Skip to main content

तारे तोडण्याची स्पर्धा

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 09/04/2013 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले . एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन ! तळटीप : १) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा २) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे. ३) जे वा

कोकण

लेखक वैशाली१ यांनी मंगळवार, 09/04/2013 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याच्या सिझन मध्ये कोंकणात जावेसे वाटत आहे . तसे मागच्या वर्षी २ वेळा दापोली ला गेले होते. या वर्षी ही दापोली आहेच पण अजून कोणाला चांगली फिरायची जागा माहित असल्यास जाणकारांनी माहिती द्यावी ( कोकणातली ). ठिकाण मुंबई पासून ६-७ तासावर गाडीने जाण्या सारखे हवे आहे. घरगुती राहण्याची सोय अथवा रिसोर्ट माहिती असेल तर सांगावे .

राग दरबारी

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 09/04/2013 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो. पूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे?' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं. जे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक! पण आजकाल माझं मत बदललं आहे. अनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो. 'राग दरबारी' ही श्रीलाल शुक्ल यांची कादंबरी वाचताना हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या.

रायआवळ्याचा चटका

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 09/04/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
या उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात कोकणात!! या प्रत्येक फळाला वेगळी चव असते.

प्राध्यापकांचा विजय असो !

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 09/04/2013 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी तर प्राध्यापक मंडळींविषयी आमचा दृष्टिकोन तुम्हाला माहित आहेच. आता हे आमचे नशीब की आम्हाला चांगले प्राध्यापक मिळाले नाहित. आमचे मित्रवर्य(आम्ही मानतो ते मानतात की नाही माहित नाही ;) ) श्रावण मोडक म्हणतात की कसे वागू नये हे तरी त्या प्राध्यापकांनी शिकवलेच ना ! मग त्यांचे उपकार आहेतच हे ! तर हे आम्हाला पटते त्यामुळे कुणी प्राध्यापक दिसला की आम्ही पटकन बाजुला होत त्यांना दंडवत घालतो आणि सटकतो.

एकटा

लेखक राजा सोव्नी यांनी सोमवार, 08/04/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
एकटा उन्ह असो वा पाऊस वारा ,पडती जरी मज अंगावर गारा , नाही मज कोठेही थारा ,उभा एकटा मी बिचारा, पान्त्स्थाना दाखवावी वाट ,कोठे दऱ्या कोठे घाट , पांथस्थ येती,जाती चुकोनये वाट,दाखविण्या वाट उभा मी ताठ, कसा एकटा मी माईल स्टोन ,खायला उठते मज निबिड रान.
काव्यरस

माझे Chrome extension: 1toN tabs

लेखक लंबूटांग यांनी सोमवार, 08/04/2013 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याची कल्पना सुचायचे श्रेय जाते ते माझ्या आळशीपणाला. मी विविध फोरम्स वर बरेच वाचन करत असतो, आणि त्यातील बर्‍याचशा फोरम्स वर प्रतिसादांची ५० एक पाने असतात. एका पानावरील प्रतिसाद वाचून संपले की पुढील पानावर जाण्यासाठी Next अथवा त्या छोट्याश्या > चिन्हावर click करण्याचा - खासकरून त्या लॅपटॉप च्या Trackpad वरून - जाम वैताग यायचा. ह्याला उपाय म्हणून मी मग साधारणपणे २,३,४… अशा पान क्रमांकावर Ctrl + Click करून ती नवीन टॅब्स मधे उघडून ठेवत असे आणि मग पान वाचून संपले की Ctrl +W ने बंद करत असे. पण बहुतांश साईट केवळ पुढची ५ एक पानांच्याच लिंक्स दाखवतात.

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/04/2013 19:29 या दिवशी प्रकाशित केले.

मगर

प्रेतांच्या ढिगार्‍यावर तो नोटा मोजत होता. कधी-कधी 'मगर' हा अश्रु ही ढाळीत होता.

मुंबईचे मृगजळ

मुंबईच्या मृगजळात त्याला स्वप्नांची जागा भेटली. त्यास का माहिती ती त्याची कब्र होती.

तपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -एक

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/04/2013 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
फार-फार पूर्वी अयोध्येत सत्यव्रत नावाचा राजा राज्य करीत असेल. त्याचा राज्यात सुख, समाधान आणि शांतता नांदत होती. त्याला काहीही कमी नव्हते. एकदा नारद मुनीं कडून स्वर्गाचे वर्णन ऐकले होते. त्या दिवसापासून एकदा तरी स्वर्गाची वारी केली पाहिजे, देवराज इंद्रासोबत सोम पान करावे, रंभा, उर्वशी यांचा नृत्याचा आनंद घ्यावा. वेळ मिळाला तर इतर देवतांसोबत आपल्या पुण्यवान पूर्वजांचे दर्शन घेऊन जीवन कृतार्थ करावे. ही इच्छा त्याचा मनात घर करू लागली. पण स्वर्गात जाणे सोपे नव्हते. एखादा पुण्यात्मा मृत्युनंतर स्वर्गात जातो. पण त्या वेळी ही आपल्या तपोबलाच्या शक्तीने काही ऋषि-मुनी सदेह स्वर्गात येत-जात असे.

Sichuan Sweet & Sour Prawns

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 08/04/2013 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाककृती मी युके गुडफुड चॅनलच्या चायनीज फुड इन मिनिट्स मध्ये पाहीली होती, बनविण्यास सोप्पी आहे :) साहित्य: २०-२५ किंग प्राँस साफ करुन, दोरा काढून घेतलेल्या १ अंडे ५ टेस्पून टोमॅटो केचअप (आबंटपणा व आवडीनुसार कमी-जास्तं) १ टेस्पून बारीक चिरलेले आले १ टेस्पून बारीक चिरलेला लसूण २ लाल मिरच्या बारीक चिरून (थाय स्वीट चिलीज) बारीक चिरलेली कांद्याची पात ४-५ टेस्पून कॉर्नफ्लोअर (मुळ पाककृतीत बटाट्याचे पीठ वापरले होते) १ टेस्पून तिरफळं (Sichuan peppercorns , आवडीप्रमाणे कमी-जास्