिसु करताची स्पेशल बिस्किटे (बिस्किटाच्या पाकिटावर तिरामिसु असे लिहिलेले असते.) म्हणजेच लेडिज फिंगर बिस्किटे कोको पावडर साधारण २ ते ३ मोठे चमचे २ चमचे रम/कोनिऍक/आस्बाख १/२ कप कोरी कडू कॉफी (बिनादुधाची) मोक्का किवा एस्प्रेसो वापरली तर उत्तमच. कृती- अंड्यातील पांढरे व बलक वेगळे करणे व पांढरे फेटून घेणे. अंड्यातील बलकात साखर घालून भरपूर

गैरब्राह्मणी ब्राह्मण

लेखक सारंग कुलकर्णी यांनी शुक्रवार, 03/09/2010 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक दिवस, मराठा आरक्षणाचा मुद्दा बराच गाजत आहे. कोणी त्याला विरोध करतो तर कोणी पूर्ण ताकतीनिशी पाठींबा व्यक्त करत आहे. समित्या नेमल्या जात आहेत, न्यायालयात खटले दाखल केले जात आहेत. आठवड्यातून एकदा तरी या संदर्भात बातमी वाचायला मिळतेच. मुळातच आरक्षण या विषयाचा फिरून एकदा विचार केला पाहिजे. लहानपणी मराठीच्या पुस्तकात “महापुरुषांचा पराभव” म्हणून धडा होता.