Skip to main content

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

हिमालय..

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 24/01/2014 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय. त्याचं वेड लागतं. नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं. हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं.

औषध

लेखक मोक्षदा यांनी शुक्रवार, 24/01/2014 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्यातील काही महत्त्वाचा भाग सर्वांच्या माहितीसाठी इथे देत आहे. औषधांचा वापर, विक्री, आणि रुग्णाचे हित आणि औषध प्रशासनाची जबाबदारी याबद्दल यात खूप चांगल्या तर्‍हेने उहापोह केलेला आहे. ------------------------------- औषधांच्या वापरामुळे मानवी जीवन सुखकर होत चालले असताना औषधांच्या चुकीच्या वापरामुळे उद्भवणारे भयानक परीणाम सुद्धा वाढीस लागले हि बाब सामाजिक स्वस्थ्याकरिता अत्यंत हानिकारक आहे.

आपल्याला सगळं कसं,साधं सोपं पाहिजे …

लेखक घन निल यांनी शुक्रवार, 24/01/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य करणारे करतात निषेध… पण सैनिक मात्र ,जीवानिशी जतो … शहीद होणं , हुतात्मा होणं म्हणजे नेमक काय ? शेवटी मृत्यूच तो …. नाही का ? मग आपण सजवतो त्यांची प्रेतं … गुंडाळतो आपल्या तिरंग्यात …. आणि जमलंच, तर थोडा संताप व्यक्त करत जोडतो आपले हात … आदरा खातर … मरताना खरंच ,त्याला वेदना झाल्या असतील का हो? आपला गाव,आई-बाप ,मित्राची हाक,बायकोचं हसू छकुलीचं रुसू … यातलं काही आठवलं असेल ? खरं खरं सांगा … कि सांगून टाकू , हसत हसत शहीद झाला तो … ? ऐका माझं ,आपण असंच करु.… तिरंग्यात गुंडाळून आणु ….

रिझर्व बँकेचा नवा आदेश आणि काळा पैसा

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 24/01/2014 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, रिझर्व बँकेच्या नव्या आदेशानुसार सन २००५ च्या आधीच्या म्हणजे थोडक्यात जिच्यावर साल छापलेले नाही अशा ५०० रुपयांच्या नोटा काही कालानंतर चलन म्हणून अमान्य होतील. ज्यांच्याकडे असतील त्यांनी नाव गाव पत्ता आदि सोपस्कार करून त्याऐवजी चालतील अशा नोटा बदलून घ्याव्यात असे साधारण म्हटले गेले आहे.

मौत का सौदागर कुणाला म्हणावे मग?

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शुक्रवार, 24/01/2014 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना काही वर्षांपूर्वी मौत का सौदागर म्हटल्याने सोनिया गांधींवर चौफेर टीका झाली. मग रीतसर सारवासारव करण्यात आली. नुकतेच एका काँग्रेसी मंत्र्याने पंतप्रधान नरभक्षक नको असे खळबळजनक विधान केले. तर गुजरातच्या दंगलींच्या वेळेला नरेन्न्द्र मोदी मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्यावर मौत का सौदागर असल्याचा आरोप केला जातो. पण जेव्हा ३०००+ शी़खांची हत्या झाली तेव्हा सरदहु दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप हरकिशनलाल भगत, ललित माकन, जगदीश टायटलर व सज्जनकुमार (नावात चूक असेल तर कृपया सांगा) यांच्यावर होता.

सर्व वास्तु पांडवकालीन कश्या ?

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 24/01/2014 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कोणत्या ही ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) पहायला गेलात तर तेथील स्थानिक रहिवाशी ती वास्तु पांडवकालीन आहे असा उल्लेख करतात. माझे इतिहासाचे जे वाचन झाले ते थोडेसेच, आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा योगही जास्त नाहिये. आज पर्यंत जेवढ्या ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) गोष्टी पहिल्या, स्थळांचा इतिहास स्थानिक लोकांकडुन ऐकला त्यावरुन एक अनुमान निघते की या सर्व वास्तु पांडवांनी त्यांच्या वनवासातील काळात ते इथे होते तेव्हा बांधल्या आहेत. आता पांडवांना जो वनवास झाला तो १२ वर्षाचा आणि एक वर्षाचा एकांतवास होता.

राष्ट्रीय राजकारणावरचा प्रादेशिक अस्मितांचा प्रभाव

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 24/01/2014 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभा प्रेडिक्शन्सच्या दृष्टीनेइंडिया टूडे या मासिकाचा ओपिनीयन पोल आला आहे. ओपिनीयन पोल्स अंदाज बरोबर चूक निघू शकतात आणि अजून मध्ये बरेच महिनेही आहेत. या धाग्यात ओपिनीयन पोल मधली एक वेगळी गोष्ट जी अधोरेखीत करावयाची आहे ती म्हणजे राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय पक्ष पूर्ण बहुमत मिळवत नसल्याने प्रादेशिक अस्मिता असलेले आणि छोट्या पक्षांचा प्रभाव वाढतोच आहे.

रिंकू पाटील १९९०

लेखक देव मासा यांनी शुक्रवार, 24/01/2014 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक कविता वाचनात आली . त्यात हि ओळ होती “कोण्या पुस्तकात झाला अपमान माझा, भडकून उठले जवामर्द. भर गर्दीत रिंकू पाटील जाळली तेव्हा सारे का झाले सर्द ? '' आणि अचानक मन १९९०चा दशकात गेले त्या वेळी मी ५वीत असीन. त्याच काळात रिंकू पाटील जळीत प्रकरण घडले होते , ९०च्या काळात १०वीत शिकणाऱ्या मुलीला प्रियकर असणे हीच मोठी अशचर्यचि गोष्ट होती . या प्रकरणात तर मुलीला १०वीच्या परीक्षा केंद्रातच पेटवून दिले होते . हरीष पटेल असे काहीतरी तिच्या प्रियकराचे नाव होते . आणि तिची दुसरी सख्खी बहिण सुधा याच परीक्षा केंद्रात परीक्षा देत होती म्हणे असे पुसटसे आठवत आहे .

नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग ३ (आ) नेताजी निवासातील नोकर वर्ग

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 24/01/2014 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 3 (आ) - नेताजी निवास सिंगापूर वास्तव्यातील निवासातील नोकरवर्ग बर्लिनहून नेताजींबरोबर आलेले श्री स्वामी व हसन सुमारे दीड वर्षापर्यंत नेताजींचे चिटणीस म्हणून काम पहात. शिवाय स्वातंत्र्य सैनिकातून श्री रावत हे गढवाली ग्रहस्थ लष्करी सहायक म्हणून दिमतीस दिलेले होते. एक शीख ग्रहस्थ श्री समशेरसिंग व एक चाळीशी उलटलेले गुरखा सुभेदार, नेताजींचे अंगरक्षक म्हणून काम करीत. जपानी भाषा व अथवा व्यक्तींशी संबंध आणणारी सर्व कामे सुलभतेने व्हावीत म्हणून एका उच्च सरदार कुळातील श्री कोबायाशी हे जपानी तरूण नेताजींच्या दिमती हजर असत. श्री.