Skip to main content

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात- भाग ३ विजेची निर्मिती

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 25/12/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
Power Stations मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान मागील भागावरून पुढे चालू ... काही विशिष्ट रसायनांमध्ये दोन भिन्न धातूंचे कांब (रॉड किंवा इलेक्ट्रोड्स) बुडवून ठेवले आणि त्या कांबांना तांब्याच्या तारेने जोडले तर त्याम

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 25/12/2013 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ|| गेलो तुळशी मंजीरा घ्याया तेथे न तू गावला राया ||१|| गेलो राऊळी शोधाया शोध व्यर्थ गेला वाया ||२|| चंद्रभागेकाठी तू न सापडेना तुझ्याविण मन शांत होईना ||३|| शोध घेतला शोध घेतला अंती नाही तू भेटला ||४|| पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५|| - पाभे
काव्यरस

मुलुंड कट्टा… केल्याने पंडितमैत्री !!!

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी बुधवार, 25/12/2013 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा.

योग – प्रतिबंधात्मक उपाय

लेखक विअर्ड विक्स यांनी बुधवार, 25/12/2013 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
योग – प्रतिबंधात्मक उपाय शाळेत असताना विज्ञानात शिकलो होतो कि उत्क्रांतीतून मर्कटाचा मानव झाला.मनुष्य प्राणी हा जरी जात्याच बुद्धिमान असला तरी त्यास पडलेले एक कोडे उलगडत नव्हते, ते म्हणजे या जीवनाचे ध्येय काय ? महामुनी पतंजलींनी हे कोडे उलगडले - नश्वर जीवनास योगरूपी संजीवनी देऊन ! योग हा शब्द संस्कृत धातू 'युज' पासून बनलेला आहे.युज म्हणजे संयोग पावणे वा एकत्र जुळून येणे. आत्म्याचा परमात्म्याशी संयोग म्हणजेच योग होय ! योगमध्ये प्रामुख्याने चार प्रवाह मानले जातात – कर्म योग, भक्ती योग, ज्ञान योग आणि राजयोग .राजयोग हा महामुनी पतंजली प्रणीत अष्टांग योगाचाच एक भाग आहे.

जिमी (उत्तरार्ध)

लेखक आदूबाळ यांनी मंगळवार, 24/12/2013 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
जिमी (पूर्वार्ध)
...पण स्वतःबद्दलचं त्याचं भविष्य चुकणार होतं.
"रामजीभाई कमानी मार्ग कुठे आला रे जिमी?" बिकट वाटेची वहिवाट करायला काही साधलं नव्हतं. मी नवी नोकरी शोधत, इंटर्व्यू देत हिंडत होतो. भारताच्या आर्थिक राजधानीच्या कुठल्याकुठल्या कोपर्यांत जावं लागे. मुंबईतले - विशेषतः 'टाऊन' (जिमीचा शब्द) मधले रस्ते बर्याचदा सासरची, माहेरची अशी दोन नावं घेऊन वावरतात. कॅडल रोड म्हणजेच वीर सावरकर मार्ग, हुतात्मा चौक म्हणजेच फ्लोरा फाऊंटन, एस्प्लनेड रोड म्हणजे पी डिमेलो मार्ग हे कळायला बरेच टल्ले खावे लागतात.

अशाच एका सांज वेळी

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी मंगळवार, 24/12/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
अशाच एका सांजवेळी भेट व्हावी आपुली अवेळी एकांत असावा तेव्हा तेथे नसावे कोणी अवतीभवती परतणार्या पक्षांचीही दाटी नसावी अवतीभवती काळोखातही लख्ख दिसावा चेहरा तुझा चन्द्रकोरीसारखा पापण्यांची उघड-झाप असावी जणु चमचमणार्या तारका गार वार्याची झुळुक येईल उब घ्यावीशी तुला वाटेल हातांचा ऊबदार स्पर्श अन् उश्वासांची साथ भेटेल मुकी जरी तु उभी असलीस पैंजण सारे बोलुन जातात चांदण्यात फिरावयास मग पाऊले अलगद चालु लागतात जरी शांतता असली चहुकडे गाणे मनी गुणगुणत असते तालावरती पावलांच्या सतार मनी छेडत असते निरोपाचा क्षण येतो जेव्हा वाट सापडु नये असे वाटते मी हसण्याचा प्रयत्न करतो पाणी तुझ्या डोळ्यात दाटते ---

प्रेमचंदांची "ईदगाह"

लेखक नवनाथ पवार यांनी मंगळवार, 24/12/2013 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी आठवीत असताना, त्यावेळी दूरदर्शनवर मेट्रो नावाचं एक चॅनेल असायचं त्यावर दर सोमवारी, संध्याकाळी सहा वाजता एक मालिका लागायची - "सुनो कहानी". त्या मालिकेचं शीर्षकगीत मला अजूनही आठवतेय "ना कोई राजा ना कोई राणी दिल कहता है दिल की जुबानी। … सुनो कहानी" या मालिकेत दर आठवड्याला एक कथा दाखवायचे, या कथा बहुधा भारतातील वेगवेगळ्या भाषांतील अभिजात साहित्यातून घेतलेल्या असायच्या. या मालिकेचे भाग यूट्यूब वर मिळतात का ते पाहिलं पण मिळाले नाहीत. असो. या मालिकेतील असंख्य आठवणीत राहिलेल्या भागांपैकी एक भाग म्हणजे "ईदगाह". मुंशी प्रेमचंद यांच्या याच नावाच्या गाजलेल्या कथेचं हे सादरीकरण.

जीर्णनगरी मुशाफिरी : प्रसन्नगडाचे प्रसन्न दर्शन.

लेखक सुज्ञ माणुस यांनी मंगळवार, 24/12/2013 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
जीर्णनगरी मुशाफिरी : चावंड किल्ला बरेच दिवस जुन्नरच्या मुलखात भटकंती झाली नव्हती. नाशिक जिल्हा आता जवळपास संपवून मोर्चा वळवला तो जुन्नर कडे. एकंदर जुन्नर चा इतिहास बघता, सुमारे २००० वर्ष जुना हा प्रदेश म्हणजे 'भौगोलिकदृष्ट्या' आणि 'ऐतिहासिकदृष्ट्या' महाराष्ट्राचा शिरेटोप म्हणता येईल. सातवाहन राजांच्या कालापासून हा प्रदेश प्रसिद्ध तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रदेश नागरी वस्तीखाली यायला, व्यापारदृष्ट्या येथून सुरुवात झाली असे कळते. तेव्हा हा प्रदेश सातवाहनांची उपराजधानी होती.

तळलेले पापलेट व पात्रानि मच्छी................

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/12/2013 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
तळलेले पापलेट व पात्रानि मच्छी............ Simple, Free Image and File Hosting at MediaFire १९ ला पहाटे पुण्यातून निघालो आणि सरळ तारकर्लीला संध्याकाळी बरोबर ४ला पोहोचलो. केव्हा एकदा ५ वाजतायेत याची अतुरतेने वाट बघत व किनार्‍याची मजा बघत कसा वेळ गेला ते कळलेच नाही. शेवटी एकदाचे दूरवर ठिपके दिसायला लागले आणि आमचा जीव भांड्यात पडला. ते ठिपके जसे जवळ येत होते तसे आमची अतुरता वाढतच होती. मिळणार का आज ? काय भाव फुटेल ?