मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर"

इन्द्र्राज पवार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
GPSachin1 आज (शुक्रवार) सायं.५.०० वाजता नवी दिल्ली येथे भारतीय विमान दलाने आयोजित केलेल्या एका खास, अनोख्या आणि समस्त भारतीयांना आनंद वाटावी असा एक कार्यक्रम संपन्न झाला, तो म्हणजे आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा "एअर फोर्सचे ऑनररी ग्रुप कॅप्टन" या मानाच्या पदाने गौरविण्यात आले. ते प्रसंग फोटोरुपाने येथे देत आहे. GPSachin2 या प्रसंगी सचिन म्हणाला, "मी अगदी लहान असल्यापासून फायटर प्लेनबद्दल फार आकर्षण बाळगून होतो. मात्र अशा फायटर प्लेनमध्ये बसण्याची संधी मिळाली ती १९९६ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यात. तसेच वैमानिक घालतात त्या खास गॉगल्सचीदेखील मला आवड निर्माण झाली, ती टॉम क्रूझला "टॉप गन" मध्ये पाहिल्यापासून." GPSachin3 एअर फोर्सने सचिनला 'ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर'चाही दर्जा दिला आहे. ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

वाचन 14777 प्रतिक्रिया 0