अन्नाची नासाडी
नमस्कार मिपाकर
हा विषय बरेच दिवस मला छळत आहे पण कसा मांडावा समजत नाहिये.
मी एका मोठ्या आय.टी. कंपनीत काम करतो जिथे साधारण २०-२५ हजार लोक कामाला येतात. कँपसमध्ये २-३ फूड कोर्ट आहेत आणि खायला प्यायला चंगळ आहे. तुमची जेवढा खर्च करायची तयारी असेल तसे अगदी २५ रुपयापासुन ५०० रुपयापर्यंत सर्व काही मिळते. खाउन झाले की लोक आपापल्या प्लेट घेउन खरकटे टाकायच्या खिड्क्यांजवळ नेउन ठेवतात.तिकडचे चित्र न बघवण्यासारखे असते.
बर्याच डिशमध्ये अन्न तसेच वाया गेलेले /राहीलेले दिसते. चव न आवडणे, भूक नसणे, जास्त वाढलेले असणे कारण काहीही असो .शेवटी ते वायाच जाते.
मिसळपाव