Skip to main content

आपल्याला सगळं कसं,साधं सोपं पाहिजे …

लेखक घन निल यांनी शुक्रवार, 24/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य करणारे करतात निषेध… पण सैनिक मात्र ,जीवानिशी जतो … शहीद होणं , हुतात्मा होणं म्हणजे नेमक काय ? शेवटी मृत्यूच तो …. नाही का ? मग आपण सजवतो त्यांची प्रेतं … गुंडाळतो आपल्या तिरंग्यात …. आणि जमलंच, तर थोडा संताप व्यक्त करत जोडतो आपले हात … आदरा खातर … मरताना खरंच ,त्याला वेदना झाल्या असतील का हो? आपला गाव,आई-बाप ,मित्राची हाक,बायकोचं हसू छकुलीचं रुसू … यातलं काही आठवलं असेल ? खरं खरं सांगा … कि सांगून टाकू , हसत हसत शहीद झाला तो … ? ऐका माझं ,आपण असंच करु.… तिरंग्यात गुंडाळून आणु …. प्रेताला पार्थिव वगेरे म्हणू … आणि त्याला सरणावर जाळताना 'अमर रहे'च्या घोषणा दिल्या कि सगळंच सोप्पं होईल … तो आपल्यासाठी मेलाय हे विसरण्यासाठी … . . आपल्याला सगळं कसं, साधं सोपं पाहिजे …

वाचने 1370
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मग आपण सजवतो शब्दांची प्रेतं … गुंडाळतो आपल्या काव्यात …. आणि जमलंच, तर 'वा वा', नि:शब्द झालो', 'सुन्न झालो' म्हणून चार प्रतिसाद टाकतो … रीतीखातर … त्याच्या बायकोचं आयुष्य सावरलं असेल का हो? पोरांच्या शिक्षणाचं काय? … की लागली असतील हॉटेलात टेबलं पुसायला? यातलं काही आठवलं असेल ? खरं खरं सांगा … आपल्यालाही सगळं कसं, साधं सोपं पाहिजे … (कृपया ह. घेणे...)

तुमचा प्रतिसाद आवडला ."(कृपया ह. घेणे...)" हे का लिहिले कळाले नाही