वर्ल्डकपची फायनल. भारताच्या इनिंगला पुर्ण वेळ मी शब्दशः "फिंगर्स क्रॉस" करुन बसलेलो होतो. धोनीचा सिक्सर गेला नी मी फुटलो.. काय करावं ते कळेना. आरोळ्या, बोंबा, शिट्या सगळं झालं.. टिव्हीवर दिसणारा जल्लोष पहात बसलो जवळजवळ रात्री २ पर्यंत, आणि हे करतांनाच फोन, मेसेजेस सुरु होतं...
दुसर्या दिवशी सकाळी मोबाईल पाहीला. त्यात एक मेसेज होता, "अरे, मॅच फिक्स्ड होती. आम्हाला आधीच सगळं (म्हणजे स्कोर, विकेट्स वगैरे) माहीत होतं." आणि सोबत कोणाला काय मिळालयं त्याचं वर्णन...
मी चमकलो. कारण मेसेज करणारी व्यक्ती बेजबाबदार, उगाच काहीतरी बोलणारी नाहीय. विघ्नसंतोषी पण नाही. मी रिप्लाय केला, "हा एप्रिल फुलचा मेसेज जुना झालाय." समोरची व्यक्ती तडकली. पुन्हा मेसेज, "तू अजुन लहान, अजाण आहेस. त्यातल्या त्यात "नॉर्थ ईस्ट"ला राहतोयस, त्यामुळे तुला बर्याच गोष्टी माहीत नाही तुला."
आता मात्र मी सटकलो. मी लिहीलं, "मान्य की मी नॉर्थ ईस्टला राहतो, आणि कदाचित मला काही गोष्टी माहीत नसतील. पण जर तुम्हाला सगळं आधीच माहीत होतं तर तुमचा सोर्स तरी सांगा. आणि आम्हाला सांगत चला, म्हंजे मॅचच्या वेळी जी पाकपुक-पाकपुक हालत होते ती तरी होणार नाही." ह्याला मात्र उत्तर आलेले नाही...
मला सांगा, प्लिज :
१.ही सर्वज्ञानी माणसं "मॅच फिक्स होती" हे मॅच झाल्यावरच का सांगतात? आधी कुठं आणि का लपवून ठेवतात मग असली बहुमोल माहीती? आणि खोटं असेल तर का हा विघ्नसंतोषीपणा?
२.मॅचनंतर सचिन, युवी, भज्जी आणि इतर खेळाडुंचे डोळे पाणावलेले होते. सगळे भावुक, येडेपिसे झाले होते. सब झूठ होतं?
आपले प्लेअर्स नुसते अॅड्स करुन एवढे चांगले अॅक्टर्स झालेयत?
३. माझ्या पाहण्यातली ही सगळ्यात टफ वर्ल्डकप फायनल होती. (मला आठवतात त्या १९९९, २००३ आणि २००७ च्या मॅचेस एकतर्फी झाल्या होत्या.) कशाला मग श्रीलंकेनी एवढी उरस्फोड मेहनत घेतली? शेवटच्या ३० चेंडूत ६३ धावा कशाला?
४. श्रीलंकेचे खेळाडू पण अॅक्टींग करतात काय? कारण शेवटी स्कोअर वाढल्यावर झालेला आनंद तर अस्सल होता त्यांच्या वागण्यातून. आणि मुख्य म्हणजे खरंच कुठलाही खेळ असा चढ-उतारांसहीत आधीच ठरवता येऊ शकतो ??
मित्रांनो, तुमच्या जल्लोषावर, आनंदावर मळभ टाकायची इच्छा नाहीय. ते आलं की कसं वाटतं हेही अनुभवतोय.. पण फक्त स्वत:च्या मनातली जळमटं, जळजळ (किंवा जे काही असेल ते) बाहेर टाकण्यासाठी कुणी आमच्या आनंदावर शेण पसरवत असेल, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्यासाठी हे कुटणं...
वाचने
4856
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेट बट ..
सुहास हिच प्रतिक्रीया देणार
In reply to लेट बट .. by सुहास..
पराहास हिच प्रतिक्रीया देणार
अशा चर्चा
फिक्स
मला शेवटच्या बॉलला
मिपावरील काही लेखन व
होय तर! तेवढच राह्यलय
In reply to मिपावरील काही लेखन व by परिकथेतील राजकुमार
पर्याच्या विधानात तत्थ्य आहे.
In reply to होय तर! तेवढच राह्यलय by रेवती
छे छे...
In reply to पर्याच्या विधानात तत्थ्य आहे. by टारझन
विसर रे मित्रा!
तेच तर...
In reply to विसर रे मित्रा! by संदीप चित्रे
पॉस्ट्राडेमसिजम'
भारतच जिंकणार हे सांगणारे समस
हा हा हा
मी काय म्हणतो, समजा असेल
एकदा शंकासुर आला की असाच छळत
हेच ना...
In reply to एकदा शंकासुर आला की असाच छळत by गवि
भारताने मॅच जिंकण्यासाठी कोणी
त्याला "बे चोक आठ" म्हणायचे
असले sms पाठविणार्यांच्या
ही बातमी वाचा.