Skip to main content

सावधान ! मसाला आला आहे

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 21/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
वळू, विहीर, देऊळ अशा अति उत्कृष्ट कलाकृतींनंतर गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी आपल्यासाठी घेऊन आले आहेत चित्रपट 'मसाला'. वळू, विहीर, देऊळ या चित्रपटांनी मराठी रसिकांना मनमुराद आनंद दिला आहे. विशेषतः गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी , अमृता सुभाष या टीमचे कौतुक यासाठी की त्यांनी मराठीमधे उत्तम अशा ग्रामीण चित्राची मालिका पुन्हा सुरू केली. त्यांची अचाट गुणवत्ता पाहूनच कधी अमिताभ बच्चन कधी सुभाष घई असे लोक उमेश गिरीशच्या मागे उभे राहीले. असो जाता जाता सांगतो याचा दिग्दर्शक आहे संदेश कुलकर्णी. 'सखाराम बाइंडर' चे दिग्दर्शन 'माकडाच्या हाती शांपेन' मधील अप्रतिम रोल संदेशच्या नावावर आहे . त्यामुळे संदेश कुलकर्णीचे दिग्दर्शन ही 'मसाला'ची एक सर्वात मोठीच जमेची बाजू असणार आहे. तर करुया चर्चा मसाल्याची......

वाचने 4318
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

जुन्याकाळी म्हणे चित्रपटाच्या जाहिरातीची पँप्लेट वाटायला पोरं यायची झांजे वैग्रे वाजवत. त्याची आठवण झाली. बाकी ह्या माहितीपूर्ण आणि अप्रतिम धाग्याबद्दल आपणास एक छोटीशी भेट :-

जोग साहेब.. मनापासून धन्यवाद सदर चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल हल्ली इथे मराठी चित्रपटांची माहिती समजत नाही , ती समजली म्हणून परत एकदा धन्यवाद असेच उत्तमोत्तम लिखाण करत राहा

अगदी आश्चर्यकारकरीत्या हा चित्रपट काल बघण्याची संधी मिळाली. चित्रपट ठीकठाक आहे. पण गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, हृषीकेश जोशी यांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भुमिका खणखणीतपणे सादर केल्या आहेत. मसाल्याचे कथा-पटकथा-संवाद लेखक कोण आहे ह्याचा मुद्दाम शोध घेण्याची गरज भासतच नाही, तो 'गिरीश कुलकर्णीच' ही बाब चित्रपट पाहतानाच सतत जाणवत राहते. चित्रपटात काही लूज एन्डस् नक्कीच आहेत. तसेच, चित्रपट पाहताना देऊळशी सतत तुलना होत राहते. पण उमेश-गिरीशसाठी ही गोष्ट कानाआड करून चित्रपट एकदा तरी पाहण्यास हरकत नाही.

In reply to by हसरी

@मसाल्याचे कथा-पटकथा-संवाद लेखक कोण आहे ह्याचा मुद्दाम शोध घेण्याची गरज भासतच नाही, तो 'गिरीश कुलकर्णीच' ही बाब चित्रपट पाहतानाच सतत जाणवत राहते.>>> +१०१ @ही गोष्ट कानाआड करून चित्रपट एकदा तरी पाहण्यास हरकत नाही.>>> http://www.misalpav.com/node/21459

चर्चेचा विस्तार केल्यास रंगत वाढेल, नाहीतर...

'अशा बर्‍या कलाकृतींनंतर', हे वास्तववादी वाटताय का ?

कर्नाटकात मराठी आणि मराठी माणसाला संपवायची मोहिम असताना या चित्रपटात कानडी शब्द असलेले गीत आहे आणि चित्रपटवाले मोठ्या कौतुकाने त्याचा प्रचार करत आहेत याचे वाइट वाटले. कलेला बंधन नसते वगैरे वाक्ये टाळ्या घ्यायला ठिक आहेत पण कर्नाटकातल्या महाराष्ट्र आणि मराठी विरोधी धोरणाचा स्थानिकांनी निषेध करुन 'असु द्या की मराठी शाळा, असु द्या की बेळगावातल्या दुकानांवर मराठी पाट्या' असे म्हटल्याचे ऐकीवात नाही. कानडीच्या पाठीराख्यांनी मराठीचा द्वेष केला म्हणून आपण कानडीचा द्वेष करावा असे नाही, पण निदान कौतुक तरी करु नये.

निदान कौतुक तरी करु नये.>> का ही ही. रेवण-सारीका सोलापुरात असतानाचा काळ त्या गाण्यामधून दाखवलेला आहे. कानडीमिश्रीत मराठी भाषा दाखवली नसती तरच नवल! हिंदी चित्रपटात मुंबई-पुण्यातील प्रसंग असेल आणि पात्रांच्या तोंडी मराठी भाषा दाखवली असेल तर लगेच 'वा वा' होते, मग मराठी चित्रपटात कानडी भाषा दाखवली तर लगेच प्रांतीय वाद उकरून का काढायचा?

डोक्यात जाते.. त्यामुळे हा चित्रपट बाकी कितीही भारी वगैरे असला आणि गिरीश कुलकर्णीचं काम आवडत असलं तरी केवळ ती अमृता सुभाष आहे म्हणून पाहण्याची शक्यता खूप कमी.