डोनटस् खुप प्रकारचे असतात काही डीप फ्राय केले जातात तर काही ओव्हनमध्ये बेक केले जातात. बेक केलेले डोनटस् ना केक डोनटस् असे देखील म्हटले जाते व ते यीस्ट फ्री असतात.
साहित्यः
१ कप मैदा
१/२ कप साखर
१ टेस्पून बेकिंग पावडर
१ अंडे (रुम टेम्परेचर ला असलेले)
१/२ कप दुध
१/२ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
४ टेस्पून तेल
सजावटीसाठी चॉक्लेट सॉस आणी स्प्रिंक्लस.
चॉक्लेट सॉस बनवण्यासाठी: १/२ कप दुधात १ टेस्पून बटर मिक्स करुन मायक्रोव्हेवमध्ये १० सेकंद गरम करणे.
१ कप पिठीसाखरेत २ टेस्पून कोको पावडर व वरील दुध-बटर चे मिश्रण ३ टेस्पून घालून एकत्र करणे.
पाकृ:
प्रथम मैदा व बेकिंग पावडर एकत्र ३ वेळा चाळून घेणे.
त्यात साखर नीट मिसळावी. आता त्यात अंड , दुध व व्हॅनिला एसेन्स घालून ईलेक्ट्रिक बीटर ने एक मिनिट मिश्रण फेटून घेणे. एक ही गुठळी राहता कामा नये. (ईलेक्ट्रिक बीटर नसल्यास वायर व्हिस्क चा वापर करावा, तो ही नसल्यास काट्याचा वापर करावा )
आता त्यात तेल घालून परत एक मिनिट मिश्रण फेटून घेणे.
मी येथे डोनट-मेकरचा वापर केला आहे , तुम्ही डोनट-पॅन (केकची भांडी मिळतात तसा हा पॅन ही मिळतो) वापरु शकता.
डोनट-मेकर वापरत असाल तर तो आधी प्री-हीट करुन घ्या व त्याला थोडे तेलाने ग्रीज करा व त्यात मिश्रण ओता. ३-५ मिनीटात डोनटस् तयार होतात. जर का डोनट-पॅन वापरणार असाल तर ओव्हन प्री-हीट करुन घ्या व हे मिश्रण पॅनमध्ये ओतून २०० डिग्री सें वर ७-८ मिनीटे बेक करा.
तयार डोनटस् असे दिसतात. हे मिनी डोनटस् आहेत.
तयार डोनटस् ना चॉक्लेट सॉसमध्ये एका बाजूने बुडवून कुलिंग रॅकवर ठेवणे. कुलिंग रॅकच्या खाली एक ताट ठेवावे जेणेकरुन ओघळणारे चॉक्लेटचे थेंब त्यात पडतील.
त्यावर स्प्रिंक्लस घालून सजावट करणे. थोड्यावेळ असेच ठेवावे सेट होण्याकरता.
मस्त ताज्या डोनटस् चा आनंद लुटा चहा, कॉफी किंवा दुधाबरोबर. नुसतेही खायला छान लागतात :)
याद्या
22350
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
करुन पाहिन लवकरच
In reply to मस्त by रश्मि दाते
मस्त ,यम्मी दिसत आहेत
In reply to करुन पाहिन लवकरच by पक पक पक
मी पण..
In reply to मस्त by रश्मि दाते
इतके कष्ट घेणे काही जमणार
+ १
In reply to इतके कष्ट घेणे काही जमणार by गणपा
नेहमी प्रमाणेच सॉल्लीड..हॅट्स
सह्ही!!
फारच
बाई.. तू सरळ डंकीन डोनट्स ला
मस्त दिसतायत!
वर्ज्य..
पेठकर
In reply to वर्ज्य.. by प्रभाकर पेठकर
समाधानी आहे.
In reply to पेठकर by सन्जोप राव
सुप्पर लाईक करण्यात आलेले
In reply to समाधानी आहे. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to सुप्पर लाईक करण्यात आलेले by प्यारे१
+२
In reply to सुप्पर लाईक करण्यात आलेले by प्यारे१
संयम..
In reply to +२ by मन१
मोहाला बळी पडा
In reply to संयम.. by प्रभाकर पेठकर
ऑसम!
बंडखोरी...
झकास
झक्कास.
+१
In reply to झक्कास. by चिंतामणी
अरे काय करु, ते फोटो पाहुन
In reply to +१ by सोत्रि
सानिका........................
हम्म्म चमचे.... (दातावर
वर गणपाने त्राग्याने म्हटले
In reply to हम्म्म चमचे.... (दातावर by प्यारे१
मस्त सजावट!
सानिका ताई खुप छान आहे
छान..
डोनटस मस्त दिसतायेत
तोंडाला पाणी सुटले आहे.
जुकॉचे दिवस आठवले. कॉलेजच्या
अंडं असल्याने भटास डोनट्स
eggs are vegetarian
In reply to अंडं असल्याने भटास डोनट्स by llपुण्याचे पेशवेll
लिहीणारे येड*व्यासारखे काहीही
In reply to eggs are vegetarian by चिंतामणी
झक्कास...
.
मस्तच गं.... सही... एकदम
धन्यवाद मृणाल
In reply to मस्तच गं.... सही... एकदम by Mrunalini
त्या स्मायलीज चुकीच्या ठिकाणी
In reply to धन्यवाद मृणाल by सानिकास्वप्निल
:)
In reply to त्या स्मायलीज चुकीच्या ठिकाणी by अन्या दातार
अगं ए...
मस्तच! कॅटरिना कैफ पाकृ.
धागा वाचताक्षणी ठरवले होते की
डोनट्स फारच यम्मी.........