मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पगडी

मनीषा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गाव तिथे चावडी चावडी तिथे वावडी | गोर्‍या गोर्‍या हातात सखु भरते बांगडी | लगबगीने चालताना सांडली तीची बुगडी | पायवाटेच्या धुळीने माखली हिरवी साडी | डोईवरती पदर घेता डोळ्यात टोचली काडी | उन्हाची काहीली काळजास घरं पाडी | ओरडून ओरडून कोणी देतो पहा दवंडी | गुलाल, बुक्का उधळीत दंडवत घाली बेगडी | आंधळ्याच्या हातात होती एक तागडी | पण नवलच घडले पडली दाजीबाची माडी | सांगोवांगीचीच कहाणी ऐकते सारी वाडी | गाव बोले चांगभलं नवस देवाचा फेडी | कशी , कुठे, कधी, कुणी जोडली कडीला कडी | रंगला कलगी-तुरा मिरवते पुणेरी पगडी |

वाचने 2409 वाचनखूण प्रतिक्रिया 10

In reply to by अभ्या..

पैसा Sun, 12/01/2013 - 00:22
नव्कविता आपल्याला कळत नैत! मी ही कविता अशी वाचली ------- गाव तिथे चावडी चावडी तिथे वावडी | गोर्‍या गोर्‍या हातात सखु भरते बांगडी | लगबगीने चालताना सांडली तीची बुगडी | ------- पायवाटेच्या धुळीने माखली हिरवी साडी | डोईवरती पदर घेता डोळ्यात टोचली काडी | उन्हाची काहीली काळजास घरं पाडी | -------- ओरडून ओरडून कोणी देतो पहा दवंडी | गुलाल, बुक्का उधळीत दंडवत घाली बेगडी | आंधळ्याच्या हातात होती एक तागडी | ---------- पण नवलच घडले पडली दाजीबाची माडी | सांगोवांगीचीच कहाणी ऐकते सारी वाडी | गाव बोले चांगभलं नवस देवाचा फेडी | ------------- कशी , कुठे, कधी, कुणी जोडली कडीला कडी | रंगला कलगी-तुरा मिरवते पुणेरी पगडी | ------- आता बघ काय कथा आहे ती? नाहीतर ------- लगबगीने चालताना सांडली तीची बुगडी | डोईवरती पदर घेता डोळ्यात टोचली काडी | उन्हाची काहीली काळजास घरं पाडी | ओरडून ओरडून कोणी देतो पहा दवंडी | आंधळ्याच्या हातात होती एक तागडी | सांगोवांगीचीच कहाणी ऐकते सारी वाडी | रंगला कलगी-तुरा मिरवते पुणेरी पगडी | ------ एवढ्या ओळीतही पुरा अर्थ लागतो का बघ!