शीळा घास
लेखनविषय:
शीळा घास
भीक मागत दारापुढे भिकारीण आली
फाटके पोलके अन जिरलेली चोळी
सुकलेल्या ओठी अश्या भाकारीच्या ओळी
ठीगळांची नटलेली भुकेलेली झोळी
भीक मागत दारापुढे भिकारीण आली -------1
कपाळ नीस्तेज पोटी हातभर खोली
'आशा' बाळ्गुनी पायी अंगठा ती घोळी
उन्हाचे चटके त्यात डोळी कड ओली
शिळ्या घासासाठी दारी उभी अशी भोळी
भीक मागत दारापुढे भिकारीण आली----2
माय -माय करतच अनवाणी आली
भान साऱ हरपुनी भुकेसाठी आली
आली आली अशी एक भिकारीण आली
शीळा घास पडे झोळी दुसऱ्या दारी गेली
भीक मागत दारापुढे भिकारीण आली
वैभव कुलकर्णी
वाचने
1235
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
ठीक!
इथे फार कमी