Skip to main content

...शब्द काही

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 11/07/2013 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
कधी बोल तू नेमके शब्द काही तुझ्या मनीचे नेटके शब्द काही अजुनी मला ऐकू येतात तुझिया पत्रातले बोलके शब्द काही आता टाळतो मी तुझी भेट घेणे छळती तुझे हासरे शब्द काही आता बोलणे हे मुक्यानेच होते आता जाहले पोरके शब्द काही पुढे चालणे धर्म हाचि अपूर्व विसरू कसे मागचे शब्द काही
काव्यरस

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०२ : पूर्वतयारी - हवामान

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 11/07/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

तुम्हि नॉनव्हेज खाताना वार पाळता/बघता का?

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 11/07/2013 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपल्याकडे वारांना खुप महत्व आहे किंबहुना आपण प्रत्येक वार हा त्या त्या देवाचा म्हणुन मानतो. उदा. सोमवार शंकराचा, मंगळवार बाप्पाचा, गुरवार साईबाबांचा, शनिवार मारुतिचा ई. तर प्रत्येक देवांसठिचे हे वार कोणी ठरवले? त्याच्यामागे काहि शात्रिय कारण आहे का? तसं ह्या वारांची अडचण अशी नाहि (माझ्याबातीत) पण असं पाहिलय कि नॉनव्हेज खाणारे शक्यतो फक्त बुधवार आणि रविवारी खातात. माझ्यापासुन सुरवात करायची झाल्यास मी काहि पट्टिचा नॉनव्हेज खाणारा नाहि. म्हणजे रोज ताटात मासळिचा तुकडा, चिकन किमानपक्षी ऑम्लेट्/उकडलेलं अंड हवचं असा काहि आग्रह नसतो. कधीतरी चेंज म्हणुन आम्हि आपलं नॉनव्हेज खातो.

महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 11/07/2013 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे हस्तिनापूरचे राज्य हे तसे छोटेसेच. या एवढ्याश्या राज्याच्या वाटणीवरून जे युद्ध झाले, ते मात्र एवढे विराट. त्यात तात्कालीन भारतवर्षातील जवळ जवळ सर्व राजे आपापल्या सैन्यासह लढायला आले. वस्तुत: हा तंटा एकाच कुलातील दोन शाखांचा असताना दूर-दूरच्या राजांना त्यात काय स्वारस्थ्य होते? या युद्धातून त्यांचा काही लाभ होण्यासारखा होता का? त्यातील काही राजांनी दुर्योधनाची बाजू घेतली, तर काहींनी युधिष्ठिराची. यामागे त्यांची काय भूमिका होती? त्यात काही राजकीय समीकरणे होती का? या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.

शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........

लेखक वैभव कुलकर्नि यांनी गुरुवार, 11/07/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे कोपरे खणून बघितले. खोलीला उथळ मानून बघितले. मनाला चपळ करून बघितले. चपळतेला थोडा लगाम लावून बघितले. चंद्राला भाऊ मानून बघितले . नि पिंडाला चाहूल देऊन बघितले. पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........ स्वतःला थोडे शांत करून बघितले रागाला थोडे प्रांत देऊन बघितले निळ्या आकाशी भ्रमंत करून बघितले पैसा बाळगून थोडे श्रीमंत होऊन बघितले समईला वात देऊन बघितले तर देवाला शाप देऊन बघितले पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........

साला एक प्याला , साला एक प्याला

लेखक वैभव कुलकर्नि यांनी गुरुवार, 11/07/2013 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
साला एक प्याला , साला एक प्याला वाट अशी ती गळयातुनी अन मेंदुपर्येंत 'थांबा' याचा मना-मनातुनी रुतलेल्या त्या कळे कळे हो याला खाचा हळू हळू मग सैल अंग ते … खऱ्या खऱ्या मग खोट्या बाता इकडंम-तिकडंम …. तिकडंम-इकडंम पायाच्या त्या तिरप्या वाटा साला एक प्याला , साला एक प्याला …….

नि:शब्द (कथा)

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 10/07/2013 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्या संध्याकाळी घरातून निघतानाच नीलेश टेन्शन मध्ये होता ... आज गुरुवार होता, संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून स्तोत्र म्हटल्यावर आज घराबाहेर पडू नये असे तीव्रतेने वाटत होते. पण रमेशचा फोन पुन्हा आला तेव्हा साडेसात झाले होते. ...येतोस ना, मी वाट बघतोय...... रमेश आणि नीलेश ची दोस्ती अगदी कॉलेज पासूनची. नीलेश एका कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये अकाऊंटंट होता . मुंबईतली कार्गो लोजीस्टिक्स मधली नोकरी सोडून गेली 2/3 वर्षे आपल्याच गावशेजारी असलेल्या कंपनीत स्थिरावला होता. रमेश गेली दोन वर्षे सौदीला काढून सुट्टीवर आला होता . त्याची पिण्याच्या दृष्टीने सौदीला दोन वर्षे चांगलीच उपासमार झाली होती.

फ्लर्टिंग-दि संस्कृत वे.

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 10/07/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स, हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे.

सार्वजनिक उत्सव "मूळ उद्देशापासून" बाजूला पडत आहेत का?

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 10/07/2013 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा अनेक चर्चांमध्ये सार्वजनिक उत्सव आणि त्यांचे महत्त्व वगैरेवर मतांचा गलबला वाचनात येतो. नुकतेच मिपावरही वारी या विजुभाऊंच्या धाग्यात ते म्हणतातः
गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक.

गृह कर्ज सल्ला / माहिती हवी आहे ..........

लेखक jaydip.kulkarni यांनी बुधवार, 10/07/2013 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
गृह कर्जाविषयी सल्ला व माहिती हवी आहे मित्र हो , मी पुण्यात सध्या घर ( Resale Flat , १३ वर्षे जुना ) घेण्याच्या विचारात आहे , त्या संदर्भात सल्ला / माहिती हवी आहे .......... गृह कर्ज कोणते घ्यावे ......?. जुन्या घराविषयी कागदपत्रे कोणती तपासून घ्यावीत .........? जुने घर घेताना त्या घराविषयी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी .........? ह्या व्यतिरिक्त आणखी माहिती आपणा जवळ असल्यास कृपया शेअर करा ... धन्यवाद ........