झाशीच्या राणीवरील अन्याय
झी टिव्ही वरील झांसी की रानी ही मालिका मी बर्यापैकी नियमितपणे पहातो. पुण्यात राहून शाळेच्या पुस्तकात किवा इतर माध्यमातून झाशीच्या राणीच्या कर्तृत्वाचा यथार्थ परिचय कधिच झाला नव्हता. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात दोन-चार ओळीत तिला गुंडाळण्यात आले होते.
टिव्ही वर चालू असलेली मालिका इतिहासाचे reconstruction आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे काही ठिकाणी (प्रसंगात) विशेषत: संवादामध्ये ही मालिका दर्जा घसरून हिंदी सिनेमा प्रमाणे संवंग बनते. त्यामुळे तपशीलाचा अपवाद केला तर मालिकेत चित्रीत केलेल्या घटना या अस्सल असाव्यात ( म्हणजे कपोलकल्पित नसावेत).
मिसळपाव