Skip to main content

हात

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 01/12/2013 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
भीक मागती हात आहे घाम गाळती हात आहे चोर-भामटे हात आहे प्रेमाचा ही हात आहे. सत्य केवळ एक आहे चहुकडे हात आहे. हाताविना न उजळे शेती, धंदा आणि सत्ता हाताची निगा राखा हाताची कृपा भोगा.

सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी

लेखक वैभवकुमारन यांनी रविवार, 01/12/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
धडधडत नाही पहिल्यासारखी हृदयाची नाडी निष्करश्यांची मज आता पडत नाहित कोडी झोपाण्यावर जगण्याच्या नाहीत काळ्या धाडी स्वन्पेही माझ्याशी आता करत नाहीत खोडी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी वाटच साला चुकली ती, पण नाही मनी अढी त्या निखाऱ्याच्या झोतात मी टाकली होती उडी भाजले तंव कळले मजला ते वेळच होती वेडी वाटच साला चुकली म्हणून सोडून दिली होडी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी पीकत नाहीत पहिल्यासारख्या काळजात फोडी डोळयाचीही कड सये होत नाही ओली आता दुनिया कशी रंगारंग , नभी सप्तरंगी होळी स्वतःवर प्रेम स्वतःशी , नाही रीकामी झोळी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्या

आमचे अग्निहोत्र !!!

लेखक विदेशी वचाळ यांनी शनिवार, 30/11/2013 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल गॅस लाच लाइटर असतो ते बरे आहे बुआ. काही दिवसांपूर्वी गॅस चा लाइटर सापडला नाही म्हणून शेजारणीने "सुमे जा ग जरा माझा लाइटर घेऊन ये पर्स मधून" असे फर्मावल्याचे आठवते. त्या पुर्वी, शेजारच्या, निर्मला ताई, त्या एकदा म्हणाल्या होत्या, अरे जरे जरा बाबांचा लाइटर घेऊन म्हणून. त्याचा आधीच्या सगूणा बाई "शिंदळीची काडेपेटी कुठे गेली काही कळत नाय!. ए पोर्‍या बापाची काडेपेटी आणा रे" असे म्हणाल्याचे ऐकिवात आहे. पण त्याचा पूर्वीच्या बायका आग कशी लावत असत बरे? म्हणजे स्वयंपाक करताना हो! (बाकी आग लावायाच्या पद्धती बदलल्या नसाव्यात असे वाटते.

सत्तेवर कोण यायला हवे

लेखक सचीन यांनी शनिवार, 30/11/2013 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले. कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले.

वसा संस्कृतीचा

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी शनिवार, 30/11/2013 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
वसा संस्कृतीचा ऋण सावकारीच फेडण्या कुणब्याला दुष्काळाचा शाप रात्रंदिन कष्ट करायचा नाही थांबला कधी बाप उठून पहाटे रोज माय सारवते दुःखाच्या भिंती सोसत चटके दारिद्र्याचे दिस रोज मावळती राणी डुलणाऱ्या पिकामंधी दिसू लागे साखर गोड जल्म गेला मातीत अवघा तळहाताला आले किती फोड गाई गुरांच्या हंबरात वाढे संसार शेणामातीचा सुख नांदावे घरीदारी वसा जपतो संस्कृतीचा थकलेला चार घास खाऊन जाई तृप्त होऊन वाटसरू जिच्यावर जगतो आम्ही त्या काळ्या आईला कसं विसरू संतोष बोंगाळे

पॅरलल पार्किंग

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 30/11/2013 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी चालवणा-या समस्त लोकांपैकी फार कमी लोकांना पॅरलल पार्किंग व्यवस्थित जमतं. माझ्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर पार्किंग नावाचं काही असतं हेच माहित नाही; ते येतात आणि जिथे भिंत समोर येईल तिथे गाडी थांबवून उतरून घरी जातात. असो. पॅरलल पार्किंग हे खूप महत्वाचं स्किल आहे स्किल, माझ्या मते. आणि ते यायला हवं. ते वाटतं तितकं कठीण नव्हे. जराशी भूमिती, जरासं गणित, आणि जरासा अंदाज आला, की झालं. मी, मला कळलेलं पॅरलल पार्किंग इथे तुम्हाला सांगावं म्हणतो..

पगडी

लेखक मनीषा यांनी शनिवार, 30/11/2013 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
गाव तिथे चावडी चावडी तिथे वावडी | गोर्‍या गोर्‍या हातात सखु भरते बांगडी | लगबगीने चालताना सांडली तीची बुगडी | पायवाटेच्या धुळीने माखली हिरवी साडी | डोईवरती पदर घेता डोळ्यात टोचली काडी | उन्हाची काहीली काळजास घरं पाडी | ओरडून ओरडून कोणी देतो पहा दवंडी | गुलाल, बुक्का उधळीत दंडवत घाली बेगडी | आंधळ्याच्या हातात होती एक तागडी | पण नवलच घडले पडली दाजीबाची माडी | सांगोवांगीचीच कहाणी ऐकते सारी वाडी | गाव बोले चांगभलं नवस देवाचा फेडी | कशी , कुठे, कधी, कुणी जोडली कडीला कडी | रंगला कलगी-तुरा मिरवते पुणेरी पगडी |

शीळा घास

लेखक वैभवकुमारन यांनी शनिवार, 30/11/2013 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
शीळा घास भीक मागत दारापुढे भिकारीण आली फाटके पोलके अन जिरलेली चोळी सुकलेल्या ओठी अश्या भाकारीच्या ओळी ठीगळांची नटलेली भुकेलेली झोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली -------1 कपाळ नीस्तेज पोटी हातभर खोली 'आशा' बाळ्गुनी पायी अंगठा ती घोळी उन्हाचे चटके त्यात डोळी कड ओली शिळ्या घासासाठी दारी उभी अशी भोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली----2 माय -माय करतच अनवाणी आली भान साऱ हरपुनी भुकेसाठी आली आली आली अशी एक भिकारीण आली शीळा घास पडे झोळी दुसऱ्या दारी गेली भीक मागत दारापुढे भिकारीण आली वैभव कुलकर्णी

'हरवलेलं गाव'

लेखक वैभवकुमारन यांनी शनिवार, 30/11/2013 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
'हरवलेलं गाव' माझ्या घरातल्या अंगणाला नाही शेणसडा गेली तुळस झीजुन तया नाही पाणी घडा नाही शाळा ती पडकी कुठे दिसत नाही फळा आता नाही वनभोजन म्हणून रुसलाय मळा गेला पार तो खचून घेतोय निर्जानांच्या झळा कमी झाली वटपूजा नाही दोऱ्याचा तो लळा गेली पाखर उडून पडलाय ओसाड हा वाडा फोडे बुरुज हंबरडा डोळी चार चार धारा गेल 'जात' अडगळीत गेला खुंट्याला तो तडा आता दाण्यालाही लागलाय बघा गीरनीचा ओढा नाही पडे शब्द कानी "आज वासुदेव आला" नाही दारावर आता बघा "गारेगारवाला" वैभव कुलकर्णी

शिक्षकांची आठवण!!

लेखक वडापाव यांनी शनिवार, 30/11/2013 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच शाळेचा ब्लॉग वाचला... आणि एकदम शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. मित्र-मैत्रीण आठवले, मैदान आठवलं, आपण केलेली मस्तीही आठवली. पण प्रकर्षाने आठवण आली, ती शिक्षकांची... आपल्या आवडत्या, चांगल्या शिक्षकांची आणि काही विनोदी शिक्षकांची सुद्धा. आम्हाला पहिली ते चौथी पराडकर बाई वर्गशिक्षिका होत्या. आमच्या वर्गाला चित्रकला सोडून बाकी सगळे विषय त्याच शिकवायच्या. सगळ्यात कमी गृहपाठ देणा-या आणि सगळ्यात कमी मारणा-या या आमच्या लाडक्या बाई होत्या. चित्रकलेला इंदुलकर बाई होत्या. ब वर्गाला मोर्जे बाई होत्या. त्यांच्या हातात कायम पट्टी असायची.