Skip to main content

बाजरीचे ढेबरे

लेखक neeta यांनी सोमवार, 18/02/2013 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक गुजराथी रेसीपी आहे. मी माझ्या बहीणीकडे खाल्ली आणि आवड्ली म्हणून करुन बघितली. सर्वाना आवड्ली म्हणून तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली. तुम्ही पण जरूर करुन पहा. साहित्य : बाजरीचे पीठ (ताजे दळून आणावे), दोन चमचे दही, आल लसूण मिरची पेस्ट, थोडी साखर, मीठ, ओवा चिमूट्भर, तीळ, कसुरी मेथी किंवा ताजी चिरलेली मेथी थोडीशी अथवा किसलेला दुधी, थोडे गव्हाचे पीठ, हळद, मिरची पावडर, दोन चमचे तेल. सर्व साहित्य एकत्र करुन कणके प्रमाणे भिजवावे. प्लास्टिकच्या पिशवीवर गोळा ठेवून लाटावे. तव्यावर तेल घालून ठेपल्याप्रमाणे दोन्ही बाजून भाजावे. गरम खायला द्यावेत दही किंवा कोणत्याही चटणी बरोबर छान लागतात. (फोटो काढायला विसरले नाहीतर छान दिसले असते)

वाचने 7326
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

बाजरा मेथीना ढेबरा आवडता प्रकार नाशत्याला उत्तम पर्याय पाककृती छानच आहे :)

पाकृ चांगली वाटतीये. फोटू दिला असता तर बरे झाले असते. माझ्याकडचे बाजरीचे पीठ यावेळी जरा जुने आले असावे. भाकरी नीट होत नाहीयेत. हा प्रकार करून ते संपवले असते.

In reply to by रेवती

फोटो नसल्यामुळे पाककृती कै समजली नाही. पण ''माझ्याकडचे बाजरीचे पीठ यावेळी जरा जुने आले असावे. भाकरी नीट होत नाहीयेत. हा प्रकार करून ते संपवले असते'' हे वाक्य वाचून गहिवरुन आले. :) -दिलीप बिरुटे

फोटो नसतील तर पाकृ फाऊल धरण्यात येते हे लक्षात ठेवा. माझ्यासारखे मिपाकर पाकृ वाचण्यापेक्षा बघायला येतात.

नक्कि ट्राय करणार....बाजरीचे पीठ ईथे मिळालं तर

थालिपीठाचा भाऊ दिसतोय. दोन्ही पिठांचे नक्की प्रमाण सांगा आणि पुढच्या वेळी कराल तेव्हा फोटो जरूर काढा.

"तव्यावर तेल घालून ठेपल्याप्रमाणे दोन्ही बाजून भाजावे"--- ठेपले आणि ढेबरे यांच्या कृतीत काय फरक आहे ? गुजराती लोक प्रवासात निघाले कि ठेपले ( ढेबरे ) बरोबर बांधून घेतात . अगदी विमानात सुद्धा एकमेका जवळ बसता आले नाही तर हाका मारून एकत्र येउन ठेपले खाउन घेतात. एका युरोप मधील आंतरराष्ट्रीय स्म्मेल्नासाठी आलेली ही मंडळी, तेथील जेवणाच्या शाकाहारी पदार्था बद्दल सुद्धा साशंक असल्याने, दुपारचे भोजन ठेपल्यावर उरकताना मी पाहिले आहे. फ्रीज मध्ये ठेवला नाही तरी हा पदार्थ काही दिवस चांगला राहू शकतो.

पिठांचे प्रमाण सांगा.