मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळ आणि पाव

बज्जु · · पाककृती
माघी गणेशोत्सव, २०१३, विष्णूनगर, ठाणे - पाककला स्पर्धा - विषय - मिसळ पाव काही रसरशीत कलाक्रुती येथे देत आहे. ही मिसळ खाल्ल्यावर आपली अवस्था मिसाईल सारखी होईल नाही :):)

वाचने 17364 वाचनखूण प्रतिक्रिया 35

ओ डाएट वर आहे हो....असे फोटो टाकुन का गरीबाला जळवता आहात? ;) डाएट गेलं चुलीत आता...मिसळ हाणायला पाहीजे आता कुठेतरी झणझणीत...:P :P

नगरीनिरंजन Mon, 02/18/2013 - 16:11
मिसळी पाहून खपलो आहे! इतकं पाणी सुटलं तोंडाला की डिहायड्रेशन व्हायची वेळ आलीये.

स्मिता चौगुले Mon, 02/18/2013 - 16:15
पाकृ सेक्शनमध्ये धागा टाकलात तेंव्हा वाटल,मिसळ पावच्या पाकृ दिल्या असतील...उत्साहाने धागा उघडला तर फक्त फोटो,निराशा केलीत आणि फक्त फोटो बघुनच तोंपासु, ते वेगळेच

दिपक.कुवेत Mon, 02/18/2013 - 17:21
नुसत्या मिसळिचे एवढे नाविध प्रकार पाहुनच भुक परत चाळवली (आत्ताच जेवलो असलो तरी)

खादाड Mon, 02/18/2013 - 18:00
अ़़क्षरशः तोंडाचा तलाव झाला !! एक नं चा फोटो एक लंबर आहे !!!

मैत्र Mon, 02/18/2013 - 19:41
काय त्रास आहे.. इथे वडा सुद्धा धड मिळत नाही. मिसळ कुठली.. भयंकर जळजळ झाली आहे.

kanchanbari Tue, 02/19/2013 - 11:38
काही जादु येत असती तर या फोटोतुन एक तरी मिसळीची प्लेट गडप केली असती इथे तर मिसळ काय या मिसळीची अशी लज्जतदार शेव पण नाही मिळत. दया करत जा हो. एवढा त्रास देने बरे नाही.

झणझणीत, बेफाट. लहानपणी कीर्तन ऐकताना एका कीर्तनकार बुवांनी या चविष्ट पा कृ. बद्दल एक गैरसमज करून दिला होता. म्हणे आदल्या रात्रीचे उरलेले पदार्थ एका तिखट जाळ रश्यात कालवतात आणि मिसळ म्हणून विकतात. आज कुठे ते बुवा भेटले तर............ जाऊ दे कदाचित रात्री कीर्तनात असे सांगून सकाळी हाणत असतील ते सुद्धा.

विवेकपटाईत Tue, 04/01/2014 - 19:15
फोटो अति सुंदर. जाड चष्मा असल्या मुळे लिहिलेले वाचता आले नाही. बाकी.मिसळला एकदम नव्या नवरी सारख सजविले आहे, अरे पाव पण जरा लोणी वैगरे लाऊन सजवायला पाहिजे होत. लक्ष्मी नारायणाचा जोड शोभला असता.