अडगळीतल्या आठवणींचा पसारा..
सुरवातीला मी अगदी घारीच्या नजरेनं पुस्तकं राखत असे (कारण मित्रांची बरीच पुस्तकं मी हक्कानं ढापलीत). पण आताशा तेवढा आग्रह राहिला नाही. त्यामुळे पुस्तकांना पाय फुटले आणि आवडीची बरीच पुस्तकं परागंदा झाली. उरलेली पुस्तकं थोडी कपाटात, तर बाकीची घरात इकडे, तिकडे, चोहीकडे पसरलेली असतात. त्यात निवांत बसून पुस्तकं वाचायचं ठिकाण म्हणजे टॉयलेट असा माझा ठाम विश्वास. त्यामुळे तिथेही एखाद्-दुसरे पुस्तक सापडलं की आई आणि हिचा ओरडा खावा लागतो. म्हणून एक शनिवार कपाटं आवरण्यासाठी सार्थकी लावायचा ठरवला.
बरेच दिवस न आवरल्यानं वरच्या कप्प्यातल्या पुस्तकांवर धूळ साचुन राहिलेली. आधी ती झटकायला घेतली.
मिसळपाव