Skip to main content

त्रागा धागा... वैताग.....

लेखक मन यांनी मंगळवार, 19/02/2013 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा मी का लिहितोय ? कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड. पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस.

निष्पर्ण जाहले तुझ्याविना

लेखक जयवी यांनी मंगळवार, 19/02/2013 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही मी जगत राहिले पुन्हा पुन्हा ऊन्मळले नाही आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी पाण्यात अश्रु मिसळले कुणाला कळले नाही वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही शाळेत रोजची चिडाचिडी अन भांडाभांडी का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही जयश्री अंबासकर
काव्यरस

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 19/02/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्‍यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो.

आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 19/02/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.

"शिवराय"

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 19/02/2013 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली | तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली | दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी | झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी | लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण | वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन | संत महात्म्यांनी केला देवाचा धावा | या धरतीला ताराया अवतार घ्यावा | संतांची गरीब रयतेची, देवास आली दया | म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया | शिवरायांनी ऐसे अघटीत केले | शून्यातून स्वराज्य उभे राहिले | अफझलचा कोथळा बाहेर काढीला | औरंग्याचा तर माजच जिरवला | आदिलशहा निजामासी जागीच रोखले | इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले | संतांचे देवालयांचे केले र

एक कप चहा - भाग २ !!

लेखक फिझा यांनी मंगळवार, 19/02/2013 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक कप चहा - भाग २ !! धरेला मोहरून टाकणारं पावसाचं पाणी , चिंब भिजलेल्या मातीचा तो गोड सुगंध , आकाशाला इंद्रधनूची माळ घालून डोकावणारा भास्कर , मग कापूस पिंजून ठेवल्यासारखे शुभ्र ढग ... असंच बनतं विश्व ..... बहरलेला ऋतू आणि आलं घातलेला ....एक कप चहा !! अनमोल रत्नांना सामावलेला अथांग समुद्र , फक्त मनात साठवता येतील अशी पक्षांची गोड गाणी , कृत्रिम जगालाही मागे टाकणारे अप्रतिम निसर्ग सौंदर्य , दिव्यांचा झगमगाट असून सुद्धा भुरळ घालणारा मंद चंद्र प्रकाश ..... असंच असतं सुख .... क्षण क्षण निसटलेला आणि तृप्त करणारा ...एक कप चहा !! सुख आणि दु:ख डोळ्यात पाणी आणतात खरे , राव असो

आठवणीतले ग्रीस - भाग ४

लेखक nishant यांनी मंगळवार, 19/02/2013 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ दिवस तिसरा: kldf * एथेन्स ते पिराउस सकाळी लवकरच जाग आली. रोजच्या प्रमाणे हॉस्टेल मध्येच नाश्ता करुन बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या मेट्रो स्थानकावर पिराउस कडे जाणारी मेट्रो पकडली.

बाजरीचे ढेबरे

लेखक neeta यांनी सोमवार, 18/02/2013 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक गुजराथी रेसीपी आहे. मी माझ्या बहीणीकडे खाल्ली आणि आवड्ली म्हणून करुन बघितली. सर्वाना आवड्ली म्हणून तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली. तुम्ही पण जरूर करुन पहा. साहित्य : बाजरीचे पीठ (ताजे दळून आणावे), दोन चमचे दही, आल लसूण मिरची पेस्ट, थोडी साखर, मीठ, ओवा चिमूट्भर, तीळ, कसुरी मेथी किंवा ताजी चिरलेली मेथी थोडीशी अथवा किसलेला दुधी, थोडे गव्हाचे पीठ, हळद, मिरची पावडर, दोन चमचे तेल. सर्व साहित्य एकत्र करुन कणके प्रमाणे भिजवावे. प्लास्टिकच्या पिशवीवर गोळा ठेवून लाटावे. तव्यावर तेल घालून ठेपल्याप्रमाणे दोन्ही बाजून भाजावे. गरम खायला द्यावेत दही किंवा कोणत्याही चटणी बरोबर छान लागतात.

१० वी 'क' - भाग ५

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 18/02/2013 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
१० वी 'क' - भाग १ १० वी 'क' - भाग २ १० वी 'क' - भाग ३ १० वी 'क' - भाग ४ "साल्या भिकारचोटा, कुठे उलथला होतास रे इतके दिवस?" बापलेकरला बघताक्षणीच शिव्या घालत त्याच्या पोटात मी दोन तीन गुद्दे ठेवून दिले. गुद्द्यांचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही उलटं दात काढून हसायला लागला. त्याला पाहताच आम्हा दोघानांही खुप आनंद झाला होता.

मिसळ आणि पाव

लेखक बज्जु यांनी सोमवार, 18/02/2013 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
माघी गणेशोत्सव, २०१३, विष्णूनगर, ठाणे - पाककला स्पर्धा - विषय - मिसळ पाव काही रसरशीत कलाक्रुती येथे देत आहे. ही मिसळ खाल्ल्यावर आपली अवस्था मिसाईल सारखी होईल नाही :):)