डॉ. स्ट्रेंजलव्ह ... आणि माझं स्फोटांवर प्रेम जडलं
"डॉ. स्ट्रेंजलव्ह" हा चित्रपट आपण पाहू या असं माईकने घरात जाहीर केलं तेव्हा सर्व ब्रिटीश घरमित्रांनी जोरात "हेऽऽऽ" करत गलका केला. त्यांच्या लेखी आम्ही काही "फकिन' फॉरीनर्स" मात्र एकमेकांकडे "हे काय नाव झालं का?" अशा चेहेर्यांनी पहात होतो. अर्थात असलं काहीतरी नाव बनवून आम्हाला बनवण्याचा म्याडपणा माईक करू शकतो अशीच खात्री त्यात जास्त होतो. तो दाणदाण पावलं वाजवत डीव्हीडी घेऊन टीव्हीरूममधे आलाही.
"Dr Strangelove: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb" असं नाव असणार्या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल पोस्टर बघूनच निर्माण झालं.
मिसळपाव