Skip to main content

'लेह' वारी, भाग ६

लेखक मनराव यांनी बुधवार, 06/02/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
'लेह' वारी, भाग १ 'लेह' वारी, भाग २ 'लेह' वारी, भाग ३ 'लेह' वारी, भाग ४ 'लेह' वारी, भाग ५ असेच उनाडक्या करत वेळ घालवला आणि रात्री एका हॉटेल मधे जेवलो. जेवण झाल्यावर शतपावली करताना घरी फोन करून सगळा रिपोर्ट सांगितला, रूम वर गेलो, हिशोब केला आणि झोपलो. सकाळी लवकर उठलो पण आरामात सगळं आवरल.

काही जुन्या लेखनांचे धागे

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 06/02/2013 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी मिपावर नवीनच आहे . इथे काही सुंदर (/ "प्रसिध्द") जुन्या लेखांच्या कवितांच्या इतर लेखनाच्या लिन्क्स देणार का ? माझ्या बरोबर इतर नवीन सभासदांना फार मदत होईल . (तसेच जुन्या सभासदांना जुन्या लेखनाचा पुनःप्रत्यय घेता येइल ) प्रतिसादा मधे लेखनाचे नाव , थोडक्यात वर्णन , आणि लिन्क असे अपेक्षित आहे . (अवांतर : १) चांगले लेखन शोधण्याचा स्वतः प्रतत्न केला पण साहित्य ४२४ पाने , चर्चा १८६ पाने , काव्य २४६ पाने , पाककृती ७४ पाने ... इतकं सगं लेखन सर्फ करणे जरा अवघड आहे ...

ॠषीकुमाराचे प्रश्र्ण

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/02/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
एका माळरानावर एक हरीणाची जोडी निवांतपणे चरत होते. अतिशय सुंदर गोजीरवाणी जोडी होती ती. दोघांनीही नुकतेच यौवनात पदार्पण केले होते. सहजीवनाचा हा त्यांचा पहिलावहीला अनुभव होता. तारुण्याचा उन्मादाच्या शिखरावर होते ते दोघेजण. एकमेकांच्या तोंडावर तोंड घासत. एकमेकांना ढुशा मारत त्यांचे प्रणयाराधान सुरु होते. नुकत्याच झालेल्या पावसा मुळे मोठे छान लुसलिशीत गवत उगवलेले होते. नविनच उगवलेल्या या कोवळ्या गवता मुळे त्यांना पोट भर खायला मिळत होते. त्यामुळे खुश झालेली जोडी इकडे तिकडे हुंदडत फिरत गवताचा आस्वाद घेत होती. त्यांच्या गवतात फिरण्या मुळे गवतातले किडे पण उडत होते.

'स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 06/02/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे 

                                                                       

मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा - पुरवणी

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 06/02/2013 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
आदिजोशीने दिलेला 'आँखो देखा हाल' फक्त चर्चगेटहून आलेल्या मिपाकरांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएम) कडून आलेल्या लोकांची संख्या जास्त होती, पण त्यातल्या कुणीच काही लिहिले नाही आणि बहुधा त्यांनी आदीला 'फीडबॅक' दिला नसेल म्हणून त्यानेही त्यांच्याबद्दल फारसे लिहिलेले दिसत नाही. त्यामुळे मीच पुढाकार घेऊन चार ओळी लिहायचे ठरवले. हे जर प्रतिसादात दिले असते तर कुणी वाचले नसते असे मला वाटले म्हणून वेगळा लेख लिहिला आहे. मला मिळालेल्या संदेशानुसार मी बरोबर ११ वाजता बृ.मुं.म.न.पा.च्या बहिर्गमनद्वारापाशी (एक्झिटगेटजवळ) जाऊन पोचलो. तिथे दोन तरुण उभे होते.

मेथीगोळ्यांचे सांबार

लेखक रेवती यांनी बुधवार, 06/02/2013 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
घरात असलेले 'स्वयंपाक' हे सिंधूताई साठे यांचे पाककलेचे पुस्तक माझ्यासाठी महत्वाचे असले तरी त्यातले मेथीगोळ्यांचे सांबार तसे दुर्लक्षितच राहिले होते. फार खटाटोपाची पाककृती वाटल्याने तसे झाले. तीन चार वर्षांपूर्वी भरपूर वेळ हाताशी ठेवून हे सांबार केले आणि ही पाककृती आधी का केली नाही अशी चुटपुट मनाला लागली. वाटले तेवढी वेळखाऊ पाकृ नसल्याने मी येईल त्याला मेथीगोळ्यांचे सांबार करून घालण्याचा सपाटा लावला होता. मिपाकरांसाठी आज ही पाकृ घेऊन आले आहे.

नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/02/2013 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे? गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे. असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically . म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते . सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते .

मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 05/02/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा एक मॅटर ऑफ फॅक्ट वॄत्तांत. इनिगोयने धागा टाकल्यापसून ते शनिवारपर्यंत धाग्यावर बरीच चर्चा झाली, बरेच प्रतिसाद पडले. त्यातले बहुसंख्य प्रतिसाद न येणार्‍या मंडळींचे असल्याने गवताच्या गंजीतून सुया शोधत बसण्यापेक्षा इनिगोयने येणार्‍या मंडळींना तिला व्य. नि. करायला सांगून यादी बनवली. १६ जणांनी होकार कळवला. पुष्कळ जणांनी 'येत नाही' हे सांगण्यासाठीही व्यनी केल्याने तिथेही गवताची गंजी झालीच. हा कट्टा फिरता कट्टा असणार आहे हे कळल्यावर आमच्या आशा पल्लवीत झाल्या.

जावई बसले अडून

लेखक अधिराज यांनी मंगळवार, 05/02/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो.

शत्रुघ्न

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 05/02/2013 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत. नाही म्हणायला तसे महाभारतातले नकुल सहदेव देखील उपेक्षित. पण त्यांच्याबद्दल निदान काही कौतुकास्पद शब्द लिहिले गेले.