एप्रिल च्या महिन्या अखेरीस बाजारात आंब्याच्या बाबतीत माहिती ( वर्तमानपत्रातून ) यायला सुरु होते उदा. सध्या आंबा १००० रु डझन इत्यादी इत्यादी.
याच काळखंडात जवळपासच्या एखाद्या आंब्याच्या झाडावरुन कोकिळेच्या मधुर सुरातील साद ऐकायला बरे वाटते आणि या ऋतूचे मनापासून स्वागत करायला बरेही वाटते.
या आंब्याबद्दल काही इकडुन तिकडून संग्रहित केलेली माहिती.
आंब्याच्या नावाची जन्मकहाणी तामिळ शब्दावरुन झाली आहे असे मानले जाते. तमिळ शब्द -> मॅगे किंवा मंगके.
भारतामध्ये १५२ लक्ष टन आंब्याचे उत्पादन होते. ( क्षेत्र लागवड ३६% आणि फळाच्या उत्पादनातील हिस्सा २०%).
भारताची एकुण लागवड जगाच्या बाजारात ४५% आणि दुसरा महत्त्वाचा स्पर्धक चीन.
भारत, पाकिस्तान आणि फिलिपीन्स या देशाचा राष्ट्रीय फळाचा बहुमान, वंगभुमीचा मात्र राष्ट्रीय वृक्षाचा बहुमान.
आंब्याच्या झाडाच्या पानांचा वापर लग्नसंमारभात होतो आणि त्यामागे एकच हेतु असतो नूतन दांपत्यास अशीच बहु संतती होवो.
आंब्याची फळे जास्त्तीत जास्त खाण्याने पूर्ण वर्षासाठीचा लोह पुरवठा शरीरात साठवला जातो. गर्भवती, आजारी, मुलांनी आंब्याच्या फळाचे सेवन करणे त्यांच्या साठी हितकारक.
आंब्याच्या रसात चांगले तूप टाकूनच खावे, म्हणजे रस बाधत नाही.
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंब्याच्या अनेक असलेल्या प्रजाती पैकी उत्तम आंबा कृपया सुचवा....
वाचन संख्या
8056
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रेट
आंब्याच्या नावाची जन्मकहाणी
मँगो शब्दाची व्युतप्ती.
In reply to आंब्याच्या नावाची जन्मकहाणी by मृत्युन्जय
आंबा!
-
In reply to आंबा! by पैसा
सहमत मी पण
In reply to - by अमोल केळकर
कुणी अजून फोटो पण नाही टाकला
आंब्याच्या पाककृतींचेही स्वागत असो!
+१
In reply to आंब्याच्या पाककृतींचेही स्वागत असो! by बहुगुणी
देवगड हापुसच !!!