Skip to main content

चूझिंग द इझी ऑप्शन

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/09/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
"हे बघ, तू रोज व्यायाम कर, व्यवस्थित, चांगलं खा; तुला फिट होण्यापासून काहीही अडवू शकत नाही." मी मित्राला म्हटलं. "रोज?????" प्रचंड संकट समोर आल्यागत भाव चेह-यावर आणून त्याने विचारलं. "बरं एक दिवसा आड कर रे, पण कन्सिस्टंटली कर." मी काठिण्य पातळी कमी केली, आणि लगेच त्याच्या चेह-यावर हसू फुललं. इतक्यात बाजूला उभा असलेला एक मित्र वडापाव चा घास घेत म्हणाला, "त्यापेक्षा डाएट कर ना! त्या सचिन ने केलं ना आमच्या सोसायटीतल्या... नो व्यायाम नो नत्थिंग. फक्त गोड बिड नाही खायचं, बाहेरचं नाही खायचं असं थोडंसं पाळायचं आणि ते देतात ती आयुर्वेदिक औषधं घ्यायची.

नवथर

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 18/09/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
धुके सभोवर मन काठावर गूढ प्रभात रुपेरी भास आभासे असलेलेपण भ्रामक दुनिया सारी दंव; लव तृण पानांवर पसरे अगाध नीर पथारी गंध मोकळा मातीचा असमंती घेई भरारी कोण संग तो कुणा व्यापतो अगतिक आभा चकोरी नील आकाशी पाचू रानी नवथर हिव अंबारी ………………. अज्ञात
काव्यरस

बोल बैला बोल : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 18/09/2013 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
बोल बैला बोल : नागपुरी तडका


        बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
        बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!

नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!

        थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी

लेखक पैसा यांनी बुधवार, 18/09/2013 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका गणेशदेवा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे, रावळे. मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत. सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे. अल्प दान, महा पुण्य असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे. ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ********** श्रावणात प्रत्येक वारी त्या त्या वाराची कहाणी आजी वाचायची. त्या कहाणीच्या आधी ही गणेशाची कहाणी नेहमी वाचायची. आजीला तर ही कहाणी पाठच होती.

मोनार्क - १

लेखक किलमाऊस्की यांनी मंगळवार, 17/09/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्‍या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्‍या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला.

हि गणपतीची अहवेलना थांबवायला हवी.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 17/09/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , सर्व प्रथम सर्व थोरा मोठ्यांना माझा नमस्कार. मी नवीन सभासद असून माझे काही विचार मी इथे मांडतो आहे. तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी. गेल्या काही वर्षात गणपती उत्सवाचे स्वरूप काहीसे बदलेले आहे, नदी तलाव प्रदूषित होवू नये म्हणून आपण सर्वजण इको फ्रेंडली (याला मराठी शब्द सुचवा कि कोणीतरी) गणेशोत्सव साजरा करीत आहेत. निसर्ग, पर्यावरण या विषयी जनता जागरूक होत आहे या बद्दल जनतेला धन्यवाद.

गेले ते दिन गेले...!!

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 17/09/2013 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगु मंडळी! काय दिवस होते!! अर्थात आमच्या लहाणपणीचे. लहाणपणीची गोष्ट्च निराळी. सारेच अनुभव नवे! सारं विश्वच नवलाईने भरलेले. सुदैवाने माझा जन्म नव्या टेक्नॉलॉजीला फास्ट ट्रॅक लाभायच्या आधीचा. साधासा रेडीओ बरंचस मनोरंजन अन खुप सारी माहीती घेउन यायचा. बुधवारचं, अन शनिवारच पण बहुतेक, रेडीओवरच नाटक ऐकायला मंडळी आतुर असायची. घरातल्यांच्या शांत वातावरणात कोपर्‍यात कुठेतरी रेडीओची हळुवार गाणी लागायची, अथवा बातम्या सुरु असायच्या. असा ढणाणा आवाज करत फारच थोड्यावेळा रेडीओ लावला जायचा.

कॅलिग्राफी ऑन टीशर्टस्

लेखक एस यांनी मंगळवार, 17/09/2013 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलिग्राफी ऑन टीशर्टस् काही नम्र सूचना: १. खालील वाक्यांचा अर्थ विचारू नये. आम्ही क्लायंटला विचारला नव्हता. २. सर्व वाक्ये त्यांच्या रिस्पेक्टीव फॉन्ट कलरसकट आमच्या क्लायंटची कॉपीराईट्स आहेत. ३. हे टीशर्ट घातलेला इसम दिसल्यास आम्हांला खव अथवा व्यनिमार्फत कळवण्याच्या भानगडीत पडू नये. ४. त्या इसमालाही हटकू नये. ५. कापडावर कुंचलाकारी करण्याची आमची पहिलीच वेळ असल्याने आणि ऐनवेळी जसे (ज्याला) सुचेल तसे बदल केल्याने त्यात सौंदर्यदृष्टी शोधत बसू नये. ६.

२०१४

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 17/09/2013 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
देशाच्या प्राक्तनाचे लिलाव जवळ येताच भावी विधात्यांची स्वप्नांची दुकानं पॉश एरीयातल्या आर्ट गॅलरीतली कोलाज बनून सजतात गूढ, अगम्य, गुंगवणारी पण प्रेक्षणीय आणि चक्क श्रवणीयही तेव्हां.. टाळ्या पिटायला आख्खी धारावी धावते आणि वाट पाहते पुढच्या शो ची पुन्हा पाच वर्षांसाठी - संध्या १७.९.१३
काव्यरस