Skip to main content

कोसळणारा रुपया

लेखक ए.चंद्रशेखर यांनी गुरुवार, 15/12/2011 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस भारतीय रुपयाची अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत सारखी घसरण होते आहे. गेल्या एक दोन दिवसात तर एका अमेरिकन डॉलरला 53 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते आहे. अनेक अर्थ शास्त्रज्ञ या बाबतीत हिरीरीने आपली मते मांडताना दिसत आहेत. रुपया का घसरतो आहे? तो असाच घसरत राहिला तर त्याचा सर्व साधारण माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो?यावर काही मार्ग आहे का? या गोष्टी बर्‍याच ठिकाणी वाचायला मिळाल्या. परंतु असे होण्याचे अचूक कारण लक्षात येत नव्हते. ते शोधून काढता येते का?

चपला आणि सत्कार - भाग १३ - अंतिम.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 15/12/2011 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
नाथा अन बाकीचे चार जण केगांव पासुन निघाले, तिथुन बार्शी रोडला येउन ते मधल्या रस्त्यानं तामलवाडीला आले, तिथं बाउंड्रीच्या हॉटेलजवळ गाडीत अजुन थोडी भाजी भरुन घेतली, पुढं जाउन एकाआडवाटेला अंधारात थांबुन दोघांनी गाडीच्या नंबरप्लेट बदलल्या, समोरचे शो चे लाईट काढुन टाकले, आणि लटकणारा हनुमान, डॅशबोर्डावरचा गणपती काढुन ठेवला. त्या दोघांपैकी एकजण अंधारातच चालत पुन्हा सोलापुरच्या दिशेनं यायला निघाला.

एक मासा : सुदैवी की दुर्दैवी?

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 14/12/2011 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या औरंगाबाद-वेरूळची जी प्रवासवर्णन मालिका लिहितो आहे त्या प्रवासात एक क्वचित आढळणारी गोष्ट बघितली, अंध मासा. सकाळी लवकर पुण्याहून निघून दुपारी जेवायच्या वेळी औरंगाबादला पोहोचलो. कडकडून भूक लागली होती. शहरात शिरल्या-शिरल्या जे पहिले हॉटेल लागेल त्यात जेवून घेऊया असे ठरले. शहरात आल्यावर एक सुप्रिया नावाचे हॉटेल दिसले. ते कसे असेल ह्याची जरा चाचपणी करायला आत शिरलो माझ्या धाकट्याला घेऊन. आत भिंतींवर मोठे मोठे फिश टॅन्क्स होते, भिंतींवर म्हणजे भिंतींत कंसील्ड असलेले. माझ्या धाकट्या मुलाचा मासे हा वीक पॉंईंट आहे. लगेच त्याची ऑर्डर आली, 'इथेच जेवायचे' आणि तो एका टेबलावर जाऊन बसलाही.

डोनटस्

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 14/12/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
डोनटस् खुप प्रकारचे असतात काही डीप फ्राय केले जातात तर काही ओव्हनमध्ये बेक केले जातात. बेक केलेले डोनटस् ना केक डोनटस् असे देखील म्हटले जाते व ते यीस्ट फ्री असतात.

शेअरबाजारातून नेहमीच चांगले पैसे कसे मिळवावेत?

लेखक सदानंद ठाकूर यांनी बुधवार, 14/12/2011 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
(सूचना:- या किंवा अन्य कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीच्या लेखातील मतांशी किंवा शिफारशींशी मिपा व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही.) शेअरबाजारातून नेहमीच चांगले पैसे कसे मिळवावेत? तुमच्या मनात शंका येत असेल कि सध्या शेअरबाजारापासून दुरच राहीलेले बरे कारण गेले जवळपास एक वर्ष सेन्सेक्स १५५०० ते १८००० या दरम्याने वरखाली होत आहे. पण खरं म्हणजे हाच काळ शेअरबाजारातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे हे मी स्वानुभवाने सांगतो.

माझं गाव

लेखक स्पा यांनी बुधवार, 14/12/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव मु पो . -नवेघर, आडिवरे, ता.राजापूर, जि. रत्नागिरी हा पत्ता इतकी वर्ष नुसता ऐकून होतो, स्वतःच गाव असूनही फक्त एकदा लहानपणी ४ ते ५ तासांसाठी गेलो असेन. बास त्याव्यतिरिक्त आपल गावाला काहीच नाही , हेच मनावर ठसवले गेले होते.पण अचानक तिथल्या घराच्या व्यवहारासंबंधी कोर्टाची बोलणी सुरु झाली, तशी रीतसर नोटीस आमच्या काकांनी पाठवली, काही कागदपत्रांवर आमच्या सह्या आवश्यक होत्या आणि ती संबंधित कागदपत्र मिळवण्याची जबाबदारी आमच्या तीर्थरूपांनी आमच्यावर टाकली. आता गावाला जाणे आलेच. अचानक ठरल्याने रेल्वेने जाण्याचा प्रश्नच नव्हता.

दासबोध अभ्यास संकेतस्थळ उदघाटन आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम

लेखक विटेकर यांनी बुधवार, 14/12/2011 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्रीराम समर्थ || नमस्कार, मागे मिपावर लिहल्याप्रमाणे दासबोध अभ्यास संकेतस्थळाच्या उद्घाटनाचा आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे दोन्ही दिवस भरत नाट्य मंदिर भरले होते.समर्थ आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. (येथे फोटो कसे लावतात याचे तांत्रिक माहीती नसल्याने चेपु चा दुवा देत आहे.

घेऊ कसा उखाणा ..?

लेखक मनीषा यांनी बुधवार, 14/12/2011 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
बरं का मंडळी ...... एकदा एका गावात .. मोठी लगीन घाई झाली पायताणं नाही कुणाच्या .. पायामध्ये राहिली । फेटे आणि मुंडाशी .. डोईवर चढली बिलवर , पाटल्या संगे .. नथ ही झुलली । जिलब्यांची रास .. श्रीखंडाचा घास रंगीत रांगोळीची .. पंगतही सजली । नाव घ्या, नाव घ्या .. मंडळी बोलली नवी नवी पाटलीण .. गालातच हसली । घेऊ कसा उखाणा .. (तिला) कोडं पडलं नवं कोणाचं नाव ? .. आणि कसं बाई घ्यावं? । सगळे म्हणती बाई .. लाजू नको काही नाव घे झोकात .. आणि सांग काही-बाही । पाटलीण बोलली लाजून .. घेते मी नाव मान तुमचा राखून ताई, माई, अक्का जरा ...

ही जिवाला आस आहे

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 14/12/2011 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/20071 , http://misalpav.com/user/7236 आणि http://misalpav.com/user/707 जेवणाच्या पंगतीला , मोदकाचा घास आहे आणखी तो मठ्ठ्या संगे , मसालेदार भात आहे भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे मीठ,चटणी ,लोणचे, कुरडया ,कोशिंबीरी डाळ वांगे नी फोडणीची , ही तर्रीही खास आहे. चवीचवीने जेव जरा , बेत आज खास आहे पाहिले नसे कधी असा ;आतिथ्याचा स्वर्ग आहे चंदनाचा मोगर्‍याचा , केवड्या

भरारी

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 14/12/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा मारू कुणा मी हाका तू देवाघरचा वासी सांगू दुखः कुणाला तू केवळ मनात वससी दाखवू कुणाला मनातली स्वप्ने तुजसवे पाहिलेली जो तो हळहळे क्षणभर नि दाखवे सहानुभूती नको खोटा आधार कुणाचा जगण्यासाठी तुझ्या प्रेमाच्या बळावर मरीन भरारी मोठी
काव्यरस