Skip to main content

साला एक प्याला , साला एक प्याला

लेखक वैभव कुलकर्नि यांनी गुरुवार, 11/07/2013 08:39 या दिवशी प्रकाशित केले.

साला एक प्याला , साला एक प्याला

वाट अशी ती गळयातुनी
अन मेंदुपर्येंत 'थांबा' याचा
मना-मनातुनी रुतलेल्या त्या
कळे कळे हो याला खाचा
हळू हळू मग सैल अंग ते …
खऱ्या खऱ्या मग खोट्या बाता
इकडंम-तिकडंम …. तिकडंम-इकडंम
पायाच्या त्या तिरप्या वाटा

साला एक प्याला , साला एक प्याला …….

मध्येच येतात स्मरणे काही
मध्येच येते डोळ्यात पाणी
स्मृतीभंश ह्या लाघव वेळी
चालू होते बोबड वाणी
मित्राचे मग प्रेम वाढते
घेरे कोरी, नकोरे पाणी
अशी मदीरा भिनत जाते
तिचा मी अन माझी राणी

साला एक प्याला , साला एक प्याला ……

झिंग झिंग अन पिंग पिंग ती
किक अशी ती उरात जाते
लटपट -लटपट अडखळ ते
गोड बालपण भरात येते
एकच प्याला असून तरीही
नशा विषारी भिनत जाते
त्याची मजला,माझी त्याला
सवय अशी मग पडून जाते

साला एक प्याला , साला एक प्याला ……

लेखनविषय:

वाचने 851
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया