कौलाचा हेतू हाच की सर्वोत्तम मराठी कादंबरी वाचकांसमोर यावी. इतर कादंबर्यांच्या अनुल्लेखामागे त्यांना कमी लेखण्याचा हेतू नाही तर ती कौलाची मर्यादा समजावी. वाचकांनी त्यांना सर्वोत्तम वाटणारी कादंबरी त्यांनी खुशाल इथे द्यावी.
संपादकांना सूचना - अजून 'इतर' असा एक पर्याय कौलात अॅड करावा. नजरचुकीने राहीला. स्वसंपादन सुविधा नसल्याने टाकता आला नाही.
माझ्या आवडीच्या काही
शिरूभाऊंची रथचक्र हीच प्रथम चमकुन गेली.
दळवी हा एक क्रमांकाचा कादंबरीकार . त्यांची "धर्मानंद" पर्यायांमधे हवी(च) होती. पण सरे प्रवासी घडीचे व महानंदा ही ऊत्तम.
धाकट्या माडगुळकरांची " बनरग वाडी " ही एक सर्वोच्य कादंबरी.
कविता महाजनची ची "ब्र" ही अलीकड्ची सशक्त चीज आहे.
बाकी "कॅलीडोस्कोप" ही अच्युत बर्वे याची एक दरजेदार कादंबरी आहे. ( जरूर वाचावी अशी )
"इजाळ " ही ऊत्तम बंडू तुपे यांची एक दुर्लक्शित कादंबरी आहे . झक्क आहे.
चानी / रात्र काळी घागर कळी इ. खानोलकरंची कादंबरी आवडीची आहे.
वरील यादीत सुशिंची "कल्पांत", "दास्तान", "क्षितिज" आणि ब-याच इतर कादंब-या अॅड करता येतील. माझ्यामते "सुशि" डिड नॉट गेट हिज ड्यू फॉर हिज वर्सटॅलिटी... बाकी वर दिलेल्या कादंब-या उत्तम आहेत.
("कोसला" ??? नेमकं काय होत हो ह्या कादंबरीत? मला नाही कळली बुवा)
सर्वोत्तम मराठी कादंबरी कोणती? >>>
कु.कांदबरी अरुण मोरे ..आतापर्यंतची मी पाहिलेली सर्वोत्तम कांदबरी.. ? ऊप्प्स !! अरे ती वाचायची कांदबरी का ? सॉरी-सॉरी..
मग ही घ्या यादी.
ययाती,
मुर्त्युंजय ( परिकथेतील राजकुमारानी लिहीलेले महाभारत युध्दाचे वर्णन पण मस्त आहे , माझा दोस्त म्हणुन शिफारस करत नाहीये, खरोखरच वाचनीय आहे.)
नुकतीच वाचलेली.
तिढा -श्रावण मोडक (लवकरच परिक्षण लिहीणार आहे.)
यादी खुप मोठी आहे...कुठल्याही एका कांदबरीस (अगदी सुरवातीला ऊल्लेखलेली सोडुन) 'सर्वोत्तम म्हणता येणार नाही , म्हणुन मत द्यायचे टाळत आहे
श्रीं. नां.च्या कुठल्याही कादंबरीला सर्वोच्च स्थान मिळू शकत. मग ती लव्हाळी असो, गारंबीचा बापू वा इतर कुठलिही.
श्रीं. ना. पेंडसे या नावाला मत आधी आहे.
खरेतर हा कौल श्रेष्ठ कादंबरीकार कोण या साठी हवा होता.
बर्याच आहेत.
वर कौलात म्हटल्या प्रमाणे मृत्युंजय त्या खेरीज, स्वामी, श्रिमानयोगी, शेहेनशाह, तुंबाडचे खोत, गारंबीचा बापु,पानिपत,ययाती,संभाजी...................
मृत्युंजय व ययाती मधून निवड होत नव्हती, शेवटी मृत्युंजयला मत दिले.. पण ययाती देखील अतिशय सुरेख आहे.. विशेषतः ययातीचा ऊत्तरार्ध तर सुपर्ब ! बाकी वरील पर्यायांमध्ये रणजित देसाईंची 'स्वामी' असायला हवी होती असे वाटले..
वरील कादंबर्यांबरोबरच शोधयात्रा आणि मुंबई दिनांक ('सिंहासन') या अरूण साधू यांच्या कादंबर्याही उत्तम आहेत.
श्रीनांच्या कादंबर्यांचाही उल्लेख हवाच! तुंबाडचे खोत, रथचक्र.
शिवाय नेमाड्यांची 'हिंदू'.
लक्ष्मण मान्यांची 'उपरा'.
>>वरील कादंबर्यांबरोबरच शोधयात्रा आणि मुंबई दिनांक ('सिंहासन') या अरूण साधू यांच्या कादंबर्याही उत्तम आहेत.
पण त्या सर्वोत्तम नाही म्हणता येणार. साधूबुवांचीच 'मुखवटा' म्हणून वर्हाडी पार्श्वभूमीवरील एक मोठी कादंबरी आहे. ती उपरोक्त दोन्ही कादंबर्यांपेक्षा सुरेख आहे. थोडीफार तुंबाडच्या खोतांच्या वळणानेच जाणारी आहे.
>>श्रीनांच्या कादंबर्यांचाही उल्लेख हवाच! तुंबाडचे खोत, रथचक्र.तुंबाडचे खोत, रथचक्र सर्वोत्तम आहेतच. निर्विवादपणे.
>>शिवाय नेमाड्यांची 'हिंदू'नवीनच असल्याने आणि बहुतेकांनी वाचलेली नसल्याने विचार केला नाही.
>>लक्ष्मण मान्यांची 'उपरा'.आत्मचरित्र असल्याने कादंबरी म्हणून समावेश करता आला नाही. :)
पार्टनर - व.पु काळे .
तश्या तर वरती दिलेल्या सर्व कादंबरी मस्त आहेत.
परंतु मला तरी पार्टनर ही कादंबरी जास्त आवडते.
अतिशय सुरेख आनि वेगळी असलेली ही कादंबरी खरेच ग्रेट निर्मिती आहे.
त्या खालोखाल
१. पार्टनर - व्.पु.
२. सेतु - अशा बगे.
३. महानायक - विश्वास पाटील.
४. ययाती - वि.स
..........
कौल थोडा चुकीचा वाटतो..
कादंबर्या बर्याच आहेत. माझ्या एका मैत्रिणिचे नाव कादंबरी आहे. मला ती पण आवडते. ;)
बाकी पर्यायामधील ४ वाचलेल्या आहेत त्यामुळे मत देऊ शकत नाही. :)
कविता महाजन यांची 'ब्र' बरोबरच 'भिन्न' सुद्धा माझी आवडती कादंबरी आहे.
व. पु. यांची 'पार्टनर' - कधीही, कुठलंही पान काढुन वाचायला घेतले, तरी मनाचा ठाव घेतेच. माझी प्रचंड लाडकी कादंबरी!
बाकी यादीमधल्या सगळ्याच आपापलं वेगळेपण व महत्व राखून.
'कोसला' सध्या वाचतेय - पकड घेतेय कादंबरी, पण सर्वोत्कृष्ठ-सर्वोत्तम असावी असे अजून तरी वाटत नाहीये.
कळ , खूप लोक आहेत , हे ईश्वरराव हे पुरुषोत्तम राव ,उत्सुकतेने मी झोपलो
विलास सारंग : एन्कीच्या राज्यात
राजन गवस :तणकट , कळप
भाऊ पाध्ये : राडा , होमसिक ब्रिगेड , बॅरीस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर
विश्राम बेडेकर : रणांगण
नेमाडे : सगळ्या
जी के ऐनापुरे : रिबोट
रंगनाथ पठारे : टोकदार सावली चे वर्तमान
सदानंद देशमुख : बारोमास
खानोलकर : अजगर , रात्र काळी घागर काळी (आणि झाडे नग्न झाली)
दिनानाथ मनोहर : रोबो
मेघना पेठे : नातिचरामि
प्रभाकर पेंढारकर : रारंगढांग
आता या आणि अश्या कितीतरी अजून आहेत ..
कौलाचा हेतू
In reply to कौलाचा हेतू by प्रचेतस
माझ्या वाचण्यातली
In reply to माझ्या वाचण्यातली by परिकथेतील राजकुमार
हिंदु.................बाकिच्य
In reply to हिंदु.................बाकिच्य by अविनाशकुलकर्णी
माझ्या आवडीच्या
In reply to माझ्या आवडीच्या by तर्री
माझ्या आवडत्या...
In reply to माझ्या आवडत्या... by चिगो
सर्वोत्तम मराठी कादंबरी
In reply to कौलाचा हेतू by प्रचेतस
आमचे उत्तर
आमचे मित्र श्रावण मोडक यांची
माझ्या वाचण्यातली शिरुभाऊंची
In reply to माझ्या वाचण्यातली शिरुभाऊंची by विसोबा खेचर
माझीही
In reply to माझ्या वाचण्यातली शिरुभाऊंची by विसोबा खेचर
तुंबाडचे खोत
श्रीं. ना.
In reply to श्रीं. ना. by चिंतामणी
असंच काही नै काई... गारंबीची
In reply to श्रीं. ना. by चिंतामणी
श्री. ना.
बर्याच आहेत. वर कौलात
वरीलपैकी-
रुचिरा
सुशिंच्या 'दुनियादारी'ला
हम्म..
पुलंची 'व्यक्ती आणि वल्ली'
In reply to पुलंची 'व्यक्ती आणि वल्ली' by अनिल २७
कादंबरी?
In reply to कादंबरी? by प्रदीप
हो का?
In reply to हो का? by अनिल २७
{ हे ही दिवस जातील.. }
वेगवेगळी ओळख!!
अरूण साधू
In reply to अरूण साधू by विसुनाना
सहमत आहे
गोनिदा....
इतर ..
In reply to इतर .. by गणेशा
कौल थोडा चुकीचा
इतर..
शाम मनोहर
कठीण आहे
पैकी ५ वाचले आहेत... त्यापैकी