Skip to main content

'हरवलेलं गाव'

लेखक वैभवकुमारन यांनी शनिवार, 30/11/2013 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
'हरवलेलं गाव' माझ्या घरातल्या अंगणाला नाही शेणसडा गेली तुळस झीजुन तया नाही पाणी घडा नाही शाळा ती पडकी कुठे दिसत नाही फळा आता नाही वनभोजन म्हणून रुसलाय मळा गेला पार तो खचून घेतोय निर्जानांच्या झळा कमी झाली वटपूजा नाही दोऱ्याचा तो लळा गेली पाखर उडून पडलाय ओसाड हा वाडा फोडे बुरुज हंबरडा डोळी चार चार धारा गेल 'जात' अडगळीत गेला खुंट्याला तो तडा आता दाण्यालाही लागलाय बघा गीरनीचा ओढा नाही पडे शब्द कानी "आज वासुदेव आला" नाही दारावर आता बघा "गारेगारवाला" वैभव कुलकर्णी
लेखनविषय:

वाचने 1968
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्तच कविता आहे. लहानपणी भर दुपारी येणार्या "गारेगार" वाल्याची आठवण झ़ाली आम्ही सगळे तो आला की आईकडे पैसे मागायचो आणि मग ते गारेगार खाल्यावर आरशात रंगलेली जीभ पहायचो.

गेली पाखर उडून पडलाय ओसाड हा वाडा फोडे बुरुज हंबरडा डोळी चार चार धारा हे मस्तच