Skip to main content

प्रेम करतो मी तुझ्यावर मनात

लेखक वडा खालचा वडा यांनी शनिवार, 21/04/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम करतो मी तुझ्यावर मनात हे काही सांगता येईना तुझ्या कानात | सांगावे हे तुजला घेउनी हातात हात म्हणुनी मी आलो घेउनी लाल गुलाब || पण पहिले तर आधीच होता लाल गुलाब तुझ्या हातात मग मी हिरमुसलो मनातल्या मनात | कारण झाला होता उशीर प्रेम व्यक्त करण्यात मग मी विचार केला काय अर्थ या जगण्यात ??|| निघून गेलो समुद्रा पाशी प्राण त्यागण्यास '' मग मात्र परत आले माझ्या लक्षात | काय आहे हरकत जिने सकाळी हा "लाल गुलाब" दिला हातात तिलाच हो म्हणण्यात ?? || मोरया .....
काव्यरस

पैंजणवाले जप जरा

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 21/04/2012 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
लचकत मुरडत चाले कामिनी दिपवत चमकत चपळ दामिनी वो बावळी ओ सावळी अगं ए चंचल क्षणभर थांब ना थांब ना थांब ना पैंजणवाले जप जरा, इथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना जशी दामिनी ती, मेघांतून उडे थोडी चाले पुढे, हलकेच वळे उचल ए, नयन तव काळे पण एवढे समज की, कुणाची लागो हाय ना कुठे जाशी अशी मदिराशी पिऊन मदमस्त पवन पदरात भरून आहे सारे जगच मस्तीभरे पाहा पण कधी, ऋतुआधी, रात काळी, येवो ना कधी ऐसे न हो, काही गोष्ट घडे फिरकी ही माझी, तुझा नाच बने नाच ना, ना बनून चकोरी घुंगरू कधी, स्पंदन माझे, होवोत ना एक राज की बात, सांगत आहेत किशोरदा. मात्र त्यांना शब्द कुणी पुरवले आहेत?
काव्यरस

फायनल ड्राफ्ट : एक नितांत सुंदर नाटक.

लेखक तर्री यांनी शनिवार, 21/04/2012 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
हे नाटक खूप दिवस हातास लागत नव्हते. एका मित्राने “जरूर बघ “ अशी शिफारस केली होती. गेल्या गुरुवारी रंगायतनला प्रयोग होता. हल्ली फोन करून तिकीट मिळवता येते. त्यामुळे दूरच्या नाट्यगृहातही “एकाच” खेपेत नाटक पहाणे शक्य होते. नाटक सुरु होण्यापूर्वी तिकीट खिडकीशी प्लान वरून गर्दीचा अंदाज घेण्याची मला नेहमीच उत्सुकता असते. “प्लान तर रिकामाच दिसत होता”. अर्थात नाटकाचा दर्जा आणि होणारी गर्दी ह्यांचा काही सम्बंध नसतो . हाच अनुभव चारचौघी ( सुरवातीला) , किरवंत , आत्मकथा , लग्न हया नाटकांना आला होता. फायनल ड्राफ्ट हे एका साध्या कथेवर बेतलेले नाटक आहे .

कलsssssssssर्क

लेखक अन्या दातार यांनी शनिवार, 21/04/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम तुम्ही माझे अभिनंदन करावे अशी मी विनंती करतो. स्वतःच आरती ओवाळून घेतोय, कारण हा पराक्रमच असा आहे. मी चक्क मनोज कुमार कृत चित्रपट ‘क्लर्क’ (उच्चार: कलर्क) पूर्ण पहिला. ज्याचा एकतरी पुरावा म्हणजे हे रसग्रहण! दचकू नका. माझ्या भुताने लिहिले नाहीये. खुद्द मी; एक मर्त्य मानव या चित्रपटाचे रसग्रहण लिहीत आहे. आणि मी चक्क जिवंत आहे हे विशेषत्वाने लक्षात घ्या मंडळी! हं, तर या चित्रपटातील पात्रांचा(या शब्दाला खरोखर जागलेत सगळेच!) परिचय करून घेऊ.

''मसाला'' म(स्ट)स्त आहे...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 21/04/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मसाल्या'ची मी तर प्रोमोज पाहिल्या पासुन वाट बघत होतो. वासही चांगला खमंग येत होता.आणी कारखान्याचा अंदाज असल्यानी तो खमंग असणार इतकं मनाशी पक्कं झालेलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिनुमा बघत असताना त्यात पुर्ण हरवायचा आनंद घेता आला. गिरिश कुलकर्णि. आणी अमृता सुभाष एक गरिब जोडपं अतिशय कष्टाळुपणा हा अंगिभूत गुण असलेलं,हे जोडपं हीच चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका आहे.

मुक्तक..सास्वा विरुद्ध सुना

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 21/04/2012 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
सास्वा विरुद्ध सुना वाद आहे जुना तरीही रंगतो अजुनी जसा पानासवे चुना अल्लड अवखळ नव्हाळी होऊन येते सून घरातील हिरवाई मात्र झाली असते जून थिरकत भिरभिरते सून, तिकडे सासूचा डोळा मनी शंका का ती येई , 'लेक माझा भोळा' ?
काव्यरस

आंब्याचे स्वागत असो....

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 21/04/2012 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल च्या महिन्या अखेरीस बाजारात आंब्याच्या बाबतीत माहिती ( वर्तमानपत्रातून ) यायला सुरु होते उदा. सध्या आंबा १००० रु डझन इत्यादी इत्यादी. याच काळखंडात जवळपासच्या एखाद्या आंब्याच्या झाडावरुन कोकिळेच्या मधुर सुरातील साद ऐकायला बरे वाटते आणि या ऋतूचे मनापासून स्वागत करायला बरेही वाटते. या आंब्याबद्दल काही इकडुन तिकडून संग्रहित केलेली माहिती. आंब्याच्या नावाची जन्मकहाणी तामिळ शब्दावरुन झाली आहे असे मानले जाते. तमिळ शब्द -> मॅगे किंवा मंगके. भारतामध्ये १५२ लक्ष टन आंब्याचे उत्पादन होते.

सावधान ! मसाला आला आहे

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 21/04/2012 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
वळू, विहीर, देऊळ अशा अति उत्कृष्ट कलाकृतींनंतर गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी आपल्यासाठी घेऊन आले आहेत चित्रपट 'मसाला'. वळू, विहीर, देऊळ या चित्रपटांनी मराठी रसिकांना मनमुराद आनंद दिला आहे. विशेषतः गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी , अमृता सुभाष या टीमचे कौतुक यासाठी की त्यांनी मराठीमधे उत्तम अशा ग्रामीण चित्राची मालिका पुन्हा सुरू केली. त्यांची अचाट गुणवत्ता पाहूनच कधी अमिताभ बच्चन कधी सुभाष घई असे लोक उमेश गिरीशच्या मागे उभे राहीले. असो जाता जाता सांगतो याचा दिग्दर्शक आहे संदेश कुलकर्णी. 'सखाराम बाइंडर' चे दिग्दर्शन 'माकडाच्या हाती शांपेन' मधील अप्रतिम रोल संदेशच्या नावावर आहे . त्