Skip to main content

प्रेम करतो मी तुझ्यावर मनात

शनिवार, 21/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम करतो मी तुझ्यावर मनात हे काही सांगता येईना तुझ्या कानात | सांगावे हे तुजला घेउनी हातात हात म्हणुनी मी आलो घेउनी लाल गुलाब || पण पहिले तर आधीच होता लाल गुलाब तुझ्या हातात मग मी हिरमुसलो मनातल्या मनात | कारण झाला होता उशीर प्रेम व्यक्त करण्यात मग मी विचार केला काय अर्थ या जगण्यात ??|| निघून गेलो समुद्रा पाशी प्राण त्यागण्यास '' मग मात्र परत आले माझ्या लक्षात | काय आहे हरकत जिने सकाळी हा "लाल गुलाब" दिला हातात तिलाच हो म्हणण्यात ?? || मोरया .....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2679
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कळळ नाय!! कशाचा कशाला काही संदर्भच लागत नाहीये!! कोणी तरी रसग्रहण करा रे!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

फक्त कविता म्हणून न वाचता मुक्तक म्हणून वाचायचं. हा कवीचा "प्रेमाचा गुलकंद" टाईप अजरामर काव्य लिहिण्याचा फसलेला प्रयोग असावा.

In reply to by धन्या

हे तुम्हाला कळले आणि तुम्ही ते मला समजावून सांगितलेत त्याबद्दल तुमचे कसे बरे आभार मानू? ;) कवीला माझे शतशः आभार, असे काव्य दुर्मिळचं. माझी बुद्धी खरचं कमी पडते हो अशा ठिकाणी. :(

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

हे तुम्हाला कळले आणि तुम्ही ते मला समजावून सांगितलेत त्याबद्दल तुमचे कसे बरे आभार मानू?
कसचं कसं.
कवीला माझे शतशः आभार, असे काव्य दुर्मिळचं.
हे अगदी लाखमोलाचं बोललात. :)
माझी बुद्धी खरचं कमी पडते हो अशा ठिकाणी.
हरकत नाही. सांभाळून घेतल्या जाईल. ;)

ही कवीता म्हणजे स्वानुभवाचा मुक्ताविष्कार आहे असे दिसते. कवीला जो अनुभव आलाय तो तो स्पष्ट लिहून मोकळा झालाय. शेवट सकाळी गुलाब देणा-या व्यक्तीस 'हो' म्हणण्याचा अतीशय उत्तुन्ग आशावाद व्यक्त केला आहे. सकाळी उठून केलेला अभ्यास, सकाळी केलेला व्यायाम, सकाळी केलेली पूजा ज्याप्रमाणे फळते, त्याप्रमाणेच सकाळी भेटलेली व्यक्ती च आयुष्याचे सार्थक करू शकते, असे मतही यातून व्यक्त करण्यात आले आहे.