Skip to main content

अन्नाची नासाडी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 27/11/2013 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर हा विषय बरेच दिवस मला छळत आहे पण कसा मांडावा समजत नाहिये. मी एका मोठ्या आय.टी. कंपनीत काम करतो जिथे साधारण २०-२५ हजार लोक कामाला येतात. कँपसमध्ये २-३ फूड कोर्ट आहेत आणि खायला प्यायला चंगळ आहे. तुमची जेवढा खर्च करायची तयारी असेल तसे अगदी २५ रुपयापासुन ५०० रुपयापर्यंत सर्व काही मिळते. खाउन झाले की लोक आपापल्या प्लेट घेउन खरकटे टाकायच्या खिड्क्यांजवळ नेउन ठेवतात.तिकडचे चित्र न बघवण्यासारखे असते. बर्‍याच डिशमध्ये अन्न तसेच वाया गेलेले /राहीलेले दिसते. चव न आवडणे, भूक नसणे, जास्त वाढलेले असणे कारण काहीही असो .शेवटी ते वायाच जाते. एका मोठ्या कंटेनरमध्ये सर्व जमा करुन बाहेर नेले जाते. अजुन एक चीड आणणारा प्रकार म्ह्णजे प्रोजेक्टमध्ये कोणाचा वाढ्दिवस असेल तर पूर्ण टिम फूड कोर्टमध्ये जमते,एक दोन जण केक घेउन येतात आणि हॅप्पी बर्थडे टू यु च्या गजरात तो कापुन नंतर त्याच्या चेहर्‍याला फासतात. किंवा फासायला एक आणि खायला वेगळा केक असतो . मी काही या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही.पण अन्नाची नासाडी का? हे सर्व थांबवायला किंवा निदान कमी करायला काय करता येइल ?

वाचने 26718
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

काही खानावळीत किंवा हॉटेलमध्ये 'कृपया अन्न वाया घालवू नये. हवे तेवढेच वाढून घ्यावे' अशा अर्थाच्या पाट्या पाहिल्याचं आठवतं. चर्नी रोडच्या एका पावभाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या (नाव आठवत नाही) हॉटेलात मध्यंतरी 'कृपया कांदा नको असल्यास तसे आधीच सांगावे' असं लिहिलेला कागद चिकटवलेला पाहिला. अर्थात त्यामागचा हेतू महागड्या कांद्याची बचत करणे हा होता.

In reply to by वडापाव

चर्नी रोडच्या एका पावभाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या (नाव आठवत नाही)
सुख-सागर तर नव्हे? बाकी धागाप्रस्तावाशी सहमत!

In reply to by वडापाव

मी एकदा काळबादेवी भागात एका गुजराती खानावळीत जेवावायला गेलो होतो . थाळीमध्ये ८-९ छोट्या वाट्या ठेवल्या होत्या. प्रत्येक वाटीत बुडाशी अगदी थोडासा पदार्थ म्हणजे दाल, कढी, छास, भाजी १, भाजी २, उसळ, लोणचे, चटणी, वगैरे वाढलेले होते . मी कुतुहलाने मालकाला याबद्दल विचारले तर त्याने समजाऊन सांगितले कि मेनू मधल्या सगळ्या पदार्थांची चव घेऊन त्यापैकी तुम्हाला आवडेल तो पदार्थ पाहिजे तेवढा मागून घ्या. तुम्ही पोटभर जेवा आणि अन्नाची नासाडी ही टाळा. सौराष्ट्रातील मोरबी या मोठ्या गावात एका हॉटेलात जरा वेगळी पद्धत पाहिली. जेवणाच्या मेनू मधील सर्व पदार्थ तुमच्या टेबलावर आणून ठेवतात. त्या पैकी तुम्हाला आवडतील तेवढेच पदार्थ तुमच्या ताटात वाढून घ्या किंवा वाढायला सांगा. तुमचे बिल तुम्ही घेतलेल्यां पदार्था वर ठरवले जाइल. या प्रकारातही अन्नाची नासाडी होत नाही .

तसहि आपण सल्ला द्यायला गेलो कि लोक आपल्यालाच वेडयात काढतात त्यामुळे लक्ष न देणे हाच उपाय. किमान आपण जे खायला घेउ निदान ते तरी काहि शील्लक राहणार नाहि हे बघणे. ईकडे सुद्धा हिच परीस्थीती आहे त्यामूळे बघीतल्यावर हळहळण्याशीवाय काहिच करु शकत नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

किमान आपण जे खायला घेउ निदान ते तरी काहि शील्लक राहणार नाहि हे बघणे.

शनीवारच्या लोकसत्ता अंकात ऐक लेख आलता . त्या अर्बन लीव्हज या संस्थेबद्दल माहिती आहे . वाचा . लिंक देता येत नाहीये .

कोट्यवधी लोकांना एकवेळ जेवण सुद्धा पुरेसे मिळत नसताना अशी नासाडी पहावत नाही. आपल्याला जमेल तेवढे आपण करू शकतो. स्वतः अन्न वाया जाऊ न देणे बरोबरच्या लोकांना सांगणे एवढे नक्कीच करता येईल. तोंडाला केक फासणे हा तद्दन मूर्खपणा आहे. आपण केक कधीही जास्त खाऊ शकत नाही. कारण पचायला भयंकर जड जातो. आमच्या ऑफिसमधे वाढदिवसाच्या पार्टीला मी कधीही केक आणून वाटला नाही. त्याऐवजी एखादा मिठाईचा तुकडा, फळ असंच आणत असे. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या वाढदिवसाला केक आणायचा नाही, आणि मित्रांनाही आणू द्यायचा नाही. एकाचं बघून आणखी ४ जण तसं करायला लागतात. अशी नासाडी करू नये हे बहुतेक लोकांना पटत असतं, पण इतर करतात म्हणून ते करतात असंही बरेचदा बघायला मिळतं.

बऱ्याच कंपनीत कॅफेटेरिया मध्ये जे अन्न वाया जातं त्यासाठी एक इंडीकेटर असतो( म्हणजे आज किती किलो अन्न वाया गेलं हे दाखवण्यासाठी ती कचरा कुंडी एका वजन काट्या वर ठेवलेली असते.) आणि आपण जर त्यात भर टाकली कि तो आणखी वाढतो. त्यात भर टाकणार्याला ते दिसत. त्यामुळे हे शक्य आहे कि जर रोज असं होत असेल तर लोकं तो इंडीकेटर बघून अन्न कमी घेतील किंवा वाया घालवणार नाहीत. तुम्ही असं काही करू शकलात तर उत्तमच. :)

मी एका मोठ्या आय.टी. कंपनीत काम करतो जिथे साधारण २०-२५ हजार लोक कामाला येतात. कँपसमध्ये २-३ फूड कोर्ट आहेत आणि खायला प्यायला चंगळ आहे

खरच खुप चिड येते हे अस अन्न वाया जातय बघितल्यावर. अजुन एक कारण म्हणजे वाढपी. काही काही वाढपी एवढ्या जोशात असतात की, किती वाढु आणि किती नको अस होतं त्यांना, त्यामुळे देखील बरीच नासाडी होते अन्नाची.पण स्वतः वाढुन घेतलेले अन्न जात नाही म्हणुन टाकुन देणे याहुन मुर्ख कोणी नाही. अजुन एक मी बघितलय म्हणजे थाळी असेल तर अन्न जास्त वाया जातं. जंकफुड असेल तर खुप कमी प्रमाणात अन्न वाया जातं. या वाढदिवसाच्या फॅडची जास्त चिड येते, स्वस्तातला केक फासण्यासाठी आणि महागातला केक खाण्यासाठी.स्वस्त म्हणुन अन्नाची नासाडी करायची?

In reply to by Dhananjay Borgaonkar

अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराच्या भोजनालयात, नको-नको म्हणेपर्यंत, वाढप्याने बद्कन भात वाढला आणि नाईलाजाने आम्हाला तो टाकावा लागला. कारण आम्हा सगळ्यांच्याच ताटात ढिगभर भात वाढून तो निघून गेला होता. मी बसलो होतो तिथे अगदी समोरच, 'ताटात अन्न टाकू नका' असा, समाज प्रबोधनात्मक, फलक होता. त्याच्या शेजारीच, 'भक्तांना नको असेल तर खोट्या आग्रहाने भरमसाठ अन्न वाढू नका' असा, फक्त वाढप्यांसाठी, एक फलक लावला पाहिजे. फार वाईट वाटलं. कचरा कुंडीत भरपूर खरकटं होतं. अक्कलकोट संस्थानाच्या मंदिरात, स्वामी समर्थांच्या सानिध्यात, त्यांची सेवा करणार्‍या वाढप्यांमध्येच 'अकलेची' इतकी वानवा असेल असे वाटले नव्हते. देणगीची पावती फाडायला (अन्न विनाशुल्क आहे पण देणगी भोजनालयातच स्विकारली जाते) बसलेल्या माणसाजवळ मी तक्रारही केली. तेंव्हा, 'अहो, इथे जास्त करून शेतकरी, श्रमिक वर्ग येतो. त्यांना भात भरपूर लागतो. तुम्हा शहरी भक्तांना कदाचित तेवढा भात खायची सवय नसेल पण बाकी सर्वांना एवढा भात लागतोच. आणि स्वामींच्या चरणी आलेला कुठलाही भक्त उपाशी परत जाऊ नये म्हणून तशी पद्धतच आहे.' असे म्हणाला. काय बोलणार, कपाळाला हात लावला. आपल्याकडे देवाधर्माच्या नांवावर जो दुधातुपाचा नाश होतो तो पाहिला की अंगावर काटा येतो. उपहारगृहांच्या पार्ट्यांमधूनही भरपूर अन्न (कधी कधी) उरतं. भारतात हे अन्न कचर्‍यात न टाकता भिकार्‍यांना, अनाथालयांना, वृद्धाश्रमांना पाठवलं जातं. पण त्यातही, कोणाला अगदी कुठल्याही कारणाने, कांही विषबाधा झाली तर समाजसेवी(?) संघटना उपहारगृहाला कोर्टात खेचतात. ज्या पार्टीसाठी ते अन्न वापरलं होतं त्या पार्टीत कांही विषबाधा झाली नसेल तर कांही कारवाई होत नाही. पण कांही काळ कोर्टकचेर्‍यात जाऊन वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप पदरी येतो. त्यामुळे मी तरी ते अन्न भटक्या प्राण्यांना खाऊ घालणे योग्य समजतो.

"अन्न हे पूर्णब्रह्म" हि संकल्पना मागे पडली आहे हे एक कारण असु शकते.

पूर्णपणे सहमत आपल्या मतांशी

आमच्या कंपनीत सगळे पदार्थ खाऊन ताट परत केल्यास (अगदी कमी अन्न उरल्यास किंवा जराही अन्न फुकट न घालवल्यास) एक एक्लेअर्स देण्यास सुरवात झाली होती. हाफिसातीलच एका हौशी ग्रुपने हे आपणहून सुरू केले होते. हे सुरू केल्यावर आठवडाभर डिश ल्यांडिंग एरीया बराच 'बघणेबल' होता. पुन्हा ये रे माझ्या मागल्या बाकी, फुड कोर्ड हा शब्द + २०-२५हजार एम्लॉई ऐकून कंपनीचा अंदाज केला गेल्या आहे ;)

In reply to by ऋषिकेश

>>फुड कोर्ड हा शब्द + २०-२५हजार एम्लॉई ऐकून कंपनीचा अंदाज केला गेल्या आहे >> पण मी गावाचे नाव वगैरे डिटेल्स कुठे दिलेत?

नुसतेच खाणे नाही! आता तर इतरही बर्याच विषयात नासाडी होतेय, माझ्या कंपनीतील नासाडी बद्दल सविस्तर सांगेन उद्या.

हे लोक इथे काम करण्यासाठी येतात कि party करण्यासाठी थे कळत नाही कधी कधी मला…!! ४० -४५ वय असणारे पण नुकत्याच विशीत आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर केक फासायला धावत जाताना मी पहिलेय…!! वाढदिवस साजरा करण्याला माझा विरोध नाहीये पण आपण office मध्ये आहोत college मध्ये नाही हे भान ठेवले पाहिजे ना ??? या सर्व गोष्टीमुळे अन्नाची नासाडी तर होतेच… पण कॅन्टीन मध्ये पण गलिच्छपणा पसरतो… थोडस अवांतर : केक फासून झाल्यानंतर या लोक्कांना pizza आणि coke च का लागतो. ? बर ते खाण्यालाही माझा विरोध नाहीये पण त्याचे box आणि बाटल्या तरी व्यवस्थित कचराकुंडीत टाका ना… बिचारे सफाई कर्मचारी काहीहि न बोलता निमुटपणे साफ करत बसतात या लोकांनी केलेली घाण…!!

In reply to by बाप्पू

>>वाढदिवस साजरा करण्याला माझा विरोध नाहीये पण आपण office मध्ये आहोत college मध्ये नाही हे भान ठेवले पाहिजे ना ??? म्हंजे कॉलेजातल्या पोरांनी केक फासून सत्यानाश केला चालेल असं म्हणायचं का??

In reply to by बाप्पू

४० -४५ वय असणारे पण नुकत्याच विशीत आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर केक फासायला धावत जाताना मी पहिलेय…!!
ही: ही: ही; 'लाईफ स्टार्ट्स अ‍ॅट फॉर्टी' असे म्हणतात. असो. कदाचित ही माणसे पित्याच्या ममतेने केक फासत असावीत. शिवाय ही पद्धत नविनच आहे. म्हणजे आज जे ४०-४५ चे आहेत ते विशीत असताना अशी पद्धत नव्हती. म्हणजे त्यांना असा 'चान्स' कधी मिळाला नाहीए. आता तरूणाईनेच समर्थन केलेल्या मुक्त समाजात त्यांना ही संधी चालून आली आहे तर (फक्त) त्यांच्यावर नैतिक बंधन घालणे तरूणाईला शोभते का? धीस इज चिटींग. ह्यातील वरील मजेचा भाग हलकेच घ्यावा. पण, ह्या वयोगटाला (४०-४५ आणि त्या वरील वयोगटातील) असे कांही करण्याचा नैतिक अधिकार नाही हे मान्य केले तरी विशीतल्या तरूणांना विशीतल्याच तरूणीच्या चेहर्‍यावर केक फासणे 'नैतिकतेत' बसते का? त्यांनी केली तर ती अन्नाची नासाडी होत नाही का? तसेच, अजुन, आजचे विशीतले तरूण जेंव्हा पंचेचाळीशीत पोहोचतील तेंव्हा ते मागे राहणार आहेत का? तेंव्हा तर अशा तरूणीला मिठीत घेऊन पापे घेणेही सुरू झाले असेल. जेंव्हा एखाद्या पंचेचाळीशीतील प्रौढाचा वाढदिवस साजरा होतो, त्याच्या चेहर्‍यावरही केक फासला जातो (तशी रुढ पद्धतच आहे म्हणा), तेंव्हा विशीतल्या तरूणी नाही धावत पुढे पुढे? की पुढारलेल्या समाजात केक फासणे आणि फासून घेणे हे दोन्ही अधिकार फक्त विशीतल्या तरूणींनाच प्रदान केलेले आहेत. मला वैयक्तिक रित्या हे अन्नाशी खेळणे, अन्नाची फेकाफेक, जाड्या-रड्याच्या चित्रपटात लहानपणी पाहतानाही कधी रुचली नाही. 'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या संस्कारातच वाढलो आहे. त्यामुळे तरूणपणीही नाही आणि आता ह्या वयातही, कोणा तरूणीच्या किंवा तरुणाच्या किंवा समवस्कांच्या अंगालाही केक फासत नाही, कोणाला असे करू देत नाही. लग्नकार्यातही हार घालायच्या वेळी नवरा-नवरीला उचलून घेण्याचे छचोर प्रकारही मला रुचत नाहीत. आपल्या मनाला त्रास होऊ नये म्हणून दूरूनच अक्षता टाकतो. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

मला वैयक्तिक रित्या हे अन्नाशी खेळणे, अन्नाची फेकाफेक, जाड्या-रड्याच्या चित्रपटात लहानपणी पाहतानाही कधी रुचली नाही. 'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या संस्कारातच वाढलो आहे. त्यामुळे तरूणपणीही नाही आणि आता ह्या वयातही, कोणा तरूणीच्या किंवा तरुणाच्या किंवा समवस्कांच्या अंगालाही केक फासत नाही, कोणाला असे करू देत नाही. लग्नकार्यातही हार घालायच्या वेळी नवरा-नवरीला उचलून घेण्याचे छचोर प्रकारही मला रुचत नाहीत. आपल्या मनाला त्रास होऊ नये म्हणून दूरूनच अक्षता टाकतो. असो.
प्रचंड सहमत. उचलाउचलीसारखा मूर्खागमनी प्रकार पाहिला की डोकेच फिरते. इतक्या बिनडोकपणे कसे वागू शकतात याचे आश्चर्य वाटते अन लाजही. मध्ये बातमी आली होती की अशा एका उचलाउचलीच्या वेळेस वधूच्या हातातील माळ वराऐवजी भटजीच्या गळ्यात जाऊन पडली! वर सगळे निर्लज्जपणे खिदळत होते म्हणे. काडीची अक्कल नसली की असे होणारच.

या विषयावर वेगळा धागा निघु शकतो >>त्याचे box आणि बाटल्या तरी व्यवस्थित कचराकुंडीत टाका ना>> सी.सी.डी मधुन घेतलेले कॉफी ग्लास,डॉमिनोज पिझ्झाचे रिकामे बॉक्स,चहाचे रिकामे कागदी कप ,फ्रूटीचे पॅक यांचे नमुने प्रत्येक कट्ट्यावर आणि झाडांमागे बघायला मिळतील्.सगळीकडे कचराकुंड्या आहेत तरी.....सुशिक्षित लोक सुसंस्कृत असतातच असे नाही

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पिझ्झाचे रिकामे बॉक्स तर अगदी त्रासच आहेत. एकतर छोट्या कचराकुंडीत मावत नाही, कोणी मोठ्या कचराकुंडीत टाकला तर ती ब्लॉकच होते. म्हणजे इतर कोणी त्यात कचरा टाकूच शकत नाही.

>>म्हंजे कॉलेजातल्या पोरांनी केक फासून सत्यानाश केला चालेल असं म्हणायचं का?? मला तसे म्हणायचे नाहीए.. पण आपण आता एका कंपनी मध्ये नोकरी करतो,,,विद्यार्थीदशेत नाही आहोत. थोडक्यात "आपण आता मोठे झालो आहोत" हे सुचवायचे होते... :)

In reply to by बाप्पू

"आपण आता मोठे झालो आहोत" आहो बाप्पू, मोठे झालो म्हणून माणसं अन्न पानात टाकायची किंवा त्याचा येनकेन प्रकारे सत्यानाश करायची थांबली असती तर कशाला हवं होतं. मित्राच्या वडलांचंच उदाहरण आहे. कुठेही पंगतीला बसलेत आणि त्यांनी पानात काही टाकलं नाही असा दिवस अजून यायचाय. बरं चिरंजीवही तसेच!! मागं एका लग्नात अगदी काहीच नाही तर बापलेक दोघंही दोन दोन पुर्‍या पानात टाकून उठले होते. बरं या पुर्‍या वाढप्याकडनं त्यांनीच मागून घेतल्या होत्या. अन्नाची नासाडी करायला वयाचं बंधन नसतं.

In reply to by सूड

>>>मित्राच्या वडलांचंच उदाहरण आहे. ह्यासाठी कदाचित >>>वय वाढले तरी लायकी अन अक्कल वाढत नाही याचे लै पुरावे आजकाल मिळू लागलेत हे रेडीमेड उत्तर असावं! ;)

>>>वय वाढले तरी लायकी अन अक्कल वाढत नाही याचे लै पुरावे आजकाल मिळू लागलेत याचाच आणखी एक पुरावा माझ्या कॉमेंट मध्येहि आहे... :)
४० -४५ वय असणारे पण नुकत्याच विशीत आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर केक फासायला धावत जाताना मी पहिलेय…!!

In reply to by बाप्पू

त्या बहुतांश विशित नव्हे तिशित आलेल्या असतात. तसही वयावरून लायकी अथवा अक्कल जोखायचा प्रयत्न करणे शहाणपनाचे नसतेच हेच उत्तरोत्तर सिध्द होत जाईल.... फुकट मिळालेले अन्न फेकून देणारा खरा कृतघ्न, बाकीचे चालायचेच. विकत घेउन उष्टे सोडलेले अन्न कोणाच्या पोटात जाऊ नये असे त्यावर थोडच लिहलेले असते? इट्स अ कोलेट्रल डेमेज...

असाच अनुभव साधारण सगळ्या ठिकाणी येतो. मी ४० रुपये देतो ना एका ताटासाठी, मग मी तेवढे अन्न वाढून घेणार, वाया गेले तरी चालेल ही वृत्ती दिसते बरेचदा. शिवाय मग इतर तुम्ही दिलेली इतर कारणे. पण या सगळ्याची सुरुवात बरेचदा घरापासूनच होते. अन्न वाया घालवू नये हे लहानपणापासूनच जर घरात बघितले असेल, तर हे असे होणार नाही.

मला स्वता:ला अन्न टाकलेले अजिबात आवडत नाही (तमालपत्र वगैरे सोडून). फेज १ मधे रोज काल किती किलो अन्न वाया गेले ते फळ्यावर लिहुन ठेवलेले असायचे. त्याच्याकडे पाहुन रोज राग यायचा. अगदी ३० ते ४० किलो पर्यन्त वगैरे आकडा असायचा. हल्ली आकडे टाकलेले दिसत नाहीत. याची कारणे काय तर, भुक नसताना जास्तीच घेणे नाही तर अन्न बेचव असणे. कोणी उगाच कशाल पैसे वाया घालवायला अन्न घेउन टाकून देईल? माझ्या मते जास्त करून 'अन्न बेचव असणे' यामुळेच हे होते.

In reply to by जातवेद

अन्न बेचव असण्याशी सहमत आहे. बर्‍याचदा त्याचमुळे कुंपिणीचे अन्न सोडून आंध्रा मेसमध्ये जातो हादडायला. आत्मा तृप्त, पोट संतृप्त आणि झोप त्याहून संपृक्त येते =))

जेवल्यावर ताट स्वच्छ नाही प्रोग्रॅमिंगही असेच गलिच्छ करत असणार. अ‍ॅवेलेबल रेसोर्सेस कसेही वापरून टाकत असणार. गारबेज कलेक्टर आहेच यांची घाण काढायला.

श्रीमंतांनी अन्न वाया घालवलं नाही, तर गरीब शेतकऱ्याच्या उत्पादनाचा उठाव कमी होऊन भाव आणखीनच पडणार नाहीत का? मला तसं इकॉनॉमिक्समधलं कळत नाही, पण ट्रिकल डाउन वगैरे शब्द मोठ्या मोठ्या इकॉनॉमिस्ट्सकडून ऐकले आहेत.

In reply to by राजेश घासकडवी

अंशतः सहमत आहे. जसा महागाई कमी करायचा एक (अघोरी) उपाय असतो "नोटा जाळणे" तसा शेतीमालाची मागणी वाढवायचा उपाय अन्न वाया घालवणे असू शकतो. पण भारतात शेतीमालाच्या बाबतीत "वितरण" हा मोठा अडसर आहे. (अमर्त्य सेन दुष्काळाचं कारण हेच देतात). टाकलेले अन्नपदार्थ (गहू, तांदूळ वगैरे) योग्य पद्धतीने वितरण करून कमी उत्पन्न घटकांपर्यंत पोचवता येणार आहेत का? सध्या तशी सिस्टिम अस्तित्वात नाही. -- पुण्यातल्या कंपन्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सँडविक एशिया आणि कमिन्स या दोन कंपन्यांत अन्नाची कमीत कमी नासाडी होताना पाहिली आहे. त्याचं कारण बहुदा "जेवण चवदार असतं" हे असावं.

In reply to by राजेश घासकडवी

राजेश घासकडवी श्रीमंतांनी अन्न वाया घालवलं नाही, तर गरीब शेतकऱ्याच्या उत्पादनाचा उठाव कमी होऊन भाव आणखीनच पडणार तुम्ही एकच बाजू ध्यानात घेताय... "अन्न वाया घालवलं" म्हणतो यातच सगळ आलं दारु सिगारेट मधून खूप टॅक्स मिळतो पण त्याच्या कितीतरी पटीने कोणत्याही देशामधे या लोकांच्या आजारपणावर खर्च होतात.

माझा टीम लीड अगदी मुद्दाम घरपूर अन्न पानात टाकायचा. कारण काय, तर म्हणे त्यावर इतर किटकांचा हक्क आहे व आपण ते केलेच पाहिजे आणि आमच्यात अगदी आवर्जुन असं करतात (तो मल्लु होता). मला तसंही त्याच्या बुद्धीमत्तेची कीव यायची (टीम लीड त्याकरताच असतो ;) ) आणि हे तत्वज्ञान ऐकुन घेरी येणं बाकि होतं फक्त.

राजेश घासकडवी नेहमी गंभीर आणि उपयोगी विषयावर असलं काहीतरी टाकलच पाहिजे का !

In reply to by आशु जोग

नेहमी? तुम्हाला जर एखाद्या विषयावर वेगळादृष्टिकोन आलेला आवडत नाही तर तसं सांगा की सरळ. 'नासाडी कशी वाईट' असं म्हणणाऱ्या लेखावर कोणी 'नासाडीचे अप्रत्यक्ष फायदे असतात' असं म्हटलं तर जरा विचार करून बघा इतकंच. तुमचा जसा गैरसमज झाला तसा सगळ्यांचाच होऊ नये म्हणून माझा विचार थोडा समजावून सांगतो. हे अन्नाची नासाडी करणं वगैरे उच्चवर्गीयांमध्ये चालतं. गरीब लोकं - भारतातली सुमारे ७५% जनता अन्न अतिशय जपून वापरते. मुळात तुम्ही घरून डबा न नेता फूड कोर्टमध्ये खाता तेव्हा पैशांची नासाडी करत असताच. घरून डबा नेण्यापेक्षा फूड कोर्टमध्ये खाणं यासाठी किमान तिप्पट खर्च येतो. वाईटसाईट खाल्लं जातं ते वेगळंच, पण ते आपण सध्या बाजूला ठेवू. सगळ्याच उच्चवर्गीयांनी - म्हणजे ज्यांना दिवसाला दरडोई दोनशे रुपयांपेक्षा खर्च करणं परवडतं, अशांनी फूडकोर्टमध्ये खाण्याऐवजी घरून डबे नेले, तर आख्खा फूडकोर्ट बिझनेस कोसळणार नाही का? मग त्यावर आधारित असणाऱ्या लाखो लोकांचं उत्पन्न बुडणार नाही का? थोडासा वेळ वाचवण्यासाठी श्रीमंत लोक तिप्पट खर्च करायला तयार असतात म्हणून ज्यांचं पोट भरतं, त्यांना पैसे मिळाले नाहीत तर तेही काटकसरीने जगतील. शेवटी तळात असलेल्या शेतकऱ्याचा माल किती उठणार हे या श्रीमंतांनी केलेल्या नासाडीमुळेच ठरत नाही का? श्रीमंतांनी डिमांड कमी केली तर गरीबांनी केलेल्या सप्लायच्या किमती घटून गरीब आणखीन गरीब नाही का होणार? मी त्यासाठी मुद्दामून नासाडी करावी असं म्हणत नाहीये, तर सद्यस्थिती काय ते सांगतो आहे.

In reply to by राजेश घासकडवी

तमाम उच्चवर्गीय अन्नाची नासाडी करतात व तमाम गरीब अन्न जपून वापरतात ह्याला काही आधार? तसेच ७५ % वगैरे आकडे कसे आले? सगळ्याच उच्चवर्गीयांना अन्नाची नासाडी झाल्याची पर्वा नसते हे मला खरे वाटत नाही. अगदी गरीब घरातही लग्न वगैरे कार्याच्या वेळेस अन्न नासाडी झालेली बघायला मिळते. घरून डबा नेण्याऐवजी फूड कोर्टात खाल्ले तर किमान तिप्पट खर्च येतो हे सरधोपट विधान वाटते. मुळात पैशाचा माज वा पैसे उधळायचे म्हणूनच फूड कोर्टात खाल्ले जाते हे गृहितक अजब आहे. स्वैपाक, डबा भरणे इ. करायला वेळ नाही म्हणून कितीतरी वेळा नाईलाजास्तव बाहेरचे खाल्ले जाते. घरचे कुणी आजारी आहे, कुणाची परीक्षा आहे, अन्य काही कार्य आहे असे असल्यावरही लोक डबा न नेता बाहेरच विकत घेतात. समजा फूड कोर्ट अवाच्या सवा पैसे लावत आहे. आणि समजा तमाम लोक शहाणे झाले आणि डबे आणू लागले तर फूड कोर्ट कोसळेलच हे कशावरून? कदाचित दुसरी म्यानेजमेंट येईल जी घरगुती जेवण वाजवी खर्चात बनवू लागेल, कदाचित वेगळ्या प्रकारचे जेवण मिळू लागेल, कदाचित महागडे पण आरोग्याला चांगले असे जेवण बनवायचा कुणी प्रयत्न करु पाहेल. फूड कोर्ट प्रकरण कोसळेल आणि त्यावर अवलंबून असणारे सर्व देशोधडीला लागतील असे म्हणणे जरा अतिरेकी वाटते. मुळात अन्नाची नासाडी म्हणजे ऊर्जेची नासाडी आहे. त्यातली सूर्याची ऊर्जा फुकट म्हणून कदाचित दुर्लक्षित ठेवली तरी बाकी अनेक गोष्टी आहेत. उदाहरण म्हणून चपाती पाहिली तर गहू कापणे, मळणी करुन गहू वेगळे करणे, ते उपभोक्त्यापर्यंत नेणे, गव्हाचे पीठ करणे, त्याकरता होणारी वाहतूक, पीठ चाळणे, पीठ मळणे, लाटणे, भाजणे, बाकी लागणारी सामग्री, तेल, पाणी, गॅस वगैरे त्याची निर्मिती वाहतूक इ., मग चपाती काही काळ ठेवणे, टिकवणे, त्याकरता लागणारे डबे, फ्रिज जे काही असेल ते, खाणार्‍यापर्यंत पोचवणे ह्या सगळ्या गोष्टीला ऊर्जा खर्च होते. हे सगळे होऊन ते पुन्हा मातीत मिळणार असेल तर ती ऊर्जा वायाच गेली. कारण गहूच मातीत टाकून देणे कितीतरी स्वस्तात पडले असते. आता चमचमीत भाज्या, पनीर, चीजसारखे महागडे पदार्थ याकरता अधिकच खर्च होतो. हे पदार्थ बनवून ते वाया घालवणे म्हणजे नळाचे पाणी तासनतास उघडे ठेवून गटारात सोडून देण्यासारखेच घातक आहे.

In reply to by हुप्प्या

तमाम उच्चवर्गीय अन्नाची नासाडी करतात व तमाम गरीब अन्न जपून वापरतात ह्याला काही आधार?
मी लिहिलेलं आहे की अन्नाची नासाडी उच्चवर्गीयांत चालते. प्रत्येक उच्चवर्गीय नासाडी करतो असं म्हटलेलं नाहीच. गरीब लोकांना नासाडी करण्याइतके पैसेच नसतात.
सेच ७५ % वगैरे आकडे कसे आले?
जरा प्रतिसाद नीट वाचा हो. सर्वासाधारणपणे दरडोई दरदिवशी २०० रुपये खर्च करू शकणारे लोक असंही म्हटलेलं असेल. ते वरचे २५% असावेत असा अंदाज आहे. तो आकडा ७५% आहे की ८०% आहे की ८१.३४% आहे याने माझ्या युक्तिवादात काहीही फरक पडत नाही. बहुतांश लोकांना अन्नाची नासाडी करणं परवडतच नाही. हे परवडतं ते वरच्या २५ पर्सेंटाइलमधले असतात एवढंच.
मुळात पैशाचा माज वा पैसे उधळायचे म्हणूनच फूड कोर्टात खाल्ले जाते हे गृहितक अजब आहे.
अहो तुम्ही माझा प्रतिसाद न वाचताच लिहीत आहात का? माज आणि उधळणे हे शब्द मी कुठे वापरले आहेत? आणि गृहितक? जे घडतंय ते शक्य तितक्या योग्य शब्दात लिहिलं तर त्यावर या असल्या प्रकारचा हेत्वारोप का?
स्वैपाक, डबा भरणे इ. करायला वेळ नाही म्हणून कितीतरी वेळा नाईलाजास्तव बाहेरचे खाल्ले जाते. घरचे कुणी आजारी आहे, कुणाची परीक्षा आहे, अन्य काही कार्य आहे असे असल्यावरही लोक डबा न नेता बाहेरच विकत घेतात.
गरीबांकडे असे काही प्रश्न नसतातच का? पण त्यांना ते कष्ट सहन करून वर डबा तयार करणं अनिवार्य ठरतं. श्रीमंतांना ते एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागत नाहीत. तेव्हा नाइलाज हा शब्द प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो.
समजा तमाम लोक शहाणे झाले आणि डबे आणू लागले तर फूड कोर्ट कोसळेलच हे कशावरून? कदाचित दुसरी म्यानेजमेंट येईल जी घरगुती जेवण वाजवी खर्चात बनवू लागेल,
यालाच नासाडी कमी होणं म्हणतात.
मुळात अन्नाची नासाडी म्हणजे ऊर्जेची नासाडी आहे.
हा मुद्दा बरोबर आहे. पुढे तुम्ही नुसतीच ऊर्जा नाही तर संसाधनं किंवा रिसोर्सेस या अर्थाने म्हणता तेही बरोबर आहे. माझाही तोच मुद्दा आहे. सर्वच श्रीमंतांनी या रिसोर्सेसची मागणी कमी केली (मुख्यत्वे नासाडी कमी करून, गरीबांसारखंच राहून) तर ते रिसोर्सेस पुरवणारे (बहुतेक गरीब) आपली नोकरी गमावून बसतील असा माझा मुद्दा आहे. पुन्हा 'नासाडी असावी' असा माझा मुद्दा नाही. तर 'सद्यपरिस्थितीत होणाऱ्या नासाडीवर अनेक लोकांची पोटं अवलंबून आहेत' असा मुद्दा आहेे. तेव्हा नासाडीवर प्रच्छन्न टीका करण्याआधी त्याचाही विचार करावा. हळूहळू नासाडी कमी करत जावं, आणि ही नासाडी कमी करण्यासाठी लोकांना कामाला लावावं हे सगळ्यात उत्तम.

In reply to by राजेश घासकडवी

>>>मुळात तुम्ही घरून डबा न नेता फूड कोर्टमध्ये खाता तेव्हा पैशांची नासाडी करत असताच.>>> बाहेरगावातुन नोकरीसाठी इकडे आलेल्या बॅचलर मुलामुलींचे काय?ते तर झोपण्यापुरतेच घरी जातात. बाकी सकाळ/संध्याकाळचा नाश्ता,दुपारचे आणि रात्रीचे जेवण यासाठी कंपनीच्या फूड कोर्ट्वरच अवलंबुन असतात.बाकी इतर मिपाकरांनी लिहीलेली कारणे आहेतच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

बाहेरगावातुन नोकरीसाठी इकडे आलेल्या बॅचलर मुलामुलींचे काय?
घरगुती डबा देणारे खुप जणं असतात. ते ऑफिसातही डबे पोहोचवतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

घरगुती डबा देणारे खुप जणं असतात. ते ऑफिसातही डबे पोहोचवतात.
बरोबर आहे पेठकर काका. अनेक लोक डबा घेऊन जातात. पण तरीही ती दोन फूडकोर्टं चालण्यासाठी त्यात दररोज हजारो लोक येऊन जातात की नाही? आता तुम्ही याच रेस्टॉरंट बिझनेसमध्ये आहात. तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येणारे लोक उद्यापासून दररोज डबा घेऊन आले तर तुमचा धंदा बुडेल की नाही? नुसती तुम्हालाच नाही, तर तुम्हाला कच्चा माल पुरवणारे, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात झळ पोचेलच की. मी तर उलट तुमच्या धंद्यासाठी चांगली गोष्ट म्हणतो आहे. ज्यांना परवडेल त्यांनी खरं तर रेस्टॉरंटमध्ये खाऊन काही अतिरिक्त पैसे खर्च करावेत. काही प्रमाणात नासाडी होण्यातच भलं आहे अशी सध्याची व्यवस्था आहे. ती बदलून जवळपास शून्य नासाडी पण तरीही कोणाच्या पोटावर पाय नाही या व्यवस्थेपर्यंत जाणं भल्याचं. पण ते कसं जाता येईल याची कोणाला कल्पना नाही.

In reply to by राजेश घासकडवी

काही प्रमाणात नासाडी होण्यातच भलं आहे अशी सध्याची व्यवस्था आहे. ती बदलून जवळपास शून्य नासाडी पण तरीही कोणाच्या पोटावर पाय नाही या व्यवस्थेपर्यंत जाणं भल्याचं. पण ते कसं जाता येईल याची कोणाला कल्पना नाही.
संस्कार. जे ह्या लेखाद्वारेसुद्धा होत आहेत. पुढच्या पिढीवर तसे संस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच बरोबर अशा चर्चांमधून, कांही अनुभवांमधून समवस्यकांवरही अन्ननाश टाळण्याचे संस्कार करता येतील. आमच्या उपहारगृहात कोणी अन्न टाकले असेल तर (तसे माझ्या लक्षात आल्यावर) मी त्या गिर्‍हाईकास व्यक्तीशः विचारतो की, 'अन्न का टाकून दिलं आहे?' 'आवडलं नाही का?' 'चवीबाबत कांही समस्या आहे का?' इ.इ.इ. शिवाय उरलेले अन्न पॅक करून घरी नेण्यासाठीही प्रवृत्त करतो. पार्टीच्या वेळी लोकं आमच्या इथे ज्या ऑर्डर्स बुक करतात त्यांनाही पार्टीला किती माणसे येणार आहेत? माझ्या पदार्थांव्यतिरिक्त आणखिन काय पदार्थ आहेत? वगैरे विचारून त्यानी ऑर्डर केलेले पदार्थ जास्त असतील तर ते कमी करून हे कमी करून दिलेले पदार्थ कसे पुरतील हे त्यांना समजावून सांगतो. त्यांचे पैसे आणि अन्नाची संभाव्य नासाडी टळते. माझा नफा कमी होतो पण गिर्‍हाईक टिकून राहते. उपहारगृह बंद पडली तर त्या व्यवसायाशी निगडीत मालक/कामगार उपाशी मरतील ही भिती अनाठायी आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सप्लाय-डिमांड नात्यात 'Supply creates its own Demand' असाही एक निष्कर्ष आहे. एखादा व्यवसाय बंद पडला तर त्या व्यवसायाशी निगडीत माणसे दुसरा एखादा व्यवसाय शोधून काढतात आणि तिथे ही माणसे सामावली जातात. गरज आणि उपलब्धता दोन्ही एकमेकांना साहाय्यक आणि पुरक ठरून समतोल साधला जातो. तेंव्हा भिती नसावी. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी संस्कार आणि समाज प्रबोधनाशिवाय तरणोपाय नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाकीचं ठीक, पण
'Supply creates its own Demand'
हे बरोबर नाही हो. नाहीतर प्रचंड सप्लाय आहे, पण डिमांडच नाही अशी रेसेशनची परिस्थिती कधी आलीच नसती. सत्तरीच्या दशकात दिसून आलेलं स्टॅग्फ्लेशन दिसलं नसतं. लोकांनी डिमांड कमी केली की धंदे बुडतात, त्या धंद्यांत काम करणाऱ्या लोकांची नोकरी जाते. कदाचित त्यांना इतर ठिकाणी मिळेलही नोकरी, पण या बदलासाठी अनन्वित कष्ट होतात. १९२९ सालची मंदी कित्येक वर्षं टिकली. एवढ्या मागे कशाला जा, २००८ सालचा गोंधळ अजून पूर्णपणे निस्तरलेला नाही. तेव्हा घरांचा सप्लाय केवढा तरी वाढलेला होता. पण डिमांड धाप्पकन खाली आलीच की. आणि मग लाखो लोकांची घरं गेली. अन्न हे पूर्णब्रह्म, देव वगैरे नसून एक अत्यावश्यक का असेना पण प्रॉडक्ट आहे हे लक्षात घेतलं की नासाडीकडे एक्सेस डिमांड किंवा रिसोर्स युटिलायझेशन इनएफिशियन्सी वगैरे स्वरूपात बघता येतं. मग नासाडी कमी करण्याच्या फायद्यातोट्यांचा विचार करता येतो. असो, आत्ता जे प्रतिसादांचं स्वरूप दिसतं आहे त्यात कोणाला असा विचार करण्याची इच्छा दिसत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

'Supply creates its own Demand' कोकाकोला, पेप्सी इत्यादी शितपेयांच्या बाबतीत काय? कोणाला या पेयांची काही गरज नसताना उगाचच विकली जातात ना.

In reply to by राजेश घासकडवी

अन्नाची नासाडी टाळणे -> रेस्टराँ बिझनेसमधे डिमांड कमि होणे-> त्या बिझनेससंबंधी लोकांच्या पोटावर पाय पडणे हे गृहीतक चुकीचं आहे अन्नाची नासाडी टाळ्णे-> पुष्कळसं रॉ मटेरीअल मार्केटमधे उपलब्ध होणे-> त्यातुन निम्न आर्थीक परिस्थितीवाल्या लोकांसाठी माफक दरात अनेकानेक छोटेखानी खानावळी सुरु होणे-> रेस्ट्राँ व्यवसायाची वृद्धी होणे. असा मस्त कारभार होईल. आज एका फूडचेनवाल्याच्या खिशात जाणारा पैसा अनेक खानावळीमालकांकडे डायवर्ट होईल. तस्मात चिंता नसावी.

In reply to by अर्धवटराव

छे हो, अन्नाची नासाडी टाळ्णे-> पुष्कळसं रॉ मटेरीअल मार्केटमधे उपलब्ध होणे-> शेतकऱ्याला कमी भाव मिळणे-> कर्ज फेडणं अधिक कठीण होणे -> शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणे असं साधं समीकरण आहे. तुम्हाला मध्यम खाणावळवाल्यांची का चिंता आहे कळलं नाही.

In reply to by राजेश घासकडवी

तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मार्केट्मधे रॉ मटेरीअल वाजवी किमतीत अव्हेलेबल आहे, सामान्यांना गरज आहे, उपासमारी घटवायची चांगली संधी आहे... पण सुज्ञ लोक या संधीचा फायदा घेण्याऐवजी सगळं साहित्य गटारात फेकुन देतील व शेतकरी आत्महत्येला मोकळे होतील. पण मग श्राद्धाचं जेवण बनवणार्‍यांचा बिझनेस जोमात चालेल ना... तो कसा रोखायचा? ह्म्म्म.. सगळं अन्न कावळ्यांना खाऊ घालायचं... उरलेलं नदीत फेकुन द्यायचं... पण मग स्मशान चालवणारे आणि कोळ्यांचा धंदा तेजीत येईल... छ्या... कसंही करुन फायदा काहि टळत नाहि बॉ :(

In reply to by प्रभाकर पेठकर

>>शिवाय उरलेले अन्न पॅक करून घरी नेण्यासाठीही प्रवृत्त करतो. >> मी सुद्धा कधीही हॉटेलमध्ये गेलो आणि अन्न उरले (जसे रोटी भाजी खाल्ल्यावर उरलेली भाजी) तर पॅक करुन घरी घेउन जातो. आणि बाहेरच्या देशातसुद्धा could you please box it for me? विचारतो किंबहुना तेच विचारतात पदार्थ उरलेला बघुन

मी पूर्वी काम करत असलेल्या एका एम एन सी (नॉन आय टी ) मध्ये उरलेले अन्न हे अनाथालयाला पोचते व्हायचे व सध्या च्या सरकारी हाफिसात उरलेले व टाकलेले अन्न हे बायोगास प्लांट मध्ये वापरले जाते . आय टी लोकांची वृत्ती बदलणार नाही तुम्ही तुमच्या हापिसात बायोग्यास ची कल्पना मांडा बघू कदाचित "ओउट ऑफ बॉक्स थिंकिंग" चे बक्षीस पण मिळेल :D शंका : पिझ्झा बायोग्यास निर्मितीला तरी मदत करतो का ?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

शंका : पिझ्झा बायोग्यास निर्मितीला तरी मदत करतो का ?
पिझ्झ्यामुळे शरीराच्या पश्चिम आघाडीवर ढामढूम होते. त्यामुळे बायोग्यास-निर्मिती होते असं म्हणायला हरकत नाही.

तोंडाला केक फासण्याची गलिच्छा फ्याशन कोणी आणली हे कळाले तर त्या महाभागाला एक पार्श्वभागावर लत्तप्रहार बक्षीस देईन म्हणतो

२०-२५ हजार आय टी कामगार असलेल्या आणि आपली मुल्ये जपणार्या कंपनीच्या फुड कोर्ट चा माझाही अनुभव असाच काही आहे.येथे ताटात अन्न टाकण्याचे प्रमाण खुप आहे. या विषयावर कंपनीच्या फोरम वर नेहमी खुप चर्चा झडतात आणि प्रत्येकाचा रोख हा अन्नाची नासाडी रोखली जावी असाच असतो. फोरम वर आपले विचार मांडताना तर प्रत्येकजण तसे भासवत असतो पण फुड कोर्ट मधील द्रुष्य एकदम वेगळे. डिश लॅंडींग एरिया मध्ये १० मिनीटे थांबुन टाकल्या जाणार्या अन्नाकडे बघितले तर डोके सुन्न होइल असे. वाढदिवसाच्या पार्ट्या तर अगदी आली लहर केला लहर या स्वरुपाच्या असतात.सरळ सरळ केकची रंगपंचमीच जणु.आगोदर ज्याचा वाढदिवस त्याला/तिला मग मोर्चा बाकी लोकांकडे, त्यासाठी मग केक लावण्यासठी पळापळ, नाहीतर मग फेकाफेकी.यानंतर तोंडाला लावलेला केक धुवुन बेसिन एरिया घाण आणि बेसिन ब्लॉक करणे आले. काही दिवसांपुर्वी एक स्त्री एम्प्लोयी ओरडत पुढे पळतेय आणि मागे तोंडावर केक फासलेला हातात केक चा मोठ्ठा तुकडा घेऊन तिचा परुष सहकारी तिच्या मागे मागे पळतोय असे द्रुष्य बघितले. आसिफ.

काय..थोड सांगुन बघायच. थोड आपण आपला नियम पाळायचा अस करुन बघा. बाकी मलाही अन्न टाकणारे लोक अजिबात आवडत नाही. मी माझ्या मुलांना सांगते, भाताच एक कण शिजायला जरी अर्धातास लागला तरी त्याला शेतात चार महिने लागतात तयार व्हायला. सो एकही शित टाकायच नाही. कधी ऐकतात कधी नाही. यु आर ऑलवेज लाइक धिस पण म्हणतात. :(

In reply to by स्पंदना

भाताच एक कण शिजायला जरी अर्धातास लागला तरी त्याला शेतात चार महिने लागतात तयार व्हायला
झकास , आवडलं, पटलं.

भावाने सांगितलं की पुण्यात म्हणे एक रेस्टॉरंट आहे जिथे त्याने जेवण पूर्ण संपवल्यावर मालकाने १०% डिस्काऊंट दिला, अन्न वाया न घालवल्याबद्दल. (भावाने आनंदाने २०% टीप दिली!) रेस्टॉरंटचं नाव विसरलो, पण तिथे म्हणे ही कायमची प्रथा आहे.