Skip to main content

मराठी आमची रोजी रोटी

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 14/03/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी आमची रोजी-रोटी , बेचाळिस पिढ्यांसाठी कारखाने वरपले , सीटं बदलली, नोटवाल्या बाबाचा जयजयकार केलात, झोपडपट्टीत स्लिपांबरोबर १००० च्या नोटा-वाटप, तरीही मराठी आमची रोजी-रोटी विकास म्हणजे पन्नास लाखाची टोयाटो, विकास म्हणजे , लवासा, मुळशी आणि मावळ, विकास म्हणजे सिंचन विभागाचे कुरण , विकास म्हणजे ब्रिगेड स्थापना, तरीही मराठी आमची रोजी-रोटी पुतळे हलवा रात्रीचे उद्घाटन करा पहाटेचे , क्रेडीट घ्यायचे कुणी, अटी-तटी ची युती, दाढ्या कुरवाळा,जाती-पातीत पेटवा संघर्ष तरीही मराठी आमची रोजी-रोटी फायलींचा गठ्ठा , पि.ए.
काव्यरस

माउली

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 14/03/2011 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
माउली अपरिचित बंधुत्व त्या दोघांचे अनाकलनीय खेळ त्या नियतीचे अपरंपार हाल मात्र त्या माउलीचे भय दाटे हृदयी त्या अंतिम युद्धाचे ते दोघे आज सामोरे ठाकले मातेचे काळीज विद्ध जाहले एकाच हृदयीचे दोन ठोके 'चुकले' अन् जन्माचे वैरी जाहले एक अंश त्या अविनाशी तेजाचा दुजा तो प्राणसखा त्या मनमोहनाचा सुदैवी मातेवर कैसा फेरा हा दुर्दैवाचा आपल्याच पिल्लांमध्ये डावे-उजवे करण्याचा तेज:पुंज कवचकुंडलांचा धनी तो सदा सोसतो अपमानांचे आघात तो कौन्तेय असूनही जगाला राधेय तो राधेच्या सौभाग्याचा कुंतीला हेवा वाटतो तरीही जपले अन् साधले दुज्याचेच हित तिने मागितले दुज्यासाठीच अभयदान तिने ठरवले खुशाल दोषी तिल
काव्यरस

रावसाहेब

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 14/03/2011 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
रावसाहेबांनी डोळे किलकिले करून बघितलं. आजूबाजूला कुणाची चाहूल नव्हती. अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी कूस बदलली. पडद्याच्या फटीतून सकाळची कोवळी किरणे रावसाहेबांना त्या थंड वातावरणात हवीहवीशी वाटणारी उब देत होती. म्हणजे, दिवस थंडीचे नव्हते, ती थंडी ए.सी.ची होती. मुंबईत राहून हिवाळा अनुभवायचा असेल तर एसी शिवाय पर्याय नाही हे त्यांना कळलं होतं. पुन्हा एकदा रावसाहेबांनी स्वतःला मऊ दुलईत गुरफटून घेतलं. मागचे काही दिवस हा त्यांचा नेहेमीचा उद्योग झाला होता. आताशा पूर्वीसारखे कुणी त्यांना सकाळी सकाळी उठवायच्या मागे लागलेले नसायचे. पूर्वी म्हणजे सकाळी घराचं जणू रणांगण झालेलं असायचं.

असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 14/03/2011 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अ‍ॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल!

आयूष्य एक रंगभूमी....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
आयूष्याच्या ह्या रंगभूमीवरचे, आपण जणू एक कलाकारच असतो । आपापल्या परीने प्रत्येक जण, आपापली भूमिका ति बजावत असतो । प्रत्येक दीवस तो नवा प्रयोग ह्या, रंगमंच्यावर मांडत असतो । असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे, आपण येथे साकारत असतो । कुणास जमतो-कुणास न जमतो, अभिनय येथे परी करावाच लागतो । दुःखात हसून डोळे हळूच पुसून, नाट्यमय देखावा उभाऱ्हावाच लागतो । कितीही लांबला जरी खेळहा तरी तो, शेवट त्याचा अपूल्या हातीच नसतो । खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे, ह्या परी कोणता मग मार्गच नसतो । ह्या खेळाचा सुत्रधार तो, एकमेव हा देवच असत

आयूष्य एक रंगभूमी....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
आयूष्याच्या ह्या रंगभूमीवरचे, आपण जणू एक कलाकारच असतो । आपापल्या परीने प्रत्येक जण, आपापली भूमिका ति बजावत असतो । प्रत्येक दीवस तो नवा प्रयोग ह्या, रंगमंच्यावर मांडत असतो । असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे, आपण येथे साकारत असतो । कुणास जमतो-कुणास न जमतो, अभिनय येथे परी करावाच लागतो । दुःखात हसून डोळे हळूच पुसून, नाट्यमय देखावा उभाऱ्हावाच लागतो । कितीही लांबला जरी खेळहा तरी तो, शेवट त्याचा अपूल्या हातीच नसतो । खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे, ह्या परी कोणता मग मार्गच नसतो । ह्या खेळाचा सुत्रधार तो, एकमेव हा देवच असत

असे कुणीतरी यावे.....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
असे कुणीतरी यावे, जिच्यात आपण हरवूनी जावे । शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला, तिचेच दर्शन व्हावे । हे असे कुणीतरी यावे..... ओठांतले ते शब्द तिने मग, अलगद झेलुनी घ्यावे । अबोल अश्या ह्या डोळ्यांतले ते, भाव समजोनी जावे । हे असे कुणीतरी यावे..... मौन धरिले तिनेच जरका, मी अस्वस्थ असावे । अश्या क्षणिमग बोलुनी काही, मौन तिने सोडावे । हे असे कुणीतरी यावे..... बोल लाविले तिला कुणी तर, घाव मलाच मिळावे । घाव लागता अंगी माझ्या, आईग...

शब्दांचे खेळ...

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपं असत नाई शब्दांचे असे हे खेळ करणं, भावनांच्या गुंत्यात गुंतवून ह्या शब्दांना वाक्यांमध्ये पाडणं । पडताना मात्र वाक्यांमध्ये हे शब्द काहिना-काही अर्थ घेऊन पडतात, थोडीशी जागा चुकली तर मात्र हेच... अर्थाचा अनर्थ करून टाकतात । पण चुकल्या वाक्यांतील ते शब्द देखील काहिना-काही सांगत असतात, चुकीचीच का असेनात..

कविता.....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
कविता कराव्या लागत नाहीत, त्या नकळतच होत असतात । मनातल्या भावनांना जसे, शब्दांचे आधार मिळत असतात । जुळवायचीच म्हणून, वाक्यांतील यमके जुळवायची नसतात । वरच्या ओळींची खालच्या ओळींशी, ओढून ताणून नाती जोडायची नसतात । सरळ सोप्या शब्दात भावना मनातल्या, कवीतेतून ह्या मांडायच्या असतात । शब्द असतात भावनांसाठी कवीतेत, भावना शब्दां साठी नसतात । हर्षद प्रभुदेसाई.....(डोंबिवली)