स्वीट एन स्पाईसी मँगो करी
आंब्याच्या दिवसात आवर्जुन करावी अशी सोपी पण चविष्ट पाककृती, २-३ वर्षापुर्वी फेसबुकवर वाचली आणि तेंव्हापासून आंब्याच्या दिवसात 'मस्ट' असलेली पाककृती.
साहित्य -
२ घट्ट गराचे पिकलेले गोड आंबे फोडी करुन (बदामी, लंगडा किंवा हौस असल्यास हापूस, पण पायरी किंवा तत्सम रसाचे आंबे नको)
३-४ सुक्या लाल मिरच्या
५-६ टेबलस्पून तीळ
१ कप चिंचेचा कोळ
थोडा गुळ (२-२.५ टेबलस्पून) - साखर नको.
मिसळपाव


साहित्य: थोडा कमी तयार अननस, साखर, लवंग, वेलची दाणे.
कॄती: अननसाचे साल आणि मधला कडक भाग काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्याव्या. अननसाच्या फोडी कुकरला एक शिटी करून वाफवून घ्याव्या. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.